भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव निबंध मराठी

Categorized as Blog

Swatantryacha Amrut Mahotsav Nibandh In Marathi – नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अमृत महोत्सव म्हणजे 75 वा वर्धापन दिवस, ज्याला आपण सोप्या भाषेत अमृत जयंती किंवा पंच्याहत्तरावी जयंती असे म्हणू शकतो. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र होऊन आज 75 वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने मी स्वातंत्र्य सुवर्ण महोत्सव निबंधातून माझे मत व्यक्त करणार आहे.

मला आशा आहे की, भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव निबंध मराठी (Swatantryacha Amrut Mahotsav Nibandh In Marathi) तुम्हाला नक्कीच आवडेल. चला तर मग सुरू करूयात…

भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव निबंध मराठी (Swatantryacha Amrut Mahotsav Nibandh In Marathi)

इंग्रजांनी आपल्या भारतावर जवळपास 150 वर्षे राज्य केले. बघता बघता आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल 75 वर्षे झाली आहेत. आज भारताला स्वातंत्र्य मिळून प्रचंड काळ लोटला आहे.

स्वातंत्र्य दिवस म्हटले की सगळीकडे देशभक्तीपर गीते, निबंध, भाषण, समूहगीत ऐकू येतात. अनेक जण भाषणाच्या रूपातून आपले विचार मांडत असतात तर काही जण लेखनाच्या माध्यमातून. आज मी तुमच्यासमोर स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने निबंध सादर करत आहे.

अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले, परिवाराचा त्याग केला, कोणी अहिंसेच्या मार्गाने, कोणी क्रांतीच्या मार्गाने देशासाठी लढले, झुंजले म्हणूनच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले.

हा तिरंगा आज आकाशात डोलताना दिसत आहे, या तिरंग्यामागे अनेकांची मेहनत, त्याग आहे. खूप मोठे योगदान आहे. हे विसरून आपल्याला चालणार नाही.

आज या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढलेल्या वीर जवानांचे, समाज सुधारकांचे, नेत्यांचे स्मरण आपल्याला असायलाच हवे.

15 ऑगस्ट 2022 हा तो दिवस जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाले. यामुळे हा दिवस आपण स्वातंत्र्य लढ्याचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरा केला.

या निमित्ताने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा) या एका आगळ्यावेगळ्या मोहिमेचे आयोजन होते. मला चांगले आठवते, मागच्या वर्षी जेव्हा आम्ही स्वातंत्र्य दिवस साजरा करत होतो, तेव्हा नजर जाईल तिथे तिरंगा ध्वज फडकत होता. दिवाळी सणासारखे स्वरूप या दिवशी पाहायला मिळाले होते, ही बाब इतिहासात पहिल्यांदाच घडली होती.

मी आज तुम्हाला एकच आव्हान करतो, तिरंगा आपल्या प्रत्येकाच्या मनात, हृदयामध्ये फडकत राहिला पाहिजे. विशेष म्हणजे या तिरंग्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे, तेव्हा या तिरंग्याचा अवमान होणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी.

Swatantryacha Amrut Mahotsav Nibandh In Marathi – आपल्या भारत देशाचे भविष्य आजच्या विद्यार्थी आणि तरुणांच्या हातात आहे. या दिवसाच्या निमित्ताने मी माझ्या विद्यार्थी मित्रांना एकच आवाहन करतो की, आपल्या भारत देशासाठी जे जे करता येईल, ते आपण केले पाहिजे. संशोधन, आरोग्य, वैज्ञानिक क्षेत्रात असो भारत हा नंबर एकवर असायला हवा.

आपण कोरोना महामारी विरुद्ध जसा लढा दिला. त्या लढ्यामध्ये सर्वजण धर्म, जात आणि पंथ विसरून एकत्र आले. कोरोना महामारी जणू आपल्याला माणुसकी शिकवायला आली असावी.

