जंगली प्राणी माहिती मराठी – वाघ एक प्रकारचा वन्य प्राणी आहे. ज्याच्या शरीराचा रंग पिवळा आणि नारंगी असतो. आणि त्यावर काळ्या रंगाचे ठिपके असतात. वाघ हा एक मांसाहारी प्राणी आहे जो इतर पशुपक्ष्यांची शिकार करून आपले पोट भरतो. वाघ खूप वेगाने धावू शकतो. वाघाची शिकार कुणीच करू शकत नाही.
शाळेत असताना आपल्या प्रत्येकाच्या एकदातरी हा प्रश्न विचारला जातो – वाघाची महिती द्या ? आजच्या या लेखामध्ये आपण वाघ विषयी काही आश्चर्यकारक रोचक तथ्य Tiger information in marathi जाणून घेणार आहोत.
वाघ विषयी काही आश्चर्यकारक रोचक तथ्य (Tiger information in marathi)

नाव | वाघ |
वाघाचे शास्त्रीय नाव | पँथेरा टायग्रिस |
वंश | कणाधारी |
जात | सस्तन |
वर्ग | मांसभक्षक |
कुळ | मार्जार कुळ |
माहेरघर | भारत देश |
1. पूर्ण जगामध्ये जवळजवळ 70 टक्के वाघ भारतामध्ये आढळतात. सन 2006 मध्ये फक्त चौदाशे वाघ जिवंत होते. परंतु आता त्यांची संख्या वाढत चालली आहे. 2016 मध्ये यांची संख्या 3890 झाली होती.
2. वाघ पूर्ण जगातील मांजर प्रजाती मधील सर्वात मोठा प्राणी आहे.
3. पृथ्वीवरील सर्वात मोठ्या मांसाहारी प्राण्यांमध्ये वाघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर झूबी अस्वल आणि दुसऱ्या क्रमांकावर अस्वलच आहे.
4. वाघाच्या जन्मानंतर एक आठवडा पूर्णपणे अंध असतो. ज्या मधील अर्धे वाघ हे पूर्ण वयस्क होण्याआधीच मृत्युमुखी पडतात.
5. वाघाच्या जन्मानंतर दोन वर्षापर्यंत पिलांची देखभाल फक्त मादा करते.
6. आपल्या मानवी बोटाच्या निशाणा प्रमाणे वाघाच्या शरीरावरील पट्टे सुद्धा वेगवेगळे असतात.
7. वाघाची रात्रीच्या वेळी पाहण्याची क्षमता मनुष्याच्या तुलनेने जवळ जवळ सहा पटीने चांगली असते.
8. वाघाचा डरकाळी फोडण्याचा आवाज खूप तेज असतो. हा आवाज आपण तीन किलोमीटर दूर अंतरावरून सुद्धा ऐकू शकतो.
9. वाघ हा 90 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावू शकतो.
10. वाघ हा जवळजवळ आठ मीटर लांब आणि पाच मीटर उंच उडी मारू शकतो.
वाघ मराठी माहिती – Tiger information in marathi

11. वाघाची शरीररचना इतकी मजबूत असते की त्याच्या मृत अवस्थेत सुद्धा वाघ काही वेळासाठी उभा राहू शकतो.
12. वाघाचे पाठीमागचे पाय पुढच्या पायांपेक्षा लांब असतात.
13. जास्त करून वाघांचे डोळे पिवळे असतात. परंतु पांढऱ्या वाघांचे डोळे जास्त करून निळे असतात.
14. वाघ साधारणपणे दहा ते पंधरा वर्षे जगतो. परंतु काही विशेष परिस्थितीमध्ये वाघ पंचवीस वर्षापर्यंत जिवंत राहू शकतो.
15. वाघाची डरकाळी खूप मोठी असते. वाघ नेहमी आपल्या दुरवरच्या वाघाबरोबर संवाद साधण्यासाठी डरकाळी फोडतात. वाघाचा आवाज ऐकला की जंगलात राहणाऱ्या प्रत्येक प्राण्यावर संकट आल्यासारखे वाटते.
16. जंगली वाघाला खूप लवकर भूक लागते. आणि जर वाघ दोन-तीन आठवडे भुकेलेला राहिला तर त्याचा मृत्यू होऊ शकतो. परंतु एक सामान्य व्यक्ती अशा काळात सुद्धा 30 ते 40 दिवस जिवंत राहू शकतो.
17. वाघ इतर जनावरांच्या आवाजाची नक्कल सुद्धा करू शकतो. भक्ष्याला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी हा एक चांगला पर्याय त्याच्याकडे आहे.
18. वाघ आपल्या शिकारला गळा धरून मारतो. याशिवाय गळ्याची नस तुटल्यानंतर रक्ताच्या कमी मुळे सुद्धा शिकार मरते.
19. वाघाचे दहा सेंटीमीटर चे दात खूप मजबूत असतात.
20. असं म्हणतात की जर आपण वाघाकडे पहात असलो तर वाघ आपल्यावर हल्ला करेल याची शक्यता खूप कमी असते.

