ताम्हिणी घाट पाहण्यासारखी ठिकाणे व माहिती

Tamhini ghat information in marathi – सह्याद्रीच्या पर्वत रांगातून जाताना लागणारा ताम्हिणी घाट अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे. घाटातील हिरवा परिसर, डोंगर माथ्यावर आलेले ढग, नागमोडी वळणे आणि मुळशी धरण असा परिसर पाहून मन अगदी आनंद होतो.

तलाव, जंगले, घाट आणि धबधबा पाहण्यासाठी लाखो पर्यटक या ठिकाणी येत असतात. या लेखातून आपण ताम्हिणी घाट पाहण्यासारखी ठिकाणे व माहिती (Tamhini ghat information in marathi) जाणून घेणार आहोत.

ताम्हिणी घाट पाहण्यासारखी ठिकाणे व माहिती (Tamhini ghat information in marathi)

Tamhini ghat information in marathi
नावताम्हिणी घाट
प्रकारसह्याद्री पर्वतातील घाट
ठिकाणपुणे गोवा महामार्गावर

महाराष्ट्रातील मुळशी आणि ताम्हिणी दरम्यान हा घाट आहे. येथील निसर्गरम्य ठिकाण, धबधबा, तलाव आणि जंगले लोकप्रिय आहेत. हा घाट आधी टाटा पॉवर कंपनीचा होता, त्यावेळी सर्व जणांसाठी खुला नव्हता. हा घाट भारतातील पाचवा ओला प्रदेश म्हणून ओळखला जातो.

पुण्यातील पश्चिम घाटाच्या शिखरावर ताम्हिणी घाट आहे. घाटावर वनस्पती, प्राणी, तलाव, धबधबे आणि बंधारे आहेत.

ताम्हिणी घाटात गेल्यावर अंधारबन ट्रेक स्टार्ट पॉइंट, मुळशी तलाव, तिकोना किल्ला, कोरीगड किल्ला, सुधागड किल्ला, पानशेत धरण, वरसगाव धरण, हडशी मंदिर, तेमघर धरण, लवासा सिटी पाहायला मिळतात.

अंधारबन ट्रेक स्टार्ट पॉइंट – याची उंची अंदाजे 2,160 फूट आहे. अंधार आणि वन या दोन शब्दापासून अंधारबन तयार झाला आहे. या ठिकाणी गडद जंगल असणारी पायवाट आहे. येथून जाताना देवकुंड धबधबा, प्लस व्हॅली आणि ताम्हिणी घाटाची सुंदर दृश्ये दिसतात.

मुळशी तलाव – मुळा नदीवर मुळशी तलाव आणि धरण आहे. या ठिकाणी ट्रेकिंग, सुंदर पक्षी, परिसर आणि या परिसरात फोटो काढण्यासाठी पर्यटक येतात.

पुण्यापासून कामशेत गावाजवळ तिकोना किल्ला आहे. यावर 3500 फूट त्रिकोणी आकाराची टेकडी आहे.

ट्रेकिंगचा शौक असणारे तिकोना किल्ला, कोरीगड किल्ला, सुधागड किल्ला पाहण्यासाठी आवर्जून जातात.

पुण्यात पानशेत धरण, वरसगाव धरण, तेमघर धरण आहे. या ठिकाणी तुम्ही जलक्रीडा करू शकता.

लवासा एक सुनियोजित खाजगी शहर असून ते पुणे शहराजवळ बनवले जात आहे. पंचवीस हजार एकर जागेतील ही परियोजना हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारा विकसित केली जात आहे. अतिशय निसर्गरम्य असे वातावरण येथे पाहायला मिळते.

ताम्हिणी घाट जाण्याची व राहण्याची सोय (tamhini ghat information in marathi)

हा प्रदेश वर्षभर हिरवागार असून येथील वार्षिक सरासरी तापमान 19 ते 33 अंश सेल्सिअस इतके आहे. या ठिकाणी हिवाळा अतिशय तीव्र स्वरूपाचा असतो. पण जुलै ते सप्टेंबर या महिन्यात तुम्ही ताम्हिणी घाटाला भेट देऊ शकता.

ताम्हिणी घाट पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी जाण्यासाठी अनेक बस, खासगी गाड्या, रेल्वे मार्ग उपलब्ध आहेत.

ताम्हिणी घाटात फिरायला गेल्यावर राहण्यासाठी अनेक रिसॉर्ट व हॉटेल्स आहेत. या ठिकाणी तुम्ही मुक्काम करू शकता.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण ताम्हिणी घाट पाहण्यासारखी ठिकाणे व माहिती (Tamhini ghat information in marathi) जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ? हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

ताम्हिणी घाट कोणत्या जिल्ह्यात आहे ?

ताम्हिणी घाट हा भारतातील महाराष्ट्रातील मुळशी आणि ताम्हिणी दरम्यान स्थित डोंगर रस्ता आहे.

ताम्हिणी घाट पाहण्यासारखी ठिकाणे कोणती आहेत ?

ताम्हिणी घाटात गेल्यावर अंधारबन ट्रेक स्टार्ट पॉइंट, मुळशी तलाव, तिकोना किल्ला, कोरीगड किल्ला, सुधागड किल्ला, पानशेत धरण, वरसगाव धरण, हडशी मंदिर, तेमघर धरण, लवासा सिटी पाहायला मिळतात.

पुढील वाचन :

  1. आंबोली घाट माहिती मराठी
  2. महाराष्ट्रातील सुहाना सफर माळशेज घाट
  3. कैगल धबधबा माहिती मराठी
  4. तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण माहिती मराठी
  5. जायकवाडी धरण विषयी माहिती

Leave a Comment