झाडांचे उपयोग माहिती (uses of trees in marathi)

uses of trees in marathi – झाडे ही पर्यावरणातील एक महत्वाचा घटक आहे. झाडे पर्यावरणातील सजीव जिवंत राहण्यासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन पुरवतात. झाडे ही मानवी जीवनातील बहुतांश गरजा पूर्ण करतात.

या लेखातून आपण झाडांचे उपयोग माहिती (uses of trees in marathi) जाणून घेणार आहोत.

हा लेख जरूर वाचापर्यावरणाचे महत्व माहिती मराठी (paryavaran in marathi)

झाडाविषयी माहिती (tree information in marathi)

uses of trees in marathi
विषय झाडे
प्रकारपर्यावरणातील महत्वाचा घटक
उपयोग पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी मदत
झाड समानार्थी शब्द मराठी वृक्ष, तरु
झाडांचे उपयोग माहिती (uses of trees in marathi)

झाड म्हणजे काय ? याविषयी तुम्हाला काही सांगायची गरज नाही. जन्मापासूनच आपण झाडाच्या सानिध्यात राहत आहोत. शास्त्रीय पद्धतीने झाडाची व्याख्या केली तर, झाड हे वाढवलेली देठ किंवा खोड असलेली एक बारमाही वनस्पती आहे. झाडांची निर्मिती साधारण 37 कोटी वर्षापूर्वी झाली असावी, असा शासत्रज्ञांचा अंदाज आहे.

मानवाच्या उक्रांतीच्या सिद्धांताचा इतिहास पाहिला असता, असे जाणवते की प्राचीन काळापासून आधुनिक कालखंडात झाडांचे मानवी जीवनात आणि पर्यावरणात खूप महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

या लेखाच्या आधारे आपण पर्यावरणातील आणि मानवी जीवनातील झाडांचे उपयोग जाणून घेणार आहोत.

झाडांचे उपयोग माहिती (uses of trees in marathi)

झाडे पर्यावरणातील महत्वाचा घटक आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी झाडे महत्वाची भूमिका बजावतात. कार्बन डायऑक्साइड हा वायू श्वसनासाठी वापरून जीवनास आवश्यक असणारा ऑक्सिजन वायू हवेत सोडतात.

कापूस, फ्लेक्स, जूट, बांबू अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांपासून बनलेले कापडापासून आपण वस्त्रनिर्मिती करतो. तर गवत, तागा आणि मजबूत धागा असलेले गवत हे दोरी तयार करण्यासाठी वापरली जाते.

कागद हा माहिती साठवण्यासाठी महत्त्वाचे माध्यम आहे. लिफाफे, खेळणी, रंगीत कागदांचे पतंग, पताका, झिरमिळ्या, पिशवी असे अनेक वस्तू कागदापासून तयार होतात. आजच्या काळात सर्वात महत्वाचे असणारे शिक्षण घेताना कागदाचा वापर होतो. महत्वपूर्ण पत्रे आणि कागदपत्रे ही कागदापासूनच बनलेले असतात.

इसवी सन पूर्व 2500 पासून मानवाला शाई माहीत आहे. शाईचा वापर कागद, कापड, चर्मपत्र किंवा इतर तत्सम पृष्ठभागावर लेखन किंवा छपाई करण्यासाठी केला जातो. त्यासाठी वापरात येणारी शाई झाडाची देणगी आहे.

अहो इतकंच काय, तर मानवी जीवनात सर्वात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे पैसा, ज्यासाठी सर्वजण धडपड करताना आपण पाहत असतो. हा पैसा म्हणजेच चलनी नोटा कागदापासून तयार होत असतात.

मानवाचा नैसर्गिक असो वा अपघाताने मृत्यू झाला, की त्याचे अंत्यसंस्कार करण्यासाठी (शव जाळण्यासाठी) लाकडाचा उपयोग करण्यात येतो.

नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित गोष्टींचा विपरीत परिणाम होऊन वातावरणाचे तापमान वाढत जात आहे. झाडांच्या लागवडीमुळे वाढते वातावरणाचे तापमानात घट होण्यास मदत होते.

पर्यावरणातील मानवाने केलेल्या हस्तक्षेपाने जमिनीची धूप होत आहे. जमिनीची धूप झाल्याने मातीचा थर कमी होत जातो. यामुळे भविष्यात मातीची सुपीकता कमी होऊन वालुकामय मातीची निर्मिती होऊ शकते. परिणामी भविष्यात पाण्याची पातळी कमी होऊ शकते. यासाठी आपण जमिनीची धूप कमी करण्यासाठी झाडे लावा, झाडे जगवा असे प्रकल्प हाती घ्यायला हवे.

