आईचे गुणगान खूप झाले, दरवेळेस आई वर कविता अस का ? बिचाऱ्या बापाने काय केलं ? आपण नेहमीच आईची गोडवी गातो, अडचणीच्या प्रसंगी तत्काळ धाव घेणाऱ्या बापाला विसरून चालणार नाही.
आज आपला हा लेख काहीसा वेगळा असेल, यामध्ये आपण वडीलांविषयी कविता vadil marathi kavita पाहणार आहोत. या कविता संग्रहित आहेत.
हा लेख जरूर वाचा – माझी आई निबंध

वडिलांविषयी कविता
बाबांचा मला कळलेला अर्थ…..
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणार शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणार मन
स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला करून
मुलांसाठी झटणार अंत:करण…..
वेळप्रसंगी गोडकौतुक
धाकात ठेवी बाबा
शांत प्रेमळ कठोर
रागीट बहुरूपी बाबा…
– सौरव वाजे
marathi kavita baba sathi
डोळ्यात का तुझ्या गंगा, मी गाऊ कोण्या अभंगा तू असता पाठी परी, जीवनी मी घेते भरारी
बाप माझा तूर वाण तू घेशील, ज्ञान मंदिरी माझी पायरी तू होशील
खरे करीन तुझ्या स्वप्नला, वाहिन हे जीवन देशाच्या सेवेला
चालविल माझ्या धरून हाताला, शिकवलं तू मम धरून कानाला
धीर धर थोडा टाकते पावला, हळूहळू घेते मी तुझ्या हाताला
सांगते मी साऱ्या साऱ्या जगाला, बाप माझा देव झाला कठीण वक्तला
देवावानी माय बाप आहे ज्यांच्या घरी
नांदा सौख्य भरे, उणे नाहीरे संसारी
काय गाऊ तुझी कीर्ती
काय लिहू तुझे लेख
तू आहेस महान माझा बाप
आणि मी तुझी लेक….
– प्रणवी चोपडे
baba kavita marathi
बाबा तुमचे उपकार जाणले मी आज, जन्म नाही दिला मज दिली छत्र छाया
राब-राब राबुनी वाढविले मज, माझ्या सुखासाठी तुम्ही शोशिले हो दुःख
दुःखा वेळी बाबा तुम्ही झाले मग ध्यान, बाबा तुमचे उपकार जाणले मी आज
काळजीनं पोटी मन तुमचे झाले हो व्याकूळ, बाबा तुमच्यामुळे घर झाले हो गोकुळ
स्वतःसाठी बाबा तुम्ही काही केले नाही, कुटुंबाची काळजी आहे तुम्हा सर्व पाई
बाबा तुमचे उपकार जाणले मी आज, तुमचे स्थान आहे बाबा कायम माझ्या हृदयी
माझे स्थान आहे बाबा सैदव तुमच्या चरणी आजवर तुम्हा कधी जाणले मी नाही
कळले आहे बाबा मला तुम्हीच माझे गुरू
बाबा तुमचे उपकार जाणले मी आज
बाबा वर कविता
बाबा तुमच्यापासून दूर राहताना, आठवण येते तुमची क्षणाक्षणाला मग अस वाटत मनात
खरंच काय अर्थ आहे या अश्या जगण्याला…
शेती करताना मुलांना शिकवताना, पहिले मी तुम्हाला
किती कष्ट करता आमच्यासाठी, प्रश्न केला मनाला…
तुमच्या या उपकारांची परतफेड कशी करू खरंच कळत नाही.
पण, एवढं मात्र नक्की, तुमच्या आठवणीत जीव व्याकूळ होई…
तुमच्यासारखे बाबा देव सर्वांना देवो, हीच मनी इच्छा
पूर्ण होऊ दे देवा माझी इच्छा हीच एक सदिच्छा… लग्नानंतर बाबा तुमची खुप खुप आठवण येईल.
