राजमाता जिजाबाई यांचे जन्मस्थळ – सिंदखेड राजा माहिती मराठी

Sindkhed raja in marathi – महाराष्ट्र राज्यातील एक गाव सिंदखेड राजा, जगभरात याचे नाव माहीत आहे. याचे कारण म्हणजे या गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई राजमाता जिजाबाई यांचा जन्म झाला. त्यामुळे या गावास एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. या ठिकाणी असणारे ऐतिहासिक वास्तू आणि ठिकाणे पाहण्यासारखी आहेत. या लेखातून आपण राजमाता जिजाबाई यांचे जन्मस्थळ – सिंदखेड राजा माहिती मराठी (sindkhed raja in marathi) जाणून घेणार आहोत.

राजमाता जिजाबाई यांचे जन्मस्थळ – सिंदखेड राजा माहिती मराठी (sindkhed raja in marathi)

Sindkhed raja in marathi
विषय सिंदखेड राजा
प्रकार महाराष्ट्र राज्यातील एक प्रसिद्ध गाव
तालुका सिंदखेड राजा
जिल्हा बुलढाणा
विभागाचे नावअमरावती
स्थानिक भाषामराठी
प्रसिद्धीराजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ
Sindkhed raja information in marathi

सिंदखेड राजा हे महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी बुलढाणा जिल्ह्यातील एक गाव आहे. बुलढाणा जिल्ह्याला पूर्वी भिलठाणा म्हणून ओळखले जायचे. त्याचे इंग्रज काळात बुलढाणा असे नामांतर करण्यात आले. तेव्हापासून भिलठाणा बनला बुलढाणा.

लखुजी जाधव हे जिजाऊंचे वडील, सिंदखेडचे मराठा वतनदार होते. लखुजीराव जाधव यांना शुर योद्धा म्हणून ओळखले जाते.

देवगिरी किल्ला जिंकण्यासाठी निजामशाहीने 12 वर्ष प्रयत्न करत होते पण हा किल्ला कधीही जिंकू शकले नाही. इसवी सन 1572 मध्ये हा किल्ला लखुजीराव जाधवांनी जिंकून निजामशाहीला दिला. यानंतर निजामशहाने लखुजी जाधवांना वंशपरंपराने जहागिरी करून दिली. यामध्ये 10,000 हजारी मनसब, 9 सरकार, 28 महाल व 56 चावड्याचा समावेश होता.

लखुजीराव जाधव आणि म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई यांच्या घरी 12 जानेवारी 1598 रोजी एक कन्या जन्माला आली. तिचे नाव जिजाबाई असे ठेवण्यात आले. जिजाऊंना चार भाऊ होते, ते पुढीलप्रमाणे….

  • दत्ताजीराव
  • अचलोजीराव
  • बहादुरजी
  • राघोजी राव

हा लेख जरूर वाचाशिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा माहिती (shivrajyabhishek information in marathi)

राजमाता जिजाऊ माहिती मराठी (jijau information in marathi)

jijau information in marathi
नाव जिजाबाई जाधव (भोसले)
जन्म12 जानेवारी 1598
कार्यक्षेत्रराजकारणी आणि महाराणी
पितालखुजीराव जाधव
आईम्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई
पती शहाजीराजे भोसले
अपत्येशिवाजी राजे
संभाजी राजे
मृत्यू 17 जून 1674

राजमाता जिजाऊ यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई आणि लखुजीराव यांच्या पोटी झाला. यांना राजमाता, राष्ट्रमाता, जिजाबाई किंवा जिजाऊ म्हणून संबोधले जाते.

इसवी सन 1605 मध्ये जिजाऊंचा शहाजीराजांशी विवाह झाला. जिजाऊंना शौर्य, दूरदृष्टी आणि एक कुशल घोडेस्वार तसेच एक अत्यंत कुशलतेने तलवार चालवणाऱ्या म्हणून ओळखले जाते.

जिजाऊ आणि शहाजी राजांना 19 फेब्रुवारी 1630 रोजी एक पुत्र झाला, नाव त्याचे शिवाजी ठेवण्यात आले. जिजाबाईंनी त्यांच्या मुलाला स्वराज्याची शिकवण दिली आणि एक महान योद्धा म्हणून उभे केले. पुढे याच शिवबाने मराठा साम्राज्याची स्थापना केली.

महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांप्रमाणे जिजाऊंचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे जिजामाता या मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहे. दरवर्षी 12 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र राज्यात जिजाऊंचा जन्मदिवस म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.

सिंदखेड राजा पाहण्यासारखी ठिकाणे (sindkhed raja tourist places)

सिंदखेड राजा या ठिकाणी ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळतात. सिंदखेड राजा येथे जिजाऊंचे वडील लखुजीराव जाधव यांचा राजवाडा आहे. जिजाऊंचा जन्म याच वाड्यात झाला. हा वाडा मुंबई-नागपूर हायवेला लागूनच आहे.