हा लेख जरूर वाचाभूमी मराठी माहिती (land information in marathi)

फार पूर्वीपासून भारतात आयुर्वेदिक पद्धतीने आजारावर उपचारांवर केले जातात. यासाठी जंगलात अनेक औषधी वनस्पती आढळतात. अशा प्रकारे झाडे आपल्याला औषधी गुणधर्मातून मदत करत असतात.

भारतीय रोझवुड, साल लाकूड, पांढरा देवदार लाकूड, साटन लाकूड आणि सागवान लाकूड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लाकडांपासुन घरांसाठी फर्निचर तयार करण्यासाठी केला जातो. तर काही लाकडांपासुन दरवाजाच्या चौकटी, कॅबिनेट आणि टेबल्स, बांधकाम हेतूंसाठी, वाद्य आणि यंत्र यासाठी झाडापासून मिळणाऱ्या लाकडाचा उपयोग होतो. झाडाच्या खोडापासून रबर काढतात.

लाकडाचा ग्रामीण भागातील मुख्य वापर म्हणजे इंधन. हो घरगुती चुली पेटवण्यासाठी लाकडाचा उपयोग ग्रामीण भागात करताना दिसून येतो.

विविध प्रकारच्या झाडापासून मिळणारे फळे आपण अन्न म्हणून उपयोगात आणतो. तर पक्षी आपले निवासस्थान म्हणजेच घरटे झाडावर बांधत असतात. तर पशु मोठ्या प्रमाणावर झाडे असतील अश्या ठिकाणी राहणे पसंत करतात.

उन्हाळा ऋतू सुरू झाला, की सगळीकडे उन्हाळा गरज लहरी निर्माण होतात. प्रचंड गरज होत असताना, झाड स्वतः ऊन झेलून आपल्याला मात्र सावली देण्याचा प्रयत्न करत.

महाराष्ट्रातील सण आणि उत्सव यांपैकी एक सण आहे नागपंचमी. या सणाला आपण झाडावर झोके बांधून खेळतो. तर वटपौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने वडाचे विशेष महत्त्व आहे.

माणसाला पाणी अनेक स्रोतापासून उपलब्ध होते. पण पाण्याचा मुख्य स्रोत हा पाऊस आहे. पाऊस नाही झाला तर प्रत्येक पाण्याचा साठा कोरडा होईल. पाऊस त्या ठिकाणी जास्त पडतो, ज्या ठिकाणी वनसंपदा अधिक प्रमाणात आहे. याचा अर्थ असा की, झाडे ही पाऊस पडण्यासाठी उपयोगी ठरत असतात.

सारांश

uses of trees in marathi

या लेखातून आपण झाडांचे उपयोग माहिती (uses of trees in marathi) जाणून घेतली आहे. झाडे आपल्या जीवनातील अविभाज्य घटक असून आपली उपजीविका करण्यासाठी झाडाचा उपयोग होतो. झाडे आहेत म्हणून पृथ्वीवर पाऊस पडतो.

अशा प्रकारे मानवी जीवनाची सुरुवात (श्वास घेण्यापासून) ते मानवी जीवाचा शेवट (शव जाळण्यासाठी) असला, तरीदेखील आपल्याला झाडांची अनेक प्रकारे गरज भासते. कधी खाद्य बनून, तर कधी निवारा बनून, तर कधी औषध बनून, तर आपली मूलभूत गरज बनून झाडे आपल्याला मदत करतात. यामुळे आपणही झाडांची जाणीवपूर्वक जतन केले पाहिजे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

झाडे आपल्याला काय काय देतात ?

झाडे आपल्याला जीवन देतात. खाण्यासाठी, राहण्यासाठी, जगण्यासाठी, खेळण्यासाठी जमेल त्या प्रकारे आपली मदत करतात.

घरासमोर कोणती झाडे असावीत ?

घरासमोर तुळस, अशोका, लिंबू, बदाम, चाफा, आवळा, दुर्वा, पारिजात, बांबू, कोरफड, पिंपळाचे झाड, कडुलिंबाचे झाड असावेत.

उंबराचे झाड दारात असावे का ?

उंबराच्या झाडाखाली सद्गुरू दत्ताचे स्थान असते अशी लोकांची श्रद्धा आहे. उंबराचे झाड 24 तास प्राणवायू हवेत सोडते. गोवर, उचकी, अतिसार, उन्हाळी, मधुमेह इत्यादी रोगांवर उंबराची फळे, फुले व पाने उपयोगी पडतात. उंबराची फळे खाता येतात. या झाडाच्या सावलीत बसून पवित्र ग्रंथ पोथ्या वाचन करतात. अशा विविध कारणामुळे उंबराचे झाड दरात असावे.

Leave a Comment