तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण माहिती मराठी

Toranmal information in marathi – नंदुरबार जिल्ह्यातील एक निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले तोरणमाळ पाहण्यासाठी पर्यटक नेहमीच गर्दी करतात. हे पर्यटनस्थळ महाराष्ट्र राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे उंचावर असलेले थंड हवेचे ठिकाण मानले जाते.

या पर्यटन स्थळाजवळ कोणतेच मोठे शहर नाही, त्यामुळे येथे पर्यटकांची गर्दी कमी असते. शांत वातावरणात फिरणे पसंत करणारे पर्यटक तोरणमाळला येणे पसंत करतात.

या लेखातून आपण तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण माहिती मराठी (Toranmal information in marathi) जाणून घेणार आहोत.

तोरणमाळ माहिती मराठी (Toranmal information in marathi)

Toranmal information in marathi
नावतोरणमाळ
प्रकारथंड हवेचे ठिकाण
ठिकाणनंदुरबार
पाहण्यासारखी ठिकाणेसीता खाई
कमळ सरोवर
यशवंत तलाव
मच्छिंद्रनाथ गुहा
आवासबारी पॉइंट
खडकी पॉइंट
तोरणा देवी मंदिर

नंदुरबारमधील अक्राणी तालुक्यात असलेले तोरणमाळ सातपुडा पर्वताच्या तिसऱ्या व चौथ्या रांगेत आहे. हे ठिकाण अतिदुर्गम भागात आहे. यामुळे येथे कोणतेही मोठे शहर नाही. त्यामुळे तोरणमाळ अधिकच शांत आणि रम्य वाटते.

तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यातील एक छोटे पठार असून महाराष्ट्रातील कमी ज्ञात ठिकाणांपैकी एक आहे. यामुळे येथे शांत आणि कमी गर्दीचे असते. उंची आणि भौगोलिक वातावरणाने येथील नैसर्गिक सौंदर्य व सुखकारक हवामान अधिकच खुलते.

महाराष्ट्र राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे उंचावर असलेले थंड हवेचे ठिकाण असून समुद्रसपाटीपासून याची उंची 134 मी इतकी आहे. थंड हवेचे ठिकाण असल्याने येथे स्ट्राॅबेरीची लागवड केली जाते. यामुळे येथे सिझनमध्ये मोठ्या प्रमाणात स्ट्राॅबेरी मिळते.

तोरणमाळला गोरक्षनाथांचे मंदिर आहे. महाशविरात्रीला मध्यप्रदेश, गुजरात व महाराष्ट्रातील सुमारे दीड लाख भाविक भक्त दर्शनासाठी येतात. तसेच 31 डिसेंबरला नवीन वर्ष साजरे करण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणावर गर्दी असते.

तोरणमाळच्या उंच ठिकाणाहून एकच रस्ता सात वेळा वळताना दिसतो. हा रस्ता पाय-यांप्रमाणेे दिसतो. त्यामुळे याला सात पाय-यांचा घाट असे म्हंटले जाते.

तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण माहिती मराठी (toranmal hill station information in marathi)

तोरणमाळ हे एक निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण असून येथे यशवंत तलाव, सीता-खायी दरी तसेच अतिशय हिरवेगार नैसर्गिक सोंदर्य, डोंगर, दऱ्या-खोऱ्या, धबधबे इत्यादी पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.

सीता खाई हे ठिकाण तोरणमाळपासून साधारण 3 किमी अंतरावर आहे. या ठिकाणी एक भव्य दरी असून जवळच एक धबधबा जो संपूर्ण भारतातील पर्यटकांसाठी येथील मुख्य आकर्षण आहे.

कमळ सरोवर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कमळ तलावावर एक रमणीय दृश्य आहे. हे ठिकाण सुंदर कमळाच्या फुलांनी झाकलेले आहे. या सरोवरातून निघणारा एक प्रवाह सीता खाई मध्ये वाहतो. हा पाण्याचा प्रवाहाने बनलेली अद्भुत झलक पर्यटकांना भुरळ घालते.

1.59 चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापणारा यशवंत तलाव एक भव्य नैसर्गिक तलाव आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यापासून या तलावाचे नाव पडले आहे. पर्यटकांना तलावामध्ये नौकाविहार आणि मासेमारी सारखे उपक्रम करता येतात.