21. असं म्हणतात की वाघाला दहा ते वीस प्रयत्नानंतर फक्त एका वेळी शिकारीला सफलता भेटते.
22. वाघ कोणत्याही शिकार ला खाण्यासाठी कधीही इतरांबरोबर भांडत नाही. तो आपली वेळ येण्याची वाट बघत बसतो.
23. माणसाच्या तुलनेने वाघाची लक्षात ठेवण्याची क्षमता 30 टक्के जास्त असते.
24. वाघाच्या मेंदूचे वजन 300 ग्रॅम असते.
25. एक वयस्क वाघ एका वेळी चाळीस किलो मांस खाऊ शकतो. यानंतर तो चार ते पाच दिवस शिकार करत नाही.
26. वाघाचे लॅटिन नाव “Panthera Tigris” आहे.
27. पूर्ण जगामध्ये वाघाला शक्तीचे प्रतीक मानतात.
28. भारताशिवाय वाघ हा बांगलादेश, मलेशिया आणि दक्षिण कोरिया चा राष्ट्रीय प्राणी आहे.
29. भारतामध्ये वाघाच्या शिकारीवर बंदी आहे. याशिवाय त्याच्या शरीराच्या कोणत्याही भागाची विक्री करणे हा कायद्याने गुन्हा आहे.
30. वाघाच्या प्रति जागरूकता वाढविण्यासाठी दरवर्षी 29 जुलै हा दिवस वर्ल्ड टायगर डे या नावाने साजरा केला जातो.
31. साइबेरियन टाइगर (Siberian Tiger) हा सर्वात मोठा वाघ आहे.
32. वाघाची शेपटी त्याच्या शरीराच्या एक तृतीयांश असते. ही त्याला पळताना संतुलन राखण्यासाठी मदत करते.
33. वाघ दिवसातील सोळा तास झोपण्या मध्ये घालवतो.
34. वाघाचा गर्भधारण काळ साडेतीन महिन्यांचा असतो. मादा वाघ एका वेळी तीन ते चार पिल्लांना जन्म देतो.
35. वाघाच्या पंजाच्या निशानीला pug mark म्हणतात.
36. वाघांचे प्रकार पुढीप्रमाणे आहेत.
- इंडोचायनीज वाघ
- मलेशियन वाघ
- सुमात्रन वाघ
- सायबेरियन वाघ
- दक्षिण चिनी वाघ
- पांढरा वाघ
- बाली वाघ
- कॅस्पियन वाघ
- जावन वाघ
37. मलेशियाचे राष्ट्रीय चिन्ह वाघ आहे.
हे देखील वाचा
- गौताळा वन्यजीव अभयारण्य – gautala wildlife sanctuary
- भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य – bhimashankar wildlife sanctuary
- आंबोली घाट माहिती – amboli waterfall information in marathi
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
वाघ किती वर्षे जगतो?
वाघ साधारणतः 25 वर्षे जगतो.
कोणत्या वर्षी टायगर प्रोजेक्ट सुरू झाला ?
इसवी सन 1973 या वर्षापासून टायगर प्रोजेक्ट सुरू झाला.
वाघाच्या घराला काय म्हणतात ?
वाघाच्या घराला गुहा म्हणतात.
वाघांची महाराष्ट्रातील संख्या किती आहे?
वाघांची महाराष्ट्रातील संख्या 312 आहे.वाघांच्या संख्येत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे.
वाघांची व्याघ्र गणना किती वर्षातून केली जाते ?
दर चार वर्षानी वाघांची गणना वर्षातून केली जाते.
हिंस्र प्राणी माणसाच्या वस्तीत का येतात ?
मानव झपाट्याने विकास करत आहे. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करत आहे. त्यात औद्योगिकीकरण आणि शहरीकरण वाढत आहे. त्यामुळे जागेची टंचाई निर्माण होत आहे. त्यावर उपाय म्हणून मानव बेसुमार जंगलतोड करत आहे. त्यामुळे जंगलात राहणाऱ्या वन्यजीवांचे हाल होत आहे. त्यांचा निवारा मानव ओढून घेत आहे.
यामुळें हिंस्र प्राणी माणसाच्या वस्तीत येतात.
स्वतःचा निवारा स्वतः तयार करणारे कोणकोणते प्राणी आहेत ?
शिंपी, चिमणी, सुगरण हे पक्षी स्वतःचा निवारा स्वतः तयार करतात.
मधमाश्या, घुशी आणि उंदीर आपापल्या सोयीने घर बनवतात.
अश्या प्रकारे संकटापासून बचाव करता येईल अशी सुरक्षित जागा,उन, वारा, पाऊस यांच्यापासून रक्षण होईल असा निवारा सर्वच प्राणी तयार करतात.
सारांश

तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण वाघ विषयी काही आश्चर्यकारक रोचक तथ्य (Tiger information in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.