या वास्तूसमोर नगरपालिका निर्मित एक बगीचा आहे. या ठिकाणी राजे लखोजीराव जाधवांचे समाधीस्थळ आहे. ही भव्य वास्तू भारतातील संपूर्ण हिंदू राज्याच्या समाधीपेक्षा मोठी वास्तू आहे .

या ठिकाणी एक महाल आहे नाव त्याचे रंगमहाल. याच ठिकाणी जिजाऊंच्या आणि शहाजीराजे यांच्या विवाहाची बोलणी करण्यात आली होती.

रांगमहलाच्या जवळच निळकंठेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात संपूर्ण पाषाणातून साकारलेले हरिहराची सुंदर शिल्प आहे. राजे लखुजीराव यांनी मंदिराचे पुनरुज्जीवन केल्याचा शिलालेख कोरलेला आहे.

इसवी सन आठव्या ते दहाव्या शतकातील अतिप्राचीन असे हेमाडपंथी रामेश्वर मंदिर आहे. राजे जगदेवराव जाधव यांच्या कार्यकाळात भव्य किल्ल्यांच्या निर्मितीची सुरुवात झाली होती. त्याचंच एक सुंदर उदाहरण म्हणजे काळाकोठ. अतिभव्य आणि मजबूत अशा या काळाकोठच्या भिंती वीस फूट रुंद आणि तेवढ्याच उंच आहेत.

यासोबतच साखरवाडा नावाचा चाळीस फूट उंच भिंती चा परकोट येथे बघायला मिळतो. त्या परकोटावर निगराणी साठी अंतर्गत रस्ता, आत मध्ये विहीर, भुयारी तळघरे, भुयारी मार्ग आहेत. तर या वास्तूचे प्रवेशद्वार देखील अति सुंदर आहे.

मोतीतलाव म्हणजे सिंचनासाठी पाणी सोडण्याची अति सुव्यवस्थित नियोजन पद्धती आहे. त्या काळातील जल अभियांत्रिकीचा अति उत्कृष्ट नमुना आहे. या तलावाच्या समोरील भाग एका किल्ल्याप्रमाणे बांधण्यात आला असून विलोभनीय परिसर याला लाभलेला आहे.

मोतीतलावाप्रमाणेच, चांदणीतलाव हे सुद्धा एक प्रेक्षणीय स्थळ आहे. तलावाच्या मधोमध तीन मजली इमारत बांधलेली आहे.

या परिसरात अतिशय रेखीव पद्धतीने बांधण्यात आलेली पुतळा बारव आहे. ही बारव म्हणजे असंख्य मूर्ती व शिल्पांचा एकत्र वापर करून बनविलेले देखणी शिल्पकृती आहे.

या ठिकाणी एक सजनाबाई विहीर आहे. पूर्वी या विहीरीतून गावांमध्ये पाणीपुरवठा भूमिगत बंदिस्त नाल्यांच्याद्वारे केले जात होते. या विहिरी आतपर्यंत उतरण्यासाठी पायर्‍यांची सुविधा देखील आहे.

हा लेख जरूर वाचामहाराष्ट्रातील राज्यातील पर्यटन स्थळे माहिती (maharashtra tourist places in marathi)

सारांश

या लेखातून आपण राजमाता जिजाबाई यांचे जन्मस्थळ – सिंदखेड राजा माहिती मराठी (sindkhed raja in marathi) जाणून घेतली आहे. यात आपण सिंदखेड राजा तालुक्यातील गावे, इतिहास याची माहिती जाणून घेतली. लखुजी जाधव आणि जिजाऊ यांची देखील माहिती जाणून घेतली.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली ? हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

सिंदखेड राजा येथे कोणाचा राजवाडा आहे ?

सिंदखेड राजा येथे जिजाऊंचे वडील लखुजीराव जाधव यांचा राजवाडा आहे.

सिंदखेड ची लढाई कोणा-कोणामध्ये झाली ?

सिंदखेडची लढाई निजाम आणि निजाम अली यांच्यामध्ये झाली.

राजमाता जिजाऊ यांना किती भाऊ होते ?

राजमाता जिजाऊ यांना चार भाऊ होते. ते पुढीलप्रमाणे आहेत.
1. दत्ताजीराव
2. अचलोजीराव
3. बहादुरजी
4. राघोजी राव

जिजामाता यांचा मृत्यू कधी झाला ?

जिजामाता यांचा मृत्यू 17 जून 1674 रोजी झाला.

जिजामाता यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

जिजामाता यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव हे होते.

जिजामाता यांचा विवाह कोणाशी व वयाच्या कितव्या वर्षी झाला ?

जिजामाता यांचा विवाह शहाजी राजांशी व वयाच्या सातव्या वर्षी झाला.

जिजाऊ सृष्टी कोणत्या ठिकाणी आहे ?

जिजाऊ सृष्टी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या तालुक्याच्या ठिकाणी आहे.

राजमाता जिजाऊ यांची समाधी कोठे आहे ?

रायगडाच्या पायथ्याशी पाचाड नावाचे गाव आहे. तेथेच राजमाता जिजाऊ यांची समाधी आहे.