वाचनाचे प्रकार किती व कोणते (vachanache prakar in marathi)

vachanache prakar in marathi – आपण वाचत असतो, कधी मोठ्याने, कधी मनात, तर कधी सहज जाहिरात, निमंत्रण पत्रिका वाचून काढत असतो. अशा या वाचकाच्या हेतूनुसार आणि स्वरूपानुसार वाचनाचे प्रकार पडतात.

मागील लेखात आपण वाचन म्हणजे काय ? वाचनाची व्याख्या, महत्व, फायदे, घटक अश्या घटकांमधून वाचन माहिती मराठी (reading information in marathi) माहिती जाणून घेतली आहे.

या लेखातून आपण वाचनाचे प्रकार किती व कोणते (vachanache prakar in marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तसेच वाचन कला आत्मसात करण्यासाठी काय करायला हवे ? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

Table of Contents

वाचनाचे प्रकार किती व कोणते (vachanache prakar in marathi)

vachanache prakar in marathi
विषय वाचनाचे प्रकार
मुख्य प्रकार किती व कोणते ?मुख्य प्रकार दोन 1. प्रकट वाचन
2. मूक वाचन

वाचनाच्या हेतूनुसार आणि उद्देशानुसार वाचण्याचे प्रकार ठरविले जातात. एका प्रकारांमध्ये फुरसत आहे म्हणून केलेले वाचलं दुसऱ्या अध्ययन करण्यासाठी केलेले वाचन. यानुसार वाचनाचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे प्रकट वाचन आणि दुसरा प्रकार म्हणजे मूक वाचन होय. पुढे आपण वाचनाची व्याख्या देऊन वाचनाचे प्रकार ही संकल्पना स्पष्ट करूयात.

हा लेख जरूर वाचावाचन प्रेरणा दिन माहिती मराठी (vachan prerna din mahiti)

#1 प्रकट वाचन

प्रकट वाचन म्हणजे लेखकाने लिहिलेले विचार कल्पना, भावना, योग्य त्या विरामचिन्हसोबत, योग्य ठिकाणी आघात देऊन, स्वरांच्या चढउतारासह शुद्ध उच्चार करीत श्रोत्यांपर्यंत पोहोचविणे होय.

दुसऱ्याला स्पष्ट रीतीने कळले अशा रीतीने मोठ्याने केलेले वाचन म्हणजे प्रकट वाचन होय. वाचक हा मध्यस्थ असून, लेखकांचे विचार, भावना, कल्पना दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायचे असते.

यासाठी वाचकाने लेखकांचे विचार समजून घेऊन, शब्दाशब्दांचे परस्परसंबंध लक्षात घेऊन, विरामचिन्हसह, योग्य आघातासह स्पष्ट आणि शुध्द वाचले पाहिजे.

प्रकट वाचन करण्यासाठी लागणारे कौशल्य कसे विकसित करावी ?

 • लेखकाच्या कल्पना, भावना आणि विचार जाणून घेऊन त्या व्यक्त करण्यावर भर द्यावा.
 • अनेक वेळा वाक्याचा उत्तरार्ध खालचा पटीत उच्चारला जातो. असे न करता त्याचे स्पष्ट उच्चारण करावे.
 • ल, ळ, श, ष, स, न, ण, हृ, ऋ, या अक्षरांचे उच्चार स्पष्ट करावेत.
 • विरामचिन्हे यांचे महत्त्व लक्षात घेऊन प्रकट वाचनाचा सराव करावा.
 • नाटकांचे, संवाद लेखांचे वाचन करावे.
 • आकाशवाणी, दूरचित्रवाणी, टेप्स आणि फिल्मस इत्यादी आधुनिक माध्यमातील उच्चारांच्या श्रवण करावे.
 • मराठी भाषा आणि देवनागरी लिपी ही उच्चारानुसारी असली, तरी व्यंजनांच्या उच्चारातही स्वराघातानुसार फरक पडतो. उदा. चरण, सतत, शरणागत इत्यादी शब्द.
 • उच्चारांचे ओठच्या आणि दाताच्या हालचालीनुसार तसेच दंत्य आणि कंठ्य असे प्रकार पडतात. हे प्रकार लक्षात घेऊन त्या त्या अवयवाच्या सहाय्याने उच्चार करावा.
 • प्रकट वाचन दुसऱ्यासाठी करावयाचे आहे, याकडे लक्ष द्यावे.
 • आपल्या श्वासोच्छवासाचा उच्चाराशी असणारा संबंध लक्षात घ्यावा.

