भारतातील पहिले महिला विद्यापीठ माहिती (SNDT information in marathi)

SNDT information in marathi – फक्त भारतातीलच नव्हे तर आशिया खंडात पहिले महिला विद्यापीठ (asia’s first women’s university) समाजसुधारक धोंडो केशव कर्वे ऊर्फ अण्णा कर्वे यांनी 1916 साली मुंबई येथे स्थापन केले. अण्णा कर्वे यांनी महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. महिलांनी शिकावे, स्वावलंबी व्हावे ह्या उद्देशातून भारतील पहिले महिला विद्यापीठ (india’s first women’s university) श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई याची स्थापना झाली.

या विद्यापीठातून 1921 मध्ये पाच विद्यार्थिनी पदवीचे शिक्षण घेऊन उत्तीर्ण झाल्या. या विद्यापीठास अनेक दिग्गज मिळाले, त्याची नावे पुढीप्रमाणे आहेत. डॉ. प्राची घारपुरे, प्रसिद्ध लेखिका चित्रा मुदगल, प्रसिद्ध शास्त्रीय गायिका श्रुती सडोलीकर, डॉ. भारती वैशंपायन, प्रसिद्ध नायिका राणी मुखर्जी, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, फॅशन डिझायनर अनिता डोंगरे, नीता लुल्ला आणि आताच्या पिढीचे प्रतिनिधीत्व करणारी मसाबा गुप्ता इत्यादी.

या लेखात आपण भारतातील पहिले महिला विद्यापीठ माहिती (SNDT information in marathi) श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबई याविषयीं माहिती जाणून घेणार आहोत.

हा लेख जरूर वाचामहाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे स्थापना व ठिकाण (maharashtra major university information in marathi)

भारतातील पहिले महिला विद्यापीठ माहिती (SNDT information in marathi)

SNDT information in marathi
नावश्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ
स्थापना3 जून 1916 (मुंबई)
(धोंडो केशव कर्वे ऊर्फ अण्णा कर्वे)
एकूण विद्याशाखा 12
अभ्यासक्रमपदवीपर्यंतचे 51
पदव्युत्तर 61
डिप्लोमा 13
वेबसाईटhttps://sndt.ac.in/

धोंडो केशव कर्वे ऊर्फ अण्णा कर्वे यांनी या विद्यापीठाची स्थापना केली. त्यावेळेस या विद्यापीठाचे नाव द इंडियन वुमन युनिव्हर्सिटी (The Indian Women’s University) असे होते. अण्णांच्या कर्तृत्वाने चकित आणि प्रभावित होऊन सर विठ्ठलदास ठाकरसी यांनी आपल्या मातोश्री नाथीबाई ठाकरसी (shreemati nathibai damodar thackersey) यांच्या स्मरणार्थ या विद्यापीठास १५ लाख रुपयांची देणगी दिली. त्यानंतर या विद्यापीठास नाथीबाई ठाकरसी यांचे नाव देण्यात आले.

मराठी, गुजराती, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू या भाषेत विद्यापीठातून विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. या महिला विद्यापीठाचा विस्तार गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, बिहार, गोवा आणि आसाम या आणखी सहा राज्यांतही झाला आहे.

मुंबई आणि पुणे या ठिकाणी 11 महाविद्यालये व 32 विद्यापीठीय विभाग आहेत. महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात 44 महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्न आहेत. मुंबई आणि पुणे येथे असणाऱ्या विद्यापीठाच्या ग्रंथालयात 2 लाख 54 हजार ग्रंथ आहेत.

या विद्यापीठ अंतर्गत मानव्यविद्या, तंत्रविद्या व विज्ञान, ललित कला व सामाजिकशास्त्रे, संगणक विज्ञान, परिचारिका अभ्यासक्रम, विद्यापीठात सर्व विषयांमधील पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी. परीक्षांची तसेच पदविका व प्रमाणपत्र , तंत्रविद्या व व्यवस्थापन-अभ्यासक्रम शिकवले जातात.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ कुलगुरू

इसवी सन 1952 ते इसवी सन 1957 या कालावधीत दिवाणबहाद्दुर झवेरी यांनी कुलगुरुपद सांभाळले. यानंतर इसवी सन 1957 ते इसवी सण 1969 या कालावधीत लेडी ठाकरसींनी. या शेवटच्या बारा वर्षांत 13 नवीन विभागांची आणि महाविद्यालयांची स्थापना झाली.

यात मराठी, चित्रकला हे विभाग मुंबई व पुणे येथे, तसेच नर्सिंग महाविद्यालय, शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गृहविज्ञान महाविद्यालय ही महत्त्वाची महाविद्यालये आहेत. अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, ग्रंथपालनशास्त्र, फूड सायन्स अँड न्युट्रिशन अशा पदव्युत्तर विभागांचा समावेशही करण्यात आला.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ आधुनिक अभ्यासक्रम

इसवी सन 1974 साली डॉ. नीराबेन देसाईंच्या मार्गदर्शनाखाली (Research Centre for Women’s Studies) स्थापन झाले. या केंद्राला आंतरराष्ट्रीय मान्यता आहे.

इसवी सन 1975 ते 1985 या दशकात विद्यापीठाने आणखी 13 नवीन पदव्युत्तर विभाग स्थापन केले. 1985 नंतरच्या तीन दशकात बारा नावीन्यपूर्ण विभाग आणि संस्थांची स्थापना झाली.

इसवी सन 2012-13 या वर्षापासून सर्व पदव्युत्तर अभ्यासक्रमात (मास्टर्स डिग्री) इंटर्नशिप आणि संशोधन हे दोन प्रत्येकी आठ क्रेडिट कोर्सेस प्रत्येक विद्यार्थिनीसाठी आवश्यक ठरवले गेले. Internship मुळे विद्यापीठ 750 ते 800 संस्थांशी जोडले गेले, विद्यार्थिनींना placement च्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण भारतातील पहिले महिला विद्यापीठ माहिती (SNDT information in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले ?

भारतातील पहिले महिला विद्यापीठ धोंडो केशव कर्वे ऊर्फ अण्णा कर्वे यांनी स्थापन केले.

भारतातील पहिले महिला विद्यापीठ कोणते आहे ?

भारतातील पहिले महिला विद्यापीठ श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ हे आहे.

1973 पासून कोणत्या विद्यापीठात ग्रंथप्रकाशन हा विषय अभ्यासक्रमासाठी नेमण्यात आला आहे?

1973 पासून दिल्ली विद्यापीठात ग्रंथप्रकाशन हा विषय अभ्यासक्रमासाठी नेमण्यात आला आहे.

Leave a Comment