चहाविषयी आश्चर्यकारक रोचक तथ्य मराठी

Tea Intresting facts in marathi – जगात पाण्यानंतर सर्वात जास्त प्यायले जाणारे पेय म्हणजे कडक चहा 😎 चहा पिल्यानंतर ज्यांच्या दिवसाची सुरूवात होते, असे चहा प्रेमी प्रत्येक देशात पाहायला मिळतात. या प्रेमींसाठी चहा अमृतासमान आहे.

आपल्या देशात चहा हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळेच तर भारतातील प्रत्येक गल्ली आणि नाक्यावर आपल्याला चहाच्या टपऱ्या पाहायला मिळतात.

जगात चहा बनविण्याच्या आणि पिण्याच्या अनेक पद्धती प्रचलित आहेत. या लेखातून आपण चहा विषयी आश्चर्यकारक रोचक तथ्य (Tea Intresting facts in marathi) जाणून घेणार आहोत.

चहा माहिती मराठी (tea information in marathi)

Tea Intresting facts in marathi
नावचहा
इतर नावेचहा, छा, चा, चाय
शास्त्रीय नावकॅमेलिया सिनेन्सिस
प्रकारकृषी उत्पादन
उपयोग पेय

चहा ही एक वनस्पती आहे. या वनस्पतीच्या पानांपासून भुकटी बनवली जाते. या भुकटीला पाण्यात उकळून पाणी किंवा दूध यांच्यासोबत मिसळून एक पेय बनविले जाते. या पेयास चहा असे म्हणतात.

चहा हे पाण्यानंतर जगातील लोकप्रिय पेय आहे. चहाचा शोध लागण्याच्या दोन कथा आहेत. त्यातील पहिला कथा अशी, एक चिनी शासक शेन नुंग बागेत बसून गरम पाणी पीत होते. यावेळी एका झाडाचे एक पान त्या गरम पाण्यात पडले, त्यामुळे त्याचा रंग बदलला आणि चांगला वासही आला.

या पाण्याचा आस्वाद घेतल्यानंतर राजाला त्याची चव खूप आवडली. त्यामुळे राजा दररोज ते पान गरम पाण्यात उकळून प्यायला लागला. यातूनच चहाचा शोध लागला.

दुसऱ्या कथेनुसार, सहाव्या शतकात एक भारतीय बौद्ध भिक्षू चीनच्या हुनान प्रांतात न झोपता ध्यान करायचे. झोप न यावी म्हणून ते एका विशिष्ट वनस्पतीची पाने चघळत. हीच वनस्पती पुढे चालून चहाची वनस्पती म्हणून ओळखली जाऊ लागली.

या दोन्ही कथेवरून असे आढळते की, चहाचा शोध चीनमध्येच लागला. चिनी भाषांत चहाला छा असे म्हणतात, यातूनच जगभरात चहा आणि चाय हे नाव प्रचलित झाले.

चहा उत्पादन माहिती मराठी (tea production in marathi)

जगातील सर्वाधिक चहा उत्पादन करणारा देश चीन आहे. चीननंतर चहाचे सर्वाधिक उत्पन्न भारत देशात घेतले जाते. याव्यतिरिक्त आफ्रिका, जपान, तैवान, दक्षिण आणि मध्य अमेरिका, श्रीलंका, युनायटेड स्टेट्स, बांगलादेश, इराण, इंडोनेशिया, मलेशिया आणि नेपाळ या देशात चहाचे उत्पादन घेतले जाते.

जगातील दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चहा उत्पादक देशात चहाचे चांगले उत्पादन घेतले जाते. देशातील एकूण उत्पादनाच्या 95% उत्पादन आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ राज्यात घेतले जाते.

भारतातील आसाम हे चहा उत्पादनात देशातील सर्वात मोठे राज्य आहे. तमिळनाडूच्या निलगिरी टेकड्या चहाच्या उत्पादनासाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. केरळचे मुन्नार हिल स्टेशनवर मोठ्या प्रमाणात चहाच्या बागा आहेत. हिमाचल प्रदेशच्या कांगडा प्रदेशात देखील याचे उत्पादन घेतले जाते.

