Talathi Bharti Information In Marathi – गावातील शेतजमिनीचा सात बारा, आठ अ अश्या महत्वपूर्ण व्यवहारांची नोंद करण्यासाठी महसूल विभाग अंतर्गत तलाठी काम करतो. साधारणपणे एक किंवा तीन गावांसाठी एक तलाठी नेमलेला असतो.
महाराष्ट्र शासनाकडून जमीन महसूल व्यवस्थेसाठी तलाठी पदाची भरती निघत असते. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, किंवा करणार असाल, तर तुमच्यासाठी ही माहिती फारच उपयुक्त ठरवणार आहे.
तलाठी हे एक महत्वाचे पद असून, तलाठी होण्यासाठी काय करावे लागते (Talathi Bharti Information In Marathi) त्यासाठी लागणारी आवश्यक पात्रता, परीक्षा आणि अभ्यासक्रम अश्या सर्व गोष्टींची आपण या लेखात माहिती जाणून घेणार आहोत.
तलाठी पदाची माहिती (Talathi Bharti Information In Marathi)

पद | तलाठी |
खाते | महसूल विभाग |
नियंत्रण | राज्य सरकार |
विभाग प्रमुख | जिल्हाधिकारी |
कार्यक्षेत्र | गाव पातळी |
मित्रांनो, तलाठी हे पद फार पूर्वीपासूनच चालत आलेले आहे. दिल्लीचे बादशहा शेर शाह सूरीच्या दरबारात राजा तोरडमल हे भू-अभिलेख मंत्री होते. त्यांनी जमिनीसंबंधी कामाच्या व्यवस्थेसाठी पटवारी पद निर्माण केले. यालाच मराठीत तलाठी असे म्हणतात.
यानंतर इ.स. 1814 साली ब्रिटिशांनी गावातील सरकारी हिशोब आणि दप्तर सांभाळण्यासाठी तलाठी या पदाची नव्याने निर्मिती करण्यात आली. पुढे इ.स. 1918 साली महाराष्ट्रात कुलकर्णी वतने समाप्त करून पगारी तत्त्वावर तलाठी पदे सुरू करण्यात आली.
यावरून तुमच्या लक्षात आले असेलच, की तलाठी हे पद फार पूर्वीपासूनच चालत आलेले आहे. आता देखील राज्य सरकार गावातील शेतजमीन संदर्भातील कामकाज सुरळीतपणे पार पाडण्यासाठी, तलाठी पदाची भरती करत असतो.
तलाठी यांची कामे काय असतात (Talathi Duties In Marathi)
साधारणतः एक ते तीन गावांसाठी एक तलाठी असतो. या सर्व गावांची गाव दप्तरे अद्ययावत ठेवण्याची जबाबदारी तलाठयावर असते. गावातील शेतजमिनीचा सात बारा, आठ अ अश्या महत्वपूर्ण दस्तऐवजाची नोंद तलाठ्याला करावी लागते. याव्यतिरिक्त तलाठी खालील कामे पार पाडतात.
1. ग्रामीण भागाच्या नोंदवह्या अद्ययावत ठेवणे, दैनंदिन कार्यावर लक्ष ठेवणे, गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन शासन आणि जनता यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून तलाठी काम करतो.
2. राज्य शासनाचा गाव पातळीवरील मूलभूत घटक म्हणून सरकार तलाठ्याला विविध परिपत्रके, शासन निर्णय, स्थायी आदेश, आणि सूचना देत असते.
3. नैसर्गिक आपत्तीची माहिती मंडळ अधिकारी आणि तहसीलदारला देण्याचे काम करतो.
4. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 154 नुसार नोंद करणाऱ्याने किंवा जिल्हाधिकाऱ्यांने कळवलेल्या बदलांचे नोंदवहीत विवरण घेणे.
5. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गावातील शिधापत्रिकांची सूची तयार करणे आणि ती गावकऱ्यांना उपलब्ध करून देणे.
Related – कलेक्टर म्हणजे काय ?
तलाठी होण्यासाठी काय करावे लागते (How To Become Talathi In Maharashtra)
शिक्षण | कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी |
वय मर्यादा | 18 ते 38 (मागास प्रवर्ग किंवा आरक्षित प्रवर्ग पाच वर्ष सूट) |
कागदपत्रे | दहावी आणि बारावीची गुणपत्रिका व प्रमाणपत्र Domicile Certificate MS-CIT प्रमाणपत्र जातीचा दाखला राखीव प्रवर्गानुसार प्रमाणपत्र |
वेतन | 25500 ते 81100 रुपये |
प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती असते. या निवड समितीकडून तलाठी (गट- क) या पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात येतात.
तलाठी परीक्षा बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाची असते. मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान आणि गणित व बुद्धिमत्ता अशा चार विषयाचे प्रत्येकी 25 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्न हा दोन गुणांचा असतो. हा पेपर सोडवण्यासाठी एकूण दोन तासाचा वेळ मिळतो.
Related – एमपीएससी परीक्षेची संपूर्ण माहिती
तलाठी भरती अभ्यासक्रम माहिती (Talathi Bharti Syllabus In Marathi)
1. मराठी – समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, काळ व काळाचे प्रकार, शब्दांचे प्रकार, नाम व सर्वनाम, क्रियाविशेषण, क्रियापद, विशेषण, विभक्ती, संधी व संधीचे प्रकार, म्हणी, वाक्प्रचारांचे अर्थ व उपयोग, शब्दसमूहाबद्दल एक शब्द
2. इंग्रजी – Vocabulary, Synonyms and Antonyms, Proverbs, Tense and kinds of Tense, Question tag, Use proper form of verbs, Spot the error, Verbal, Phrases comprehension, Passage, Spellings, Sentence, Structure, One word Substitutions.
3. सामान्य ज्ञान – महाराष्ट्राचा व भारताचा इतिहास, पंचायत राज व राज्यघटना, भारतीय संस्कृती, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, महाराष्ट्रातील समाज सुधारकांचे कार्य, भारताच्या शेजारील देशांची माहिती, चालू घडामोडी
4. गणित व बुद्धिमत्ता – अंकगणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ काम वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, चलन, मापनाची परिमाणे, घड्याळ, अंकमालिका, अक्षरमालिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध, वेन आकृती
या परीक्षेची तयारी करतांना सर्वात महत्वाचे म्हणजे मागील तलाठी भरती प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे. यासोबतच बौद्धिक चाचणी आणि इंग्रजीचा रोज सराव करणे. सामान्यज्ञान या विषयाची व्याप्ती खूप मोठी असल्यामुळे याकडे विशेष लक्ष द्यावे. बाकी मराठी व्याकरण तर आपण पाचवीपासून शिकत आहोत, त्याचा वेळोवेळी सराव करणे.
इत्यादी बाबी व्यवस्थित केल्यास तलाठी परीक्षा सहज पास होता येईल. लक्षात ठेवा, या परीक्षेला मुलाखत द्यावी लागत नाही, फक्त ही लेखी परीक्षा देऊन पास झाले, की तुमची नोकरी पक्की.
सारांश
तर मित्रांनो, या लेखात आपण तलाठी परीक्षेची सविस्तर (Talathi Bharti Information In Marathi) माहिती जाणून घेतली आहे. आशा करतो, की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल.
जर तुम्हाला हा लेख उपयुक्त वाटला असेल, तर तलाठी भरतीची तयारी करणार्या तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील याचा फायदा होईल.
बाकी तुम्हाला तलाठी किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची माहिती हवी असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा.
धन्यवाद…