पण मी मात्र शेवटपर्यंत तुमचीच ऋणी राहील… मलाही वाटतं व्हावं कधीतरी
तुमच्यासाठी श्रावणबाळ, पण सांगता येत नाही कधी येईल ती वेळ…
वडील कविता मराठी
हसण मला तुम्ही शिकवलं, संस्कार मला तुम्हीच बनवलं एकटपण मला कधीच नाही जाणवलं
पण तुमच्या शिवाय जगण्याचा कोड, मला कधी नाही जमलं
आयुष्य प्रत्येक वळणावर वेगळं असतं जन्म आणि मृत्यू ठरलेला असतो
तुझ आणि माझं नातं क्षणभंगुर असतं कारण ते नातं बापलेकीच असतं…
नाही जाणवली गरज वंशाच्या दिव्याची तू झालीस पणती माझ्या जीवनाची
उजळून प्रकाश दोन्ही घरी शान वाढवली या बापाच्या आयुष्याची….
वडिलांची कविता
बाप प्राण घराचा तोच श्वास विश्वाचा, बाप पोशिंदा जगाचा तोच कणा या मातीचा चुलीजवळ माय, तर कंपनीत तुम्ही राबत होता.
माझी वाट तुम्ही ते नऊ महिने पाहत होता पाळण्यात मला पाहून पेढे वाटायला पळला होता
बोटाला तुमच्या धरून शाळेत दाखला मी घेतला होता फाटकी बनियन तुम्ही, तर नवीन गणवेश मी घातला होता.
बाबा… तेव्हाही तुम्ही माझ्यासाठी फार मोठे होता.
ताप मला असो की ताईला रात्ररात्र तुम्ही जागत होता. शाळेचा खर्च वाढल्यामुळे ओव्हरटाईम तुम्ही करत होता.
बाबा … तेव्हाही तुम्ही माझ्यासाठी फार मोठा होता.
देवा, आता मात्र मला त्यांच्यासाठी कष्ट करू दे
तू फक्त आता सर्व जगातील बाबांना उदंड आयुष्य दे..!
vadil marathi kavita
आई माझा गुरू, आई कल्पतरू सौख्यचा सागर माझी आई…
पर्वतासारखे वडील तर नदी सारखी आई, त्यांच्या प्रेमाची जागा जगात कोणतीही होऊ शकत नाही.
बाबांचे हे प्रेमाचं असे, जगात आदित्य प्रकाशमान आयुष्याच्या काळोखात, देतात सदैव तेजाचंदान
आई म्हणजे असते ज्योत, उजळते घर प्रकाशने चंदनाचे झाड-सौरभ, दरवळतो जसे कणाकणाने
बाबा असतो तेल वात जळत असतो क्षणाक्षणाला हाडाची काडे करून आधार देतो मनाला
आकाशाहुन विशाल हृदय स्थितप्रज्ञता हिमालयाची आकाशाहून सदैव उन्नत, उंची माझ्या बापाची
kavita on baba
वडील म्हणजे उंबराचं झाड असतं, लपलेल्या भावनांचं जणू खोड असत
वडील म्हणजे समुद्रातलं जहाज असतं, खंबीर आधारचा दुसरं नाव असतं
वडील म्हणजे समुद्रातल्या जाणार असतं, पाण्यात न भिजवता किनाराला नेत असतं
वडील म्हणजे वादळातळ घर असत, सुखरूपपणे निवाऱ्याचे जणू एक स्थान असतं
वडील म्हणजे वादळाचं घर असतं, स्वतःवर झेलणारा आश्रयदात्याच एक रूप असतं…
सारांश
आपले वडील हे आपले जीवन, आपले जग आहेत. म्हणूनच हसता हसता जगत चला.. आयुष्य कधी निघून जाईल समजणार पण नाही. वडीलांच्या सोबतचा हा हसरा क्षण परत मिळणार नाही.
दुसरं सार काही विसरा, परंतु आईवडिलांना विसरु नका. त्यांचे उपकार अगणित आहेत, त्यांना कधीच विसरू नका…
हे देखील वाचा
- गंगापूर धरणाची मराठी माहिती – gangapur dam in marathi
- गौताळा वन्यजीव अभयारण्य – gautala wildlife sanctuary
- मुंबई पर्यटन स्थळ तारापोरवाला मत्स्यालय – taraporewala aquarium
Originally posted on November 17, 2021 @ 9:04 pm
Pingback: राजा हरिश्चंद्र माहिती मराठी | Raja Harishchandra information in marathi - Pradnyan