support and resistance in marathi – सपोर्ट आणि रेझिस्टन्स या टेक्निकल एनालिसिस मधल्या महत्त्वाच्या बाबी आहेत. या बाबींच्या आधारे शेअरची किंमतीची मागणी व घट यातील फरक लक्षात येतो.
ज्यावेळेस मागणी वाढते त्यावेळेस शेअरची किंमत देखील वाढते याउलट घटती मागणी शेअरची किंमत कमी करते. शेअरची किंमत विश्लेषण करताना सपोर्ट आणि रेझिस्टन्स समजल्या तर स्टॉक खरेदी किंवा विक्रीचा सिग्नल मिळतो. यामुळे सुरक्षित स्टॉप लॉस ठेवता येतो आणि योग्य टारगेट प्राइस निश्चित करता येते.
या लेखातून आपण सपोर्ट आणि रेझिस्टन्स मराठी (support and resistance in marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
सपोर्ट आणि रेझिस्टन्स मराठी (support and resistance in marathi)

सपोर्ट म्हणजे काय (support meaning in stock market marathi) – शेअर बाजारात मागणीपेक्षा जास्त पुरवठा असेल, म्हणजेच Buyer पेक्षा जास्त Seller असतील तर बाजार Downtrend येतो. या वेळेस शेअरच्या किमती खूप कमी कमी होत जातात. यानंतर अशी एक किंमत येते, ज्यावर ट्रेडर्स आकर्षित होतात. अर्थात बाजारात Buyer प्रवेश करतात.
या किमती होऊन शेअरची किंमत कमी होणार नाही अशी ट्रेडर्सची मानसिकता बनते. एक प्रकारे ते शेअरची किंमत कमी होऊ नये म्हणून समर्थन करतात. या समर्थनामुळे Downtrend संपून Uptrend चालू होतो.
रेजिस्टन्स म्हणजे काय (resistance meaning in marathi) – शेअर बाजारात पुवठ्यापेक्षा जास्त मागणी असेल, म्हणजेच Seller पेक्षा जास्त Buyer असतील तर बाजार Uptrend येतो. या वेळेस शेअरच्या किमती खूप जास्त होत जातात. यानंतर अशी एक किंमत येते, ज्यावर ट्रेडर्सची मानसिकता भीतीदायक बनते.
या किमती होऊन शेअरची किंमत वाढणार नाही अशी ट्रेडर्सची मानसिकता बनते. एक प्रकारे ते शेअरची किंमत कमी होऊ नये म्हणून समर्थन करतात. या समर्थनामुळे Downtrend संपून Uptrend चालू होतो.
सपोर्ट आणि रेझिस्टन्स दोन प्रकारचे असतात.
- Horizontal Support & Resistance
- Trending Support & Resistance
1. Horizontal Support and Resistance in marathi

