वाचन प्रेरणा दिन माहिती मराठी (vachan prerna din mahiti)

Published Categorized as मराठी माहिती

vachan prerna din mahiti – वाचन प्रेरणा दिन डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. वाचन प्रेरणा दिन 15 ऑक्टोंबर या दिवशी असतो. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना भारताचे मिसाईल मॅन या नावाने ओळखले जाते. भारतातील युवा शक्तीमुळे भारत देश महासत्ता बनणार, यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा असे अब्दुल कलाम यांचे म्हणणे आहे.

डॉ. कलाम यांच्या मते, एक चांगले पुस्तक शंभर मित्रांप्रमाणे असते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात अनेक साहित्य पुस्तके वाचावी, आणि आपल्या जीवनाचा आणि समाजाचा उद्धार करावा.

या लेखात आपण वाचन प्रेरणा दिन माहिती मराठी (vachan prerna din mahiti) याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. यात आपण वाचनाचे महत्व याविषयी देखील माहिती जाणून घेणार आहोत.

हा लेख जरूर वाचाबाबासाहेब आंबेडकर विचार मराठी माहिती (dr babasaheb ambedkar vichar in marathi)

वाचन प्रेरणा दिन माहिती मराठी (vachan prerna din mahiti)

vachan prerna din mahiti
विषय वाचन प्रेरणा दिवस
साजरा15 ऑक्टोबर (डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस)
उद्देशविद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी.

डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव अवुल पाकीर जैनुलाब्दीन असे आहे. यांचा जन्म 15 ऑक्टोंबर 1931 मध्ये रामेश्वरम या ठिकाणी झाला. भारत देशातील एक शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी कार्य केले. तसेच त्यांनी भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून उल्लेखनीय काम केले.

नावडॉ. अब्दुल कलाम
जन्म15 ऑक्टोंबर 1931
व्यवसायएरोस्पेस अभियंता
एरोस्पेस शास्त्रज्ञ
लेखक
उल्लेखनीय कार्यविंग्ज ऑफ फायर
इंडिया 2020
इग्नायटेड माइंड्स

भारत देश नक्कीच महासत्ता बनणार असा विश्वास अब्दुल कलाम यांनी सर्व भारतीयांच्या मनात रुजवला. कलाम यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकातून येणाऱ्या काळात भारत कसा महासत्ता बनेल आणि भारताची युवाशक्ती याविषयी माहिती स्पष्ट होते.

भारताची युवाशक्ती विषयी बोलताना कलाम म्हणतात, भारत देश जगातील सर्वात मोठा युवा युवा शक्ती असलेला देश आहे. या तरुणांनी एकत्र येऊन कमा केल्यास भारत नक्की महासत्ता बनणार. त्यासाठी तरुणांना शालेय जीवनात वाचन करण्याचा छंद लागला पाहिजे. कारण वाचन केल्याने व्यक्तिमत्त्व विकास आणि समाजाबद्दल जिव्हाळा निर्माण होतो.

देशातील विद्यार्थांना आपल्या विचारांनी कलाम नेहमीच प्रेरित करतात. अब्दुल कलाम यांच्यासारखे भारताला सुपर पॉवर बनविण्याचे स्वप्न (व्हिजन 2020) हे स्वामी विवेकानंद यांनी 1880 मध्ये पाहीले.

शाळा-महाविद्यालयात असताना प्रत्येक विद्यार्थांना अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी, हे उद्दिष्ट वाचन प्रेरणा दिवसाच्या माध्यमातून साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. फक्त शालेय पुस्तकी वाचन करण्यापेक्षा अवांतर वाचन करणे आवश्यक आहे. अवांतर वाचन केल्याने विद्यार्थ्यांना अनेक संदर्भ मिळतात, त्यांची आकलन शक्ती वाढते. इतरांवर आपल्या ज्ञानाचा प्रभाव टाकण्यासाठीही अवांतर वाचनाचा उपयोग होतो. म्हणूनच वाचन प्रेरणा दिवसामुळे विद्यार्थ्यांचा व्यक्तिगत विकास होण्यास तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजण्यास मदत होते.

वाचनाचे महत्व माहिती मराठी (importance of reading)

importance of reading – वाचन केल्याने आपल्या ज्ञानात भर पडते. या ज्ञानाचा वापर करून आपण स्वतःचा आणि समाजाचा विकास करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वाचन केल्याने सकारात्मक दृष्टिकोन वाढीस लागतो.

काल्पनिक कथा (imagination story) वाचल्याने सहानुभूती निर्माण होते आणि इतरांशी चांगले संबंध निर्माण करण्याची भावना निर्माण होते. पुस्तके आपली चांगली मित्र असतात. जो वाचन करण्याची सवय जोपासतो, तो कधीच एकट पडत नाही.

चांगले वाचन आपल्याला लिहण्यास प्रवृत्त करते, चांगला लेखक होण्यासाठी चांगला वाचक व्हायला हवा. अवांतर वाचन केल्याने भाषा वापरण्याचे ज्ञान प्राप्त होते. वाचनाने आपली शब्दसंपत्ती, संवाद कौशल्य आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.

वाचन केल्याने एखाद्या प्रदेशाची, कलेची, कौशल्याची माहिती मिळते. वाचनाने आपले मन व्यस्त राहते. परिणामी आपल्या मनातील चिंता, काळजी, आणि द्वेष अशा प्रकारच्या भावनांवर नियंत्रण करता येते.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण वाचन प्रेरणा दिन माहिती मराठी (vachan prerna din mahiti) याविषयी माहिती जाणून घेतली. वाचन प्रेरणा दिवस आणि वाचनाचे महत्व माहिती मराठी (vachan prerna day and importance of reading) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

वाचन म्हणजे काय ?

वाचन म्हणजे दृष्टीने किंवा स्पर्शेने अक्षरे अथवा चिन्हांचा अर्थ समजून घेणे होय.

वाचन प्रेरणा दिन कोणत्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो ?

15 ऑक्टोंबर या दिवशी डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आहे. दरवर्षी हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो.

जागतिक पुस्तक दिन केव्हा साजरा केला जातो ?

जागतिक पुस्तक दिन 23 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो.

जागतिक विद्यार्थी दिन केव्हा साजरा केला जातो ?

जागतिक विद्यार्थी दिवस हा भारताचे माजी राष्ट्रपती आणि विख्यात अंतराळ शास्त्रज्ञ ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस भारतासह सर्व जगात पाळला जातो.

महाराष्ट्रात विद्यार्थी दिवस केव्हा साजरा करण्यात येतो ?

महाराष्ट्रात विद्यार्थी दिवस 7 नोव्हेंबर साजरा करण्यात येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो.

Leave a comment

Your email address will not be published.