Tarkarli beach information in marathi – तारकर्ली हे कोकणातील अरबी समुद्राच्या किनार्यावरील पर्यटन स्थळ आहे. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण हे निसर्गरम्य गाव वसले आहे. मुंबईपासून 546 किमी अंतरावर तारकर्ली हे ठिकाण आहे.
मालवण शहराच्या दक्षिणेला 8 किमी अंतरावर तारकर्ली आहे. या ठिकाणी तुम्ही कर्ली नदी आणि अरबी समुद्राचा संगम पाहू शकता.
अतिशय स्वच्छ व सुंदर असा समुद्रकिनारा आणि खाडी ह्यांच्या अनोख्या संगमातून तयार झालेले अद्भूत सौंदर्य तारकर्ली या ठिकाणी पाहता येते. या साठी जगातील सर्वात स्वच्छ व सुंदर बीच म्हणून या बीचला मान्यता मिळाली आहे.
तारकर्ली किनार्यावर गेल्यानंतर स्वर्गाचा अनुभव येतो. येथे अतिशय सुंदर असणारा अरबी समुद्रकिनारा, बांबूची आणि सुपारीची झाडे मन प्रसन्न करणारी आहे. तारकर्ली या ठिकाणी समुद्र किनारे एवढे नितळ, स्वच्छ आहेत की पाण्यातील सौदर्य अगदी सहज पाहता येते.
हे सौंदर्य पाहून मन प्रसन्न होऊन जाते. रोजच्या जीवनातील गर्दीपासून दूर आणि निवांत क्षण घालवण्यासाठी तारकर्ली याला नक्की भेट द्यायला हवी.

या लेखात आपण तारकर्ली पर्यटन स्थळे – tarkarli beach information in marathi या विषयी जाणून घेणार आहोत.
तारकर्ली पर्यटन स्थळे – tarkarli beach information in marathi

नाव | तारकर्ली |
ठिकाण | तारकर्ली, सिंधुदुर्ग महाराष्ट्र |
अधिकृत भाषा | मराठी |
हवामान | सरासरी 28 डिग्री सेल्सिअस |
1. महाराष्ट्र राज्याला 720 किलोमीटर लांबीची सागरी किनारपट्टी लाभली आहे, त्यापैकी प्रचंड लांबीच्या कोंकण किनारपट्टीवर पर्यटनासाठी पर्यटक येतात. या ठिकाणी मालवण मधील तारकर्ली हे निसर्गाच्या व सागराच्या सानिध्यात वसले आहे.
2. मालवणपासून अगदी 7 किलोमीटरवर तारकर्ली बीच आहे, स्कुबा डायव्हिंग – tarkarli Scuba diving आणि चटकदार पद्धतीने जेवण येथील वैशिष्ट्य आहे.
3. कोंकण किनाऱ्यावर आपले जीवन चालवणारे कोळी समाज आणि त्यांची जीवनशैली जवळून पाहता येते अर्थात हा एक रंजक अनुभव येईल.
4. तारकर्ली हे महाराष्ट्र राज्यातील एक सुंदर गाव आहे.
5. या ठिकाणी तुम्हाला विविध प्रकारची खाण्याची व राहण्याची व्यवस्था उपलब्ध आहे.
6. येथील बरीच हॉटेल्स आणि बीच रिसोर्ट सागरी किनाऱ्यावर वसलेली आहेत, त्यामुळे पर्यटकांना अगदी 24 तास नयनरम्य परिसरात राहता येते.
7. विशेष सेवा-सुविधा आणि आराम यासाठी MTDC बीच रिसोर्टच्या झोपड्या (Konkani Huts) उपलब्ध आहेत.
8. त्यामुळे पर्यटकांना राहण्याची काहीच अडचण येत नाही.तारकर्ली पाहण्यासारखी ठिकाणे
9. तारकर्ली किनारा म्हणजे एक स्वर्गच आहे, कारण येथे विस्तीर्ण पसरलेला समुद्रकिनारा, निळेशार पाणी, कोवळे उबदार उन आणि अलगद पायांना कोमल स्पर्श करणारी मऊ वाळू यामुळे जणू आपण नवीन जगात आल्यासारखं वाटतं.
10. या ठिकाणी समुद्रकिनारा बरोबरच बांबूची, सुपारीची झाडे पाहायला मिळतात.
11. या ठिकाणी समुद्रकिनारे इतके स्वच्छ आणि नितळ आहे की पाण्यातील जीवांचे सौदर्य अगदी साध्या डोळ्यांनी पाहायला मिळते.
12. निळेशार पाणी आणि क्षितिजापर्यंत पसरलेला समुद्रकिनारा रोजच्या जीवनातील ताणतणाव दूर करतो.
13. येथील समुद्रसफारी पाहण्यासारखी आहे यामध्ये तुम्ही डॉल्फीन पॉईंट, गोल्डन रॉक, संगम आणि सुनामी आयलंड हे चार पॉईंट पाहा.
14. कर्ली नदी आणि अरबी समुद्राचा जिथे संगम होतो, त्याला संगम पॉईंट असे नाव देण्यात आले आहे.
15. बहुतेक सगळ्या बोटी कर्ली नदीतूनच सुटतात.नदीच्या शांत पाण्यातून समुद्राच्या लाटांमध्ये जातांना एक वेगळाच अनुभव अनुभवायला मिळतो.
16. इथे हमखास डॉल्फीन दिसतात असे म्हणतात.
17. संगम पॉईंटवर छोटे-छोटे मासे सहज सापडतात, त्यामुळे या भागात डॉल्फीन मोठ्या प्रमाणावार दिसून येतात.
18. संगम पॉईंटच्या समोरच गोल्डन रॉक आहे.समुद्रात असलेल्या या मोठ्या कातळावर सूर्यप्रकाश पडला की तो सोनेरी दिसतो म्हणून त्याला गोल्डन रॉक म्हणतात.
19. या पॉईंटपासून सगळ्या बोटींचा परतीचा प्रवास सुरू होतो.
20. तुम्ही बोट चालवणार्याला एक्स्ट्रा पैसे दिले किंवा विनंती केली तर तो तुम्हाला जवळच असलेल्या निवती आणि भोगवे बीचवर घेऊन जाऊ शकतो.
21. हे दोन बीच अगदी खर्या अर्थाने निर्मनुष्य आहेत.भोगवे बीचवर ‘श्वास’ या चित्रपटातील काही प्रसंग शूट करण्यात आले आहेत.
22. गोल्डन रॉकवरून बोटीचा परतीचा प्रवास सुरू होतो.
23. परतीच्या प्रवासातला शेवटचा पॉईंट म्हणजे त्सुनामी आयलंड.
तारकर्ली मराठी माहिती – Tarkarli places to visit