मच्छिंद्रनाथ गुहा ही नैसर्गिकरित्या तयार झालेली गुहा आहे जी संत मच्छिंद्रनाथांचे ध्यानस्थ असल्याचे म्हटले जाते. या गुहेच्या परिसरात मच्छिंद्रनाथ मंदिर आणि ऋषी मार्केंडयांचे आसन पाहायला मिळते.

मध्यप्रदेश राज्याच्या सीमेवर असणाऱ्या आवासबारी पॉईंटवरून उंच पर्वत व जंगलाचे अतिशय अद्भुत दृश्य पाहायला मिळते. याव्यतिरिक्त जतिंद्रनाथ टेम्पेचा आणि गोंड राजाच्या किल्ल्याचे अवशेष अनेक पर्यटकांना आकर्षित करतो.

खडकी पॉइंट हे येथील मुख्य ठिकाण आहे जे पर्यटकांना खूप आकर्षित करते. तोरणमाळमधील लोकप्रिय ट्रेकिंग क्षेत्र याच ठिकाणी आहे. पावसाळ्यात हिरवाईने येथील अनेक विहंगम दृश्ये नटतात.

येथे एक तोरणा देवीचे मंदिर आहे. स्थानिक लोकांच्या मते हे मंदिर 600 वर्षापेक्षा आहे. या मंदिरातील देवीची मूर्ती तोरणा देवीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काळ्या पाषाणातून कोरलेली आहे.

तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण जाणे व राहणे (toranmal ghat information in marathi)

नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यातील गाव आहे. येथील सरासरी तापमान 24 अंश सेल्सिअस इतके असते. या भागात उन्हाळ्यात खूप कडक ऊन असते. हिवाळा देखील प्रखरतेने जाणवतो.

येथे उन्हाळ्यात देखील पाऊस होत असतो. यामुळे ऑक्टोबर ते मे महिन्यात फिरायला येण्यासाठी तोरणमाळ खूप छान ठिकाण आहे. या ठिकाणी जाण्यासाठी राज्य परिवहन, खासगी गाड्या व लक्झरी बसेस उपलब्ध आहेत.

तोरणमाळमध्ये राहण्यासाठी विविध रिसॉर्ट व हॉटेलची सुविधा उपलब्ध आहे. या ठिकाणी तुम्ही मुक्काम करू शकता. तसेच हे ठिकाण महाराष्ट्र राज्यातील असल्याने प्रत्येक हॉटेलमध्ये स्वादिष्ट व मसालेदार महाराष्ट्रीयन जीवन मिळते. विशेषतः तूर, मका, गहू आणि ज्वारी यापासून बनवलेले पदार्थ येथे प्रसिद्ध आहेत.

सारांश

या लेखात आपण तोरणमाळ थंड हवेचे ठिकाण माहिती मराठी (Toranmal information in marathi) पाहिली. या माहितीत आपण येथील हवामान, पर्यटन स्थळे तसेच खाद्यसंस्कृती, राहण्याची सोय याविषयी माहिती जाणून घेतली.

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तोरणमाळ एकदा नक्की फिरून या. दररोज अशाच नवीन नवीन माहितीसाठी आमच्या ब्लॉगला फॉलो करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार जिल्ह्यात आहे. हा जिल्हा महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी एक असून येथील आदिवासी पावडा नृत्य प्रसिद्ध आहे.

तोरणमाळ येथील काय प्रसिद्ध आहे ?

महाराष्ट्र राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून तोरणमाळ प्रसिद्ध आहे. तसेच येथे सीता खाई, कमळ सरोवर, यशवंत तलाव, मच्छिंद्रनाथ गुहा, आवासबारी पॉइंट, खडकी पॉइंट, तोरणा देवी मंदिर पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. येथील तूर, मका, गहू व ज्वारी यापासून बनवलेले पदार्थ फारच प्रसिद्ध आहे.

पुढील वाचन :

  1. महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण चिखलदरा माहिती
  2. महाराष्ट्रातील सुहाना सफर – माळशेज घाट माहिती
  3. महाराष्ट्रातील राज्यातील पर्यटन स्थळे माहिती

Leave a Comment