चहा विषयी आश्चर्यकारक रोचक तथ्य (Tea Intresting facts in marathi)

चहाचे विविध प्रकार तुम्हाला माहीत असतील. पण तुम्हाला माहीत आहे का ? सर्व प्रकारचा चहा हा एकाच प्रजातीच्या झाडापासून तयार झालेला असतो. चहाच्या वनस्पतीच्या पानांची कापणी केल्‍यानंतर त्यावर करण्यात येणाऱ्या प्रक्रियावरून हा ठरत असतो.

Da Hong Pao हा चीनमधील एक चहाचा प्रकार असून, याची किंमत सोन्याहून अधिक आहे. हा चहा ज्या पानांपासून बनतो ती पाने अत्यंत दुर्मिळ असून, एका किलोची किंमत 9,81,66,600 रुपये इतकी आहे.

ग्रीन टी पिल्याचे अनेक फायदे आहेत. जसे की घसा खवखवणे, हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी तसेच रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर आहे.

युनायटेड किंग्डम, तैवान, चीन, भारत, रशिया या देशात सर्वाधिक चहा पितात. भारत देशात कॉफीपेक्षा चहा पिणारे अधिक आहे. जपानमध्ये आहाराचा भाग म्हणून ग्रीनटीचे सेवन केले जाते.

चहाचे उत्पादन करण्यासाठी समुद्रसपाटीपासून 3000 ते 7000 फूट उंचीच्या ठिकाणी याची लागवड केली जाते. तसेच इतर पिकांच्या तुलनेत चहाचे पीक शेतकऱ्यांसाठी मौल्यवान पीक ठरते.

जगभरात चहाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या देशांमध्ये चीन, जपान, तैवान, श्रीलंका, भारत आणि केनिया इत्यादींचा समावेश होतो.

अमेरिकेतील 85% लोक थंड चहा पिणारे आहेत यामुळे यूएसमधील बहुतेक ठिकाणी चहाची दुकाने आइस्ड टीची विक्री करतात.

चहामध्ये कैफिन आणि टैनिन हा घटक असतो, यामुळे आपल्या शरीरात स्फुर्ती येते. तसेच चहात एंटीजन असतात, यामुळे आपली एंटी-बॅक्टेरियल क्षमता वाढते.

डोक्याला शांत व चपळ ठेवण्यास मदत अमिनो-एसिड तसेच हाडांना मजबूत करणारा आणि दातांना कीड लागण्यापासून वाचवणारा फ्लोराईड चहामध्ये असतो.

सारांश

या लेखातून आपण चहाविषयी आश्चर्यकारक रोचक तथ्य (Tea Intresting facts in marathi) याविषयी मराठीत माहिती जाणून घेतली. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

जगातील सर्वाधिक चहा उत्पादन करणारा देश कोणता आहे ?

जगातील सर्वाधिक चहा उत्पादन करणारा देश चीन हा आहे.

जागतिक उत्पादनाच्या किती टक्के चहा भारतात उत्पादित केला जातो ?

जागतिक उत्पादनाच्या 31 टक्के चहा भारतात उत्पादित केला जातो.

भारतात चहाचे उत्पादन कोण कोणत्या राज्यात होते ?

भारतात चहाचे उत्पादन पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या राज्यात होते.

भारतात चहा उद्योगाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ?

भारतात चहा उद्योगाची सुरुवात इसवी सन 1835 या वर्षी झाली.

पुढील वाचन :

  1. भारतातील कुटिरोद्योग माहिती मराठी
  2. भारतातील प्रमुख पिके व त्यांच्या जाती माहिती
  3. जैवविविधता जपणे का आवश्यक आहे ?
  4. पर्यावरणीय प्रदूषणाचे प्रकार व उपाय माहिती
  5. चहाचे पाच प्रकार आणि त्यांचे विविध फायदे

Leave a Comment