असो, माणुसकी जपणारी आपण या 15 ऑगस्ट दिवशी नव्या स्वातंत्र्याचा आस्वाद घेऊया, मुक्त राहूया. या सृष्टीतील सर्वांनाच स्वातंत्र्याचा आस्वाद घेण्याचा अधिकार आहे तो देऊया. आपले आणि समाजाचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी सुसज्ज होऊया.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव घरोघरी तिरंगा मराठी निबंध (Swatantryacha Amrut Mahotsav Nibandh In Marathi)

पिंजऱ्यात अडकलेल्या पोपटाला,

स्वातंत्र्याचे महत्त्व कळाले,

अनेकांनी प्राणाचे बलिदान दिले,

तेव्हा हे स्वातंत्र्य मिळाले…

आज आपला भारत देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे पूर्ण झाले. हा क्षण साजरा करताना आपण 15 ऑगस्ट 2022 साली स्वातंत्र्याचा हर घर तिरंगा, घरोघरी तिरंगा असे आगळे वेगळे उपक्रम करत आपण अमृत महोत्सव साजरा केला.

देशातील लोकांमध्ये जाती-धर्माच्या नावाखाली भेदाभेद निर्माण करत, अज्ञान, आपापसात असलेले मतभेदाचा फायदा घेत इंग्रजांनी 150 वर्ष हुकूमत चालवली.

Swatantryacha Amrut Mahotsav Nibandh In Marathi – इंग्रज आपल्या देशातून केवळ संपत्तीची लूट करत होते असे नाही तर पिळवणूक देखील करत होते. असे चित्र असताना लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, सुभाष चंद्र बोस, सावरकर यासारखी अनेक मंडळीने परदेशात शिक्षण घेतले. आपण पारतंत्र्यात आहोत याची जाणीव होऊ लागली. यातूनच सर्वांनी जो संघर्ष केला, उठाव केला तो सर्व उठाव म्हणजे आपला स्वातंत्र्यलढा होय.

आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काहींनी अहिंसेचा मार्ग धरला तर काहींनी क्रांतीचा. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव अशी कित्येक नावे आहेत, ज्यांची स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हसत हसत आपल्या प्राणांचे बलिदान दिले. यासाठी आपण मिळालेल्या स्वातंत्र्याची किंमत समजून घेऊन आपला देश अधिक बळकट होण्यासाठी सर्वागीण प्रयत्न करायला हवेत.

आपला देश आर्थिक महासत्ता झाला पाहिजे. यासाठी आजच्या तरुणाईने त्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे. मोबाईल, टीव्ही, इंटरनेट यांचा उपयोग आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी केला पाहिजे.

आज बरेचसे विद्यार्थी सोशल मीडियाचा उपयोग नको त्या कामासाठी करत आहेत. जर आपण असेच चालू ठेवले तर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. पण आपण त्या स्वातंत्र्याची जाणीव ठेवली नाही असे होईल.

आपली तरुण पिढी खूप वेळ मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडियावर खर्च करत आहे. खरोखरच ही एक चिंतेची बाब आहे. तंत्रज्ञानाच्या चुकीच्या वापराने आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार आहेत. एकदा का आरोग्याचे प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात झाली, की आपल्या देशाचे रक्षण कोण करणार? सीमांचे रक्षण कोण करणार हे बळकट बाहू कोठून येणार? अशी कित्येक प्रश्न निर्माण होतील.

आपण बौद्धिक आणि शारीरिक आरोग्य मजबूत ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करूया, असा या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने संकल्प करूया. आपल्या देशाच्या महान व्यक्तींनी भारतासाठी जे स्वप्न पाहिले, ते पूर्ण करण्याचा भाग बनुया.

अंधश्रद्धा, बेरोजगारी, दहशतवाद, गुन्हेगारी आणि वाढती लोकसंख्या अश्या विविध समस्यांवर मात करत भारत देश सुजलाम सुफलाम बनविण्याचा निर्धार करूया.

जय हिंद! जय महाराष्ट्र !

सारांश

तर मित्रांनो आशा करतो की, भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव निबंध मराठी (Swatantryacha Amrut Mahotsav Nibandh In Marathi) तुम्हाला नक्कीच आवडले असेल. या निबंधाचा आधार घेत तुम्हीही स्वातंत्र्य दिवसावर निबंधलेखन करू शकता.

माझ्याकडून तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…