व्यापार खाते म्हणजे काय ?

By | November 11, 2022

trading account information in marathi – व्यापार खाते हे शेअर बाजारात खरेदी-विक्री करण्यास परवानगी देते. स्टॉक ब्रोकर आपल्या ग्राहकांना समभाग खरेदी आणि विक्री करण्यासाठी मदत करत असतो. त्यासाठी तो एक प्लॅटफॉर्म बनवतो, या प्लॅटफॉर्मवर ट्रेडिंग चार्ट, इंडिकेटर, शेअरची खरेदी-विक्री अशा अनेक प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देत असतो.

स्टॉकची खरेदी-विक्री ही दोन मार्गाने चालत असते. पहिली ऑफलाईन पद्धत आणि दुसरी ऑनलाईन पद्धत. ऑफलाइन पद्धतीमध्ये गुंतवणुकदार स्टॉक ब्रोकरला फोन करून अथवा मेसेज करून हवा असणारा स्टोक त्या किंमतीला खरेदी करण्यास सांगत असतो. यामध्ये सर्व काम दलाल करत असतो. ऑनलाईन पद्धत म्हणजे स्टॉक ब्रोकरने मोबाईल आणि वेब प्लॅटफॉर्मवर ट्रेडिंग करण्यासाठी उपलब्ध केलेली सुविधेचा वापर करून ट्रेडिंग करणे होय.

ऑनलाइन आणि ऑफलाईन ट्रेडिंग करण्यासाठी ट्रेडरला डिमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते उघडणे अनिवार्य आहे. डिमॅट खाते विषयी आपण मागील लेखामध्ये माहिती अभ्यासली आहे. आज आपण लेखामध्ये व्यापार खाते म्हणजे काय – trading account information in marathi याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

हा लेख जरूर वाचाडिमॅट अकाउंट माहिती मराठी (Demat account information in marathi)

व्यापार खाते म्हणजे काय – trading account information in marathi

trading account information in marathi
नावव्यापार खाते
नोंदणीकृत स्टॉक ब्रोकर मार्फत सेबी
उपयोग शेअर बाजार आणि कमोडिटी बाजार यामध्ये खरेदी-विक्री करणे
trading account information in marathi

ट्रेडिंग अकाउंट स्टॉक ब्रोकर कडून पुरवण्यात येणारे खाते असून हे हे खाते आपल्या बँक खात्याशी लिंक केलेले असते. बँक खात्यातील पैसे व्यापर खात्यात घेऊन त्यांचा वापर सिक्युरिटीज खरेदी आणि विक्री करण्यासाठी केला जातो. गुंतवणूकदार एक किंवा त्याहून अधिक ट्रेडिंग अकाउंट वापरू शकतो. ट्रेडिंग अकाउंट च्या माध्यमातून आपण स्टॉक, चलन, कमोडिटी बाजारात व्यापार करू शकतो.

ट्रेडिंग खाते हा एक इंटरफेस आहे जो शेअर्सची खरेदी आणि विक्री करण्यास परवानगी देतो. हे गुंतवणूकदारांच्या बँक आणि डीमॅट खात्यांमधील इंटरफेस म्हणून काम करते.

या खात्याद्वारे खरेदी केलेले शेअर्स एखाद्याच्या डीमॅट खात्यात जमा केले जातात. विकलेले शेअर्स डीमॅट खात्यातून डेबिट केले जातात आणि विक्रीची रक्कम बँक खात्यात जमा केली जाते.

हा लेख जरूर वाचाबीटीएसटी व्यापार माहिती (btst trade in marathi)

व्यापार खात्याची वैशिष्ट्ये माहिती – trading account features in marathi

  • ऑनलाइन पद्धतीने किंवा ऑफलाइन पद्धतीने ट्रेडिंग करता येते.
  • शेअर बाजारातील तज्ञांशी संपर्क साधून आपले उत्पन्न वाढण्याचे पर्याय असतात.
  • ट्रेडिंग खात्यामध्ये नियमितपणे स्टॉक मार्केटमधील अद्यावत माहिती आणि ताज्या घडामोडी याविषयी सूचना मिळतात.
  • स्टॉक ब्रोकर त्यांच्या ग्राहकांना मार्जिन असा पर्याय उपलब्ध करून देतात. याचा वापर करून गुंतवणूकदार विविध समभागांवर त्यांचे एक्सपोजर वाढवू शकतात.
  • शेअर बाजारामधील रियल टाइम खरेदी-विक्री परिस्थितीचा आढावा घेऊन बाजारात प्रचंड पैसे कमवू शकतो.
  • स्टॉक ब्रोकर च्या माध्यमातून विशेष सुविधांचा वापर करून शेअर बाजार चालू होण्याअगोदर आपण खरेदी किंवा विक्री ऑर्डर देऊ शकतो.