24. तारकर्ली येथे पोहोचल्यावर समुद्राची गाज ऐकून, समुद्राच्या फेसाळत्या लाटा पाहून, रुपेरी, स्वच्छ वाळूचा किनारा पाहून पर्यटक सगळा शीण, ताणतणाव विसरतात.
25. तारकर्लीत बीचवर समुद्रस्नानाचा, सूर्यास्ताचा आनंद घेऊन पर्यटक सुखावतात.
26. छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी दाखविणार्या सिंधुदुर्ग किल्याला भेट देता येते.
27. मालवण जेट्टीवरून सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी बोटी सुटतात.
28. किल्ल्यावर तटबंदीमध्ये शिवाजी महाराजांच्या पायांचे ठसे पाहता येतील.
29. किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे जगातील एकमेव मंदिर पहावयास मिळते. येथे त्यांची तलवारही ठेवलेली आहे.
30. राणीची वेळा हे राण्यांचे समुद्र स्नानाचे ठिकाणही पाहता येते.
31. किल्ला फिरून झाल्यावर पुन्हा जागेवर आणून सोडतात.
32. जेट्टीवरून स्कुबा डायव्हिंग व स्नॉर्केलिंग करण्यासाठी दुसर्या बाजूने बोटी सुटतात. या ठिकाणी स्कुबा डायव्हिंग व स्नॉर्केलिंगचा आनंद घेता येतो.
33. मालवणपासून साधारण 11 किलोमीटरवर देवबाग आहे.
34. कुसुमाग्रजांच्या कवितेचे मूर्तीमंत उदाहरण जणू. मानवाचे ध्येय आणि आसक्ती ही उत्तुंग आहे. समुद्राला मात्र किना-याचे बंधन आहे.
35. प्रत्येक वर्षी पावसाळयात समुद्राचे पाणी सगळे गाव धुवून काढून कर्ली नदीत मिसळते. यामध्ये गावाचे अपरिमित नुकसान होते.
36. तारकर्लीप्रमाणेच चिवला बीचही अतिशय सुंदर आहे.
37. येथे खाडी व समुद्राचा संगम पाहता येतो. चिवल्याला महाराष्ट्र पर्यटन महामंडळाने अधिकृत निवास आणि जेवणासाठी सुविधा केल्या आहेत.
38. या ठिकाणी आता देवबागसारखे वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्यात आले आहेत.
39. देवबाग येथेही राहण्याच्या सुविधा केल्या आहेत.
40. अशा या वातावरणात एकदा तरी भेट द्या.
तारकर्ली कसे पोहचाल – How to reach Tarkarli
तारकर्ली कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. मालवणपासून अगदी सात किलोमीटर इतके अंतर आहे. तारकर्लीमध्ये येणाऱ्या पर्यटकांना वेगवेगळी हॉटेल आणि निवासाचीही उत्तम व्यवस्था आहे.
सी-फूड हे इथले वैशिष्ट. तारकर्ली मुंबईपासून 540 किलोमीटर अंतरावर आहे. येथून रेल्वे आणि विमानाने सुद्धा जाऊ शकता.
गोव्याचा दाबोलीम जवळचा विमानतळ आहे.
ट्रेनने येण्यासाठी कुडाळ जवळचे स्टेशन असून तारकर्लीपासून कु़डाळ 45 किलोमीटर अंतर आहे.
हे देखील वाचा
- ठोसेघर धबधबा मराठी माहिती – thoseghar waterfall information in marathi
- आंबोली घाट माहिती – amboli waterfall information in marathi
- मुंबई पर्यटन स्थळ तारापोरवाला मत्स्यालय – taraporewala aquarium
सारांश
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण तारकर्ली पर्यटन स्थळे – tarkarli beach information in marathi जाणून घेतली. तारकर्ली पर्यटन स्थळे – tarkarli beach information in marathi तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.