महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोकनाट्य तमाशा

Tamasha Information In Marathi – भारताच्या विविध ठिकाणी विविध प्रकारचे लोकनाट्य प्रकार आहेत. यापैकी तमाशा हा एक महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध लोकनाट्याचा प्रकार आहे. हा लोकनाट्याचा प्रकार फार पूर्वीपासून अस्तित्वात आहे. जसे उत्तर आणि मध्य भारतात रामलीला, गुजरातमध्ये भवाई, बंगाल–बिहारमध्ये जात्रा, दक्षिण भारतात यक्षगान करतात. त्याचप्रकारे महाराष्ट्रात तमाशा हे लोकनाट्य सादर करतात.

तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी तमाशा पहिला असेल. कारण तमाशा हा गावागावात फिरून सादर करण्यात येतो. या लेखातून आपण महाराष्ट्राचे प्रसिद्ध लोकनाट्य तमाशा याविषयी माहिती मराठी (tamasha information in marathi) जाणून घेणार आहोत.

हा लेख जरूर वाचाप्रसिद्ध मराठी नाटक माहिती (old marathi natak name list)

महाराष्ट्रातील प्रसिद्ध लोकनाट्य – तमाशा माहिती मराठी (tamasha information in marathi)

tamasha information in marathi
विषय तमाशा
प्रकारमहाराष्ट्रातील परंपरागत लोकनाट्य
वापरण्यात येणारे प्रमुख वाद्यढोलकी आणि तुणतुणे

Tamasha Information In Marathi – तमाशा हा शब्द मूळ अरबी भाषेतून आला आहे, त्याचा अर्थ दृश्य, खेळ किंवा नाट्यप्रयोग असा आहे. गावातील जत्रा असल्यावर गावाच्या वतीने तमाशाचे आयोजन करण्यात येते. हल्ली नेत्यांच्या वाढदिवस आणि इतर कार्यक्रम साजरे करताना तमाशा आयोजित करण्यात येतो.

तमाशात काम करणारी पुरुषपात्रे नेहमीच्याच वेशात असतात, तर स्त्रीपात्रांची वेशभूषा शक्य तितकी आकर्षक आणि उद्दीपक असते. तमाशातले गायक, वादक, गायनात सूर देऊन साथ करणारा आणि नर्तकी सदैव मंचावरच असतात. या मंचाला तमाशाच्या भाषेत बोर्ड म्हणतात.

तमाशा करताना अनेक वाद्यांची गरज भासते. तमाशातले महत्त्वाची वाद्य म्हणजे ढोलकी आणि तुणतुणे, यांच्याशिवाय तमाशाला रंग येणार नाही. गायनाला ढोलकी, कडे, झांज, बाजाची पेटी आणि ट्रॅंगल यांची साथ असते.

हा लेख जरूर वाचाबोंगो ड्रम मराठी माहिती (Bongo instrument facts in marathi)

गण, गवळण याने तमाशाची सुरुवात होते तर तमाशाचा शेवट वगनाट्य सादर करून होते. तमाशाच्या एका खेळामध्ये गण-गौळण, बतावणी, फार्स, रंगबाजी आणि वग असे पाच प्रकारचे नाट्य असते. तमाशात खेळ या शब्दाचा अर्थ नाट्य प्रयोग असा आहे.

तमाशातील गण माहिती मराठी

गण म्हणजे गणपतीला केलेले आवाहन किंवा आरती. ही आरती करून तमाशाची सुरुवात करण्यात येते. तमाशाचा खेळ निर्विघ्न पार पडावा म्हणून तमाशाचा सरदार म्हणजे मालक हे आवाहन करतो. सर्व साथीदार चढ्या आवाजात ध्रुपद आळवतात आणि सुरत्ये ध्रुपदाचा अंतिम सूर झेलून उंचावर नेतात.

तमाशातील गौळण माहिती मराठी

गण संपल्यावर थोडा वेळ ढोलकी आणि कडे यांचे वादन होते. यानंतर तमाशातील स्त्रियांचे नृत्य होते आणि मग गौळणीची सुरूवात होते.

श्रीकृष्णाच्या गोकुळातील लीला हा गौळणीचा विषय असतो. नर्तकी या गोपी होतात आणि त्यांच्यामध्ये वयस्कर असणारी एक मावशी असते. या गोपी मथुरेला दूध, दही, लोणी वगैरे घेऊन जात असतात आणि वाटेत श्रीकृष्ण आणि त्याचे सवंगडी त्यांना अडवतो.

या वेळेस या दोन पक्षांमध्ये जे विनोदी संवाद होतात ते ऐकून प्रेक्षक खदखदून हसतात. ह्या गौळणी हास्य आणि शृंगार रसाने ठासून भरलेल्या असतात.