व्यापारी खात्याचे फायदे माहिती – trading account benefits in marathi

  • ट्रेडिंग खाते गुंतवणुकदाराला त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक व्यापार मर्यादा ठरवण्यासाठी परवानगी देते.
  • गुंतवणूकदार ट्रेडिंग खाते वापरून स्टॉक, गोल्ड ईटीएफ, फॉरेक्स, ईटीएफ आणि डेरिव्हेटिव्ह खरेदी/विक्री करू शकतो.
  • व्यापार खात्याचा वापर करून ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने ट्रेडिंग करता येते.
  • सिक्युरिटीज केल्यानंतर गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष हिशोब करण्याची गरज नसते. विक्री केल्यानंतर त्यातून सर्व टॅक्स आणि इतर बिले वजा करून मिळणारा नफा दाखवते.

व्यापार खाते कसे उघडायचे (trading account opening process in marathi)

व्यापार खाते उघडण्यासाठी (trading account opening documents) आधारकार्ड, पॅन कार्ड आणि बँकेचे पासबुक किंवा कॅन्सल चेक इत्यादी कागदपत्राची आवश्यकता असते.

हे कागदपत्र घेऊन आपल्याला हव्या त्या स्टॉक ब्रोकर च्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येतो. ऑनलाइन अर्ज करत असताना आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करणे गरजेचे आहे.

खाते उघडण्यासाठी डिपॉझिटरी पार्टिसिपंट (DP) निवडा. डिपॉझिटरीसह लाभार्थी मालक (बीओ) खाते उघडले जाते. पत्ता, ओळखीचा पुरावा, उत्पन्नाचा पुरावा इत्यादी कागदपत्रांच्या प्रतींसह गुंतवणूकदाराचे सर्व तपशील देऊन खाते उघडण्याचा फॉर्म भरला जावा. खाते उघडण्यासाठी पॅन कार्ड अनिवार्य आहे.

तुम्ही डीपीला भरावे लागणार्‍या शुल्काच्या तपशिलांसह नियमांची एक प्रत तुम्हाला पुरविले जाते. गुंतवणूकदाराने प्रदान केलेल्या सर्व तपशील आणि कागदपत्रांची पुष्टी करण्यासाठी डीपीच्या प्रतिनिधीद्वारे वैयक्तिक पडताळणी करेल.

एकदा मंजूर झाल्यानंतर आणि कागदपत्रे सबमिट केल्यानंतर, तुमचे व्यापार खाते उघडले जाईल आणि चालू केले जाईल.

व्यापार खाते बंद कसे करावे (how to close trading account in marathi)

व्यापार खाते ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने बंद करता येते. ऑफलाइन पद्धतीने बंद करण्यासाठी व्यापार खाते क्रमांक आणि डिमॅट अकाउंट नंबर, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि खाते बंद करण्यासाठी लागणारा फॉर्म व्यवस्थित रित्या भरून आपल्या स्टॉक ब्रोकरकडे जमा करावा लागतो. हा फॉर्म जमा केल्यानंतर पंधरा दिवसांमध्ये आपल्या डिमॅट अकाउंट बंद केले जाते.

ऑनलाईन पद्धत अतिशय सोपी आणि सरळ आहे, यामध्ये फक्त तुम्हाला डिमॅट आणि व्यापार खाते क्रमांक, पॅन कार्ड आणि आधार कार्ड यांची माहिती भरलेला ईमेल आपल्या स्टॉक ब्रोकरला पाठवावा लागतो. त्यानंतर स्टॉक ब्रोकर प्रत्युत्तर म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा डिमॅट आणि व्यापार अकाउंट बंद करायचे का विचारेल, या वेळेस तुम्ही अकाउंट बंद करायचे याची खात्री केली की, पुढील पंधरा दिवसात तुमचे ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट बंद केले जाते.

सारांश

व्यापार खाते म्हणजे काय – trading account information in marathi याविषयी आपण माहिती जाणून घेतली. तसेच आपण व्यापार कसे काम करते, हे खाते कसे उघडावे, खाते बंद कसे करावे याविषयी माहिती पाहिली.

व्यापार खाते म्हणजे काय – trading account information in marathi तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

व्यापार खाते हे कोणते खाते आहे ?

व्यापार खाते हे शेअर बाजारात आणि कमोडिटी बाजारात पैसे गुंतवण्यासाठी वापरले जाणारे खाते आहे. हे खाते व्यापार करण्यासाठी असल्याने यामध्ये जास्तीत जास्त कितीही रोख रक्कम ठेऊ शकतो.

खातेवही म्हणजे काय ?

खातेवही म्हणजे एखादी व्यक्ती, संपत्ती, उत्पन्न किंवा खर्च या संबंधातील व्यवहारांचा एकत्रित माहिती देणारे पुस्तक होय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *