Energy meaning in marathi – ऊर्जा म्हणजे कार्य करण्यासाठी लागणारी शक्ती होय. जशी आपल्या शरीराला प्रत्येक काम करण्यासाठी कार्यशक्तीची गरज असते. त्याचप्रमाणे वनस्पतीला प्रकाशाची, वाहनाला इंधनाची गरज असते.
main source of energy – सूर्यापासून मिळणारा प्रकाश हा पृथ्वीवरील ऊर्जा मिळवण्याचा मुख्य स्रोत मानला जातो. सूर्यापासून मिळणाऱ्या प्रकाशापासून वनस्पती त्यांचे अन्न बनवतात. या वनस्पतीपासून आपण शरीराला आवश्यक ऊर्जा मिळवतो.
शाकाहारी प्राण्यांवर अवलंबून असणारे मांसाहारी प्राणी त्यांना खाऊन आपली ऊर्जा मिळवतात. अशाप्रकारे ऊर्जा नेहमी एकाकडून दुसरीकडे स्थलांतरित होते.
विद्युत उपकरणे आणि यंत्रे चालवण्यासाठी लागणारी ऊर्जा मिळवण्यासाठी पेट्रोलकेमिकल वापरून मिळवली जाते. पण या स्त्रोताद्वारे मिळवलेली ऊर्जा संपुष्टात येऊ शकते. यामुळे नवीन तंत्रज्ञान वापरून सूर्यापासून मिळणारी ऊर्जा साठवून तिचा वापर केला जात आहे.
सौरऊर्जा, जलविद्युत आणि आण्विक ऊर्जा प्रकल्पातून विजेची (ऊर्जेची) निर्मिती केली जाते. यानंतर ऊर्जा उष्णता, प्रकाश आणि वीज अश्या प्रकारातून वापरली जाते. ऊर्जा कधीही संपत नाही, ती नेहमी एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतरित होते.
सूर्यापासून प्रकाशकिरणे पृथ्वीवर पडतात, या किरणांनी हवामानात अनेक बदल होतात. सूर्यापासून पृथ्वीला 174 पेटावॅट ऊर्जा मिळते. यातली 20% ऊर्जा परावर्तित होते बाकी उरलेली ऊर्जा वातावरणात शोषली जाते.
सौरऊर्जेचा वापर विजेच्या आणि प्रकाशाच्या स्वरूपात करण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्पाची निर्मिती केली जाते. या प्रकल्पासाठी जास्त खर्च येतो, पण हा खर्च जास्त कालावधीसाठी फायदेशीर ठरतो.
या लेखातून आपण सौर ऊर्जा माहिती मराठी (solar energy in marathi) जाणून घेणार आहोत. यात सौरऊर्जेचा फायदे आणि उपयोग याविषयी सविस्तर माहिती अभ्यासणार आहोत.
Table of Contents
- सौर ऊर्जा माहिती मराठी (solar energy in marathi)
- सौर ऊर्जा उपयोग व महत्व मराठी (solar energy benefits and importance Marathi)
- सौर ऊर्जेचे तोटे माहिती मराठी (Solar Energy Disadvantages Marathi)
- सारांश
- वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
सौर ऊर्जा माहिती मराठी (solar energy in marathi)

विषय | सौरऊर्जा |
प्रकार | ऊर्जेचा प्राथमिक स्रोत |
निर्मिती | सूर्य प्रकाशापासून |
वापर | कार्यशक्ती म्हणून |
सूर्यापासून मिळणारी ऊर्जा प्राथमिक (मूळ) ऊर्जा मानली जाते. पृथ्वीवर पडणारा सूर्यप्रकाश हवामानात अनेक बदल घडवून आणतो उदा. वनस्पतींची वाढ, दिवस आणि रात्र, समुद्राचे बाष्पीभवन इत्यादी.
एखादे यंत्र किंवा उपकरण चालवण्यासाठी त्याला ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा पेट्रोल, डिझेल, रॉकेल, विविध वायू यापासून मिळविले जाते. पण हे ऊर्जा स्रोत कधीतरी संपुष्टात येऊ शकतात.
यावर उपाय म्हणून सौर ऊर्जेचा इंधन आणि वीज म्हणून वापर केला जातो. यासाठी देशात अनेक सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यासोबतच जलविद्युत आणि आण्विक ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले आहेत.
भारत देश उष्णकटिबंधीय प्रदेशात येतो, यामुळे येथे वर्षभर सूर्य तळपतो त्यामुळे भारतात सौर ऊर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. याचाच फायदा करून घेण्यासाठी भारतातील राज्य सरकार आपापल्या जिल्ह्यात सौर ऊर्जा प्रकल्प योजना राबवत आहे.
सौर ऊर्जा उपयोग व महत्व मराठी (solar energy benefits and importance Marathi)

सूर्य हा ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. सौर ऊर्जा घेण्यासाठी घरात कुठल्याही प्रकारचा मीटर बसवावा लागत नाही व कुठलेही बिल भरावे लागत नाही.
सौर ऊर्जेला कार्य करण्यासाठी कोणत्याही बाहेरील पुरवठ्याची आवश्यकता नसते, त्यामुळे त्याची देखभाल आणि ऊर्जा उत्पादन खर्च व्यावहारिकदृष्ट्या शून्य आहे. सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पासाठी खर्च येतो.
या प्रकल्पातून मिळणारी ऊर्जा स्वच्छ दर्जाची असते. म्हणजेच ही ऊर्जा मिळवताना कसलाही कार्बन द्वारे प्रदूषण होत नाही. त्यामुळेच तर सौर ऊर्जेला हरित क्रांती किंवा हरित ऊर्जा म्हंटले जाते.
सूर्यापासून मिळणाऱ्या प्रकाश मुबलक आणि विनामूल्य असल्याने ऊर्जा निर्मितीवर मर्यादा येत नाहीत. तसेच यापासून मिळणारी ऊर्जा नूतनीकरण आणि टिकाऊ ऊर्जा मानली जाते.
वाहनासाठी लागणारे पेट्रोल, डिझेल यांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने इंधनाचा साठा कमी होत आहे. जर सौर ऊर्जा वापरून वाहन वापरली तर या इंधनाचा वापर आटोक्यात येऊ शकतो.
मोठ्या प्रमाणात सूर्याची ऊर्जा उपलब्ध आहे, जर या ऊर्जेचा योग्य वापर केला तर आपल्याला इंधनासाठी निसर्गातील झाडांची तोड करण्याची आवश्यकता पडणार नाही. परिणामी जंगलतोड कमी होऊन पर्यावरण समतोल राखला जाईल.
दिवसभर सौरऊर्जा उपलब्ध असते. रात्रीसाठी आपण सौर ऊर्जेची साठवण करून रात्रीच्या वेळी उपयोगात आणू शकतो यासाठी खर्च अल्पप्रमाणात येतो.
सौर कंदील, सौर पंप, सौर फवारणी यंत्र, सौर पवन, विद्युत यंत्र, सौर कुकर, सौर शुद्धजल संयंत्र आणि सौर ऊर्जावर चालणारी चूल विनामूल्य वापरता येते.
सौर ऊर्जास्रोतांचा उपयोग विहिरीतून पाणी उपासण्यासाठी, विद्युतनिर्मितीसाठी, अन्न शिजवणे आणि वाळवणे, पाणी गरम करण्यासाठी होऊ शकतो. यासाठी वॉटर हीटर, पवनचक्की, सोलर कुकर, फोटोहोल्टिक दिवे आणि पंप, सुधारित चूल आणि गोबर गॅस संयंत्रे अशी साधने वापरता येतात.
सौर ऊर्जेचे तोटे माहिती मराठी (Solar Energy Disadvantages Marathi)

सौर ऊर्जा ही सूर्यापासून मिळणारी विनामूल्य शक्ती आहे. यापासून प्रदूषण होत नाही, हा सर्वात मोठा फायदा आहे. पण सौर ऊर्जेचे तोटे नसले तरीदेखील याच्या निर्मितीवर आणि वापरावर मर्यादा येतात.
पहिली मर्यादा म्हणजे सूर्य प्रकाश फक्त दिवसा उपलब्ध असल्यामुळे ऊर्जा निर्मिती फक्त दिवसाच केली जाऊ शकते. रात्रीच्या वेळी ऊर्जा उत्पादन कार्य करता येत नाही.
पावसाळ्यात आणि ढगाळ वातावरणात ऊर्जा निर्मिती प्रक्रियेवर मर्यादा येतात. तसेच यापासून मिळवली जाणारे विद्युत ऊर्जा डीसी (Direct Current) स्वरूपाची असते, पण घरातील बहुतांश उपकरणे एसी (Alternating Current) वर चालतात.
सारांश
या लेखातून आपण सौर ऊर्जा माहिती मराठी (solar energy in marathi) सविस्तरपणे जाणून घेतले आहे. यात आपण सौर ऊर्जा म्हणजे काय, त्याचे महत्त्व, फायदे आणि तोटे याविषयी माहिती अभ्यासली आहे.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
सौर ऊर्जा म्हणजे काय ?
सौर ऊर्जा म्हणजे सूर्यापासून मिळणारी ऊर्जा होय.
ऊर्जा स्त्रोत कशाला म्हणता येईल ?
ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता होय. ही ऊर्जा मिळवण्याच्या माध्यमाला ऊर्जा स्त्रोत म्हणता येईल. ऊर्जास्रोत हे नैसर्गिक व मानवनिर्मित आहे. सौरऊर्जा हा ऊर्जेचा मूळ स्रोत मानला जातो. त्यानंतर पेट्रोकेमिकल व नैसर्गिक वायू हे ऊर्जेचे स्रोत आहेत.
ऊर्जेचे विविध प्रकार कोणते आहेत ?
गतिज ऊर्जा आणि स्थितीज ऊर्जा असे ऊर्जेचे मूळ प्रकार आहेत. यांनतर ऊर्जेचे वर्गीकरण पारंपारिक आणि अपारंपारिक उर्जा स्त्रोत यामध्ये केले जाते.
आण्विक, यांत्रिक, ऊष्मीय, रासायनिक, ध्वनीय, प्रकाशीय, विद्युत् चुंबकीय हेदेखील ऊर्जेचे प्रकार आहेत.
ऊर्जेचे एकक कोणते आहे ?
SI पद्धतीत ऊर्जेचे एकक ज्यूल आहे. CGS पद्धतीत ऊर्जेचे एकक अर्ग हे आहे.
पुढील वाचन :