- वरील चित्रामध्ये शेअरची किंमत कमी होत असताना ती ठराविक किमतीवर थांबून पुन्हा वाढत आहे. त्या थांबलेल्या किमतीला minor support म्हणतात.
- हा सपोर्ट घेऊन किंमत परत वर जाऊन पुन्हा किंमत कमी होऊन minor support च्या जवळ थांबत आहे, याला strong support असे म्हणतात.
- या लेवल वरून किंमत वाढते आणि पुन्हा त्याच ठिकाणी येऊन थांबते, त्याला लेव्हलला Major support असे म्हणतात.
लक्षात घ्या – या ठिकाणी शेअरची किंमत कमी होत असताना एका ठराविक लेव्हलवर राहून तिथून वर जात आहे याचा अर्थ बाजारात तेजी येण्याची शक्यता आहे.
Horizontal Support च्या मदतीने खरेदी कशी करावी ?
1. Horizontal Support बनणाऱ्या तिसऱ्या कॅण्डलच्या नंतर लगेचच खरेदी करायचे आहे.
2. तिसऱ्या Horizontal Support low चा Stop Loss लावायचा.
3. प्रॉफिट, रिस्क रेवर्ड रेशो आणि trailing stop loss नुसार ट्रेडिंग करायचे आहे.
- वरील चित्रामध्ये शेअरची किंमत वाढत असताना ती ठराविक लेव्हलवर थांबून कमी होत आहे. त्या थांबलेल्या लेव्हलला Minor Resistance म्हणतात.
- हा रेजिस्टन्स घेऊन किंमत परत वर जाऊन पुन्हा किंमत कमी होऊन Minor Resistance च्या जवळ थांबत आहे, याला Strong Resistance असे म्हणतात.
- या लेवल वरून किंमत वाढते आणि पुन्हा त्याच ठिकाणी येऊन थांबते, त्याला लेव्हलला Major Resistance असे म्हणतात.
लक्षात घ्या – या ठिकाणी शेअरची किंमत वाढत असताना किंमत एका ठराविक लेव्हलवर राहून तिथून खाली जात आहे, याचा अर्थ बाजारात मंदी येण्याची शक्यता आहे.
Horizontal Resistance च्या मदतीने विक्री कशी करायची ?
1. Horizontal Resistance बनणाऱ्या तिसऱ्या कॅण्डलच्या नंतर लगेचच विक्री करायचे आहे. 2. तिसऱ्या Horizontal Resistance High चा Stop Loss लावायचा.
3. प्रॉफिट, रिस्क रेवर्ड रेशो आणि trailing stop loss नुसार ट्रेडिंग करायचे आहे.
सपोर्ट आणि रेझिस्टन्स चार्टमध्ये बघत असताना दोन सपोर्ट आणि दोन रेजिस्टन्सच्यामध्ये सात ते आठ कॅन्डलस्टिकचा फरक असला पाहिजे. तरच या पॅटर्नला सपोर्ट किंवा रेझिस्टन्स म्हणता येईल.
2. Trending Support and Resistance in marathi

- वरील चित्रामध्ये पाहिले असता, बाजारात Uptrend चालू आहे. यावेळी बाजारात पहिला सपोर्ट बनल्यावर सपोर्टचा आधार घेऊन पुन्हा सपोर्ट बनवतो.
- आता दोन्ही सपोर्टच्या low price ला जोडून एक ट्रेण्डलाईन आखली तर तिसरा support या लाईनला स्पर्श करण्याची शक्यता अधिक असते.
- यावरून बाजारात तेजी सुरू असल्याचा संकेत मिळतो.
Trending Support च्या मदतीने खरेदी कशी करायची ?
1. Trending Support बनणाऱ्या तिसऱ्या कॅण्डलच्या नंतर लगेचच खरेदी करायचे आहे.
2. तिसऱ्या Trending Support low चा Stop Loss लावायचा.
3. प्रॉफिट, रिस्क रेवर्ड रेशो आणि trailing stop loss नुसार ट्रेडिंग करायचे आहे.

- वरील चित्रामध्ये पाहिले असता, बाजारात Downtrend चालू आहे. यावेळी बाजारात पहिला रेजिस्टन्स बनल्यावर त्याचा आधार घेऊन बाजार पुन्हा रजिस्टन्स बनवतो.
- आता दोन्ही रेजिस्टन्सच्या high price ला जोडून एक ट्रेण्डलाईन आखली तर तिसरा Resistance या लाईनला स्पर्श करण्याची दाट शक्यता असते.
- यावरून बाजारात मंदी सुरू असल्याचा संकेत मिळतो.
Trending Resistance च्या मदतीने विक्री कशी करावी ?
1. Trending Resistance बनणाऱ्या तिसऱ्या कॅण्डलच्या नंतर लगेचच विक्री करायचे आहे.
2. तिसऱ्या Trending Resistance High चा Stop Loss लावायचा.
3. प्रॉफिट, रिस्क रेवर्ड रेशो आणि trailing stop loss नुसार ट्रेडिंग करायचे आहे.
सारांश
या पोस्टमध्ये सपोर्ट आणि रेझिस्टन्स मराठी (support and resistance in marathi) जाणून घेतली. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.
पुढील वाचन :