#2 मूक वाचन

मूक वाचन म्हणजे वाचकाने मनातल्या मनात अर्थ कळण्यासाठी, आकलनासाठी आणि आनंदासाठी केलेले जलद वाचन होय.

वाचनात हालचाली, उच्चार करण्यासाठी लागणारा वेळ आणि शक्ती खर्च होत नाही. या वाचनात कोणताही बाह्य आवाज होत नसल्याने, अडथळा निर्माण होत नाही. त्यामुळे एकाग्रता वाढते. मूक वाचन कौशल्याचा उपयोग अभ्यासक, सामान्य वाचक, लेखक, संशोधक, शिक्षकांना होतो. काही गोष्टी मोठ्याने वाचण्यापेक्षा मनात वाचल्याने अधिक समजतात. उदा. कादंबरी, खासगी पत्रे, वैचारिक लेखन, माहितीपूर्ण लेखन.

मूक वाचन करण्यासाठी लागणारे कौशल्य कसे विकसित करावी ?

 • मजकुराचा अर्थ ध्यानात घेण्याकडे अधिक लक्ष द्यावे.
 • मूक वाचनाने नजरेचा आवाका अधिक वाढवून वाचन गतिमान करण्यासाठी प्रयत्न करावा.
 • मोठ्या टाइपावरून बारीक टाइप असलेल्या मजकुराकडे क्रमाने येत गेल्यास वाचनवेग वाढतो.
 • वाचलेल्या मजकुराचे आकलन तपासण्यासाठी वाचन झाल्यावर स्वतःलाच नाहीतर दुसऱ्याला प्रश्न विचारून त्वरित ग्रहण व आकलन कसे होईल, याकडे लक्ष द्यावे.
 • बाह्य शांतता, मनाची एकाग्रता आणि आंतरिक गरज ही मूक वाचन अर्थपूर्ण आणि वेगवान होण्यास मदत करतात.

फावल्या वेळेतील वाचन म्हणजे काय ?

रोजचा दिनक्रमातून आपल्याला एक-दोन तास मोकळे मिळतं असतात. याला फावला वेळ असे म्हणतात. अशा वेळी मनाची करमणूक व्हावी, ताण जाण्यासाठी, वेळ चांगला जाण्यासाठी, मन ताजे होण्यासाठी वाचन करणे गरजेचे आहे.

फावल्या वेळात वाचन केल्याने अनेक नवीन विचार परिचित होतात. शब्दांचे विविध उपयोग समजतात. शब्दांचा योग्य तो अर्थ, म्हणी, वाक्प्रचार, व्यंगार्थ, वक्योती यांच्या ओळखीने आपली भाषिक क्षमता विकसित होते. आपल्या व्यक्तीमत्वला छानसा आकार प्राप्त होतो.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण वाचनाचे प्रकार किती व कोणते माहिती (vachanache prakar in marathi) जाणून घेतली आहे. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

सर्वांनी वाचावी अशी मराठीतील प्रसिद्ध पुस्तके कोणती आहेत ?

1. अग्निपंख – डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम
2. टू द लास्ट बुलेट – विनिता कामटे
3. प्लेइंग टू विन – सायना नेहवाल
4. सनी डेज – सुनील गावस्कर
5. शिवाजी कोण होता – गोविंद पानसरे
6. बनगरवाडी व्यंकटेश – माडगूळकर
7. अस्पृश्यांचा मुक्ती – संग्राम शंकरराव खरात
8. छत्रपती शाहू महाराज – जयसिंगराव पवार
9. आय डेअर – किरण बेदी
10. तिमिरातून तेजाकडे – डॉ. नरेंद्र दाभोळकर
11. मृत्युंजय – शिवाजी सावंत
12. फकिरा – अण्णाभाऊ साठे
13. बलुतं – दया पवार
14. ग्रामगीता – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
15. प्रश्न मनाचे – डॉ. हमीद आणि नरेंद्र दाभोळकर
16. स्वामी – रणजित देसाई
17. श्रीमान योगी – रणजीत देसाई
18. ठरलं डोळस व्हायचं – डॉ. नरेंद्र दाभोळकर
19. मी जेव्हा मी जात चोरली – बाबुराव बागुल
20. प्रकाशवाटा – प्रकाश आमटे

सर्वात जास्त वाचले गेलेले मराठी पुस्तक कोणते आहे ?

सर्वात जास्त वाचले गेलेले मराठी पुस्तक मृत्युंजय, छावा, श्यामची आई, श्रीमानयोगी, कोसला, बटाट्याची चाळ ही अशी बरीच पुस्तके आहे.

Leave a Comment