तमाशातील फार्सा माहिती मराठी

तमाशातील कलाकार एक नवीन नाट्यप्रयोग फार्साच्या रूपाने सादर करतात. फार्साचा विषय असा असतो की, गावातील लोक एकत्र जमलेले दाखवतात. हे जमलेले लोक बऱ्याच दिवसांनी भेटलेले असतात. त्यानंतर ते विविध विषय काढून प्रेक्षक वर्गाला हसवतात.

तमाशातील सवालजवाब माहिती मराठी

तमाशा मंचावर जर दोन फडांचे तमासगीर एकाच वेळी असतात. त्यांच्यांतील सरसनीरस ठरवताना आपाआपसात सवालजवाब होतात. हे सवाल जवाब बहुधा पौराणिक कथांवर आधारलेले कूटप्रश्न असतात. हे कुटप्रश्न एकमेकांना काव्यांतून विचारून त्यांची उत्तरे ओळखण्याचा हा कार्यक्रम असतो.

तमाशातील रंगबाजी माहिती मराठी

तमाशा मंचावर होणारे शृंगारिक लावण्यांचे सादरीकरण म्हणजेच रंगबाजी होय. मंचावर एकापेक्षा अधिक फडांचे तमासगीर असतात. त्या रंगबाजीला संगीतबारी असे म्हणतात. याबरोबरच गायक विविध प्रकारची लोकगीते सादर करतात.

तमाशा वगनाट्य माहिती मराठी

वग म्हणजे नाट्यरूपाने सादर केलेली कथा होय. ही कथा पौराणिक, ऐतिहासिक किंवा लोककथा यावर अवलंबून असते. या कथांमधील संवाद लिखित नसतो. नाट्यरूपात असलेल्या पात्रांनी ते स्वतःच्या बुद्धीने म्हणायचे असतात. वगनाट्य सादर केल्यानंतर तमाशाचा खेळ संपतो.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्रातील लोकनाट्य – तमाशा माहिती मराठी (tamasha information in marathi) जाणून घेतली. हा लेख तुम्हाला कसा वाटला ? हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

तमाशा म्हणजे काय ?

तमाशा हा शब्द मूळ अरबी भाषेतून आला आहे, तमाशाचा अर्थ दृश्य, खेळ किंवा नाट्यप्रयोग असा आहे.

तमाशात काम करणाऱ्या कलावंतास काय म्हणतात ?

तमाशात अनेक कलावंत काम करत असतात. ते पुढीलप्रमाणे.
1. गायक – गाणे गाण्यासाठी
2. वादक – वाद्ये वाजवण्याची
3. नर्तकी – तमाशातील नाच काम करणाऱ्या स्त्रीया
4. मावशी – गौळण करताना गोपिका सोबत असणारी वयस्कर बाई
5. सोंगाड्या – तमाशातील एक नकल करणारा कलाकार
6. नायकाचे एक पात्र असते.
7. खलनायकाचे एक पात्र असते.
8. सावकार हे एक पात्र असते.

तमाशातील मुख्य कथानक कोण असतो ?

तमाशातील मुख्य कथानक लेखक असतो. त्याला वग सम्राट असेही म्हणतात.

जुन्या काळी गाजलेला वग यादी

1. उमाजी नाईक
2. तंट्या भिल्ल
3. मिठाराणी
4. मोहना-छेलबटाऊ
5. शेठजीचे इलेक्शन
6. देशभक्त घोटाळे
7. खापऱ्या चोर
8. पुढारी सापडला

महाराष्ट्रातील उल्लेखनीय तमासगीर आणि त्यांचे फड यादी

1. तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर लोकनाट्य तमाशा मंडळ
2. काळू-बाळू
3. पठ्ठे बापू
4. रावराम जोशी
5. विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर
6. विठ्ठल उमप
7. होनाजी बाळा
8. गुलाबबाई संगमनेरकर
9. दत्ता महाडीक सह गुलाबराव बोरगावकर
10. लता – सुरेखा पुणेकर
11. तुकाराम खेडकर सह कांताबाई सातारकर
12. हरिभाऊ बडे नगरकर

कोणता तमाशा प्रसिद्ध होता ?

तुकाराम खेडकर आणि सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर हा तमाशा प्रसिद्ध होता.

महाराष्ट्रातील तमाशाचे केंद्र कोठे आहे ?

विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर हा प्रसिद्ध तमाशामुळे पुणे जिल्ह्यातील नारायणगाव हे महाराष्ट्रातील तमाशाचे केंद्र बनले आहे.