वज्रेश्वरी मंदिर माहिती मराठी – vajreshwari temple information in marathi

Vajreshwari temple information in marathi – वज्रेश्वरी हे देवस्थान महाराष्ट्र राज्यातील ठाणे या जिल्ह्यात आहे. भिवंडी तालुक्यातील असलेले वज्रेश्वरी हे देवस्थान महाराष्ट्र राज्यातील धार्मिक पर्यटन स्थळांपैकी एक आहे. याचबरोबर या ठिकाणाला गरम पाण्याचे कुंड पाहायला मिळतात.

वज्रेश्वरी देवी नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते. या लेखात आपण वज्रेश्वरी देवी माहिती मराठी – vajreshwari temple information in marathi जाणून घेणार आहोत.

वज्रेश्वरी देवी माहिती मराठी – vajreshwari devi information in marathi

वज्रेश्वरी देवी मराठी माहिती
वज्रेश्वरी देवी मराठी माहिती
नाववज्रेश्वरी देवी
ठिकाणगाव – वज्रेश्वरी
तालुका – भिवंडी
जिल्हा – ठाणे
प्रकारधार्मिक पर्यटन स्थळ
प्रसिद्धवज्रेश्वरी देवीचे मंदिर
जवळचे शहरभिवंडी
जवळील पर्यटन स्थळेतानसा धरण
तानसा अभयारण्य
गणेशपुरी
वसईचा किल्ला
पेल्हार तलाव
वज्रेश्वरी देवी माहिती मराठी

1. महाराष्ट्र राज्यातील असंख्य भाविक वज्रेश्वरी देवीच्या दर्शनसाठी येत असतात.

2. वज्रेश्वरी देवी ही नवसाला पावणारी देवी म्हणून प्रसिद्ध आहे.

3. देवीचे मंदिर तानसा नदीच्या काठावर आहे. तानसा धरण आणि तानसा अभयारण्य याच ठिकाणी आहे.

4. वज्रेश्वरी देवीच्या मंदिरापासून जवळच गणेशपुरी हे नित्यानंद स्वामी मंदिर आहे.

5. वज्रेश्वरी देवीला हिंदू धर्मातील माता पार्वतीचे रूप मानले जाते.

6. पार्वती ही हिंदू धर्मातील भगवान शिव यांची पत्नी आहे. पार्वतीला अपर्णा, अंबिका, उमा, कात्यायनी, काली, गिरिजा, गौरी, चंडी, चामुंडा, दुर्गा, भवानी, ललिता, सती इत्यादी नावे आहेत.

7. शिवाचे खंडोबा आणि ज्योतिबा हे दोन अवतार आहेत.

8. वज्रेश्वरी देवीचे खंडा आणि गदा हे दोन शस्त्र आहेत.

9. त्रेता युगात वसिष्ठ ऋषींच्या त्रिचंडी यज्ञाच्या वेळी पार्वती वसिष्ठांच्या संरक्षणासाठी आली.

10. त्यावेळी देवी पार्वतीने इंद्राचे वज्रास्त्र गिळले. म्हणून तिला वज्रेश्वरी हे नाव पडले.

11. वज्र हातात पकडता येईल असे एक प्रकारचे धातूचे शस्त्र असते, हिंदू, बौद्ध आणि जैन यांच्यामध्ये वज्र हे आत्मबलाचे चिन्ह मानतात.

12. बौद्ध धर्मविधींतील धार्मिक साहित्यसामग्रीत वज्रला अतिशय महत्त्व आहे.

वज्रेश्वरी मंदिर माहिती मराठी – vajreshwari temple information in marathi

vajreshwari temple information in marathi
vajreshwari temple information in marathi

13. वज्रेश्वरी देवीचे जुने मंदिर गुंज काटी या गावात होते.

14. पोर्तुगीजांनी त्यांच्या धार्मिक असहिष्णुतेच्या धोरणामुळे देवीचे मंदीर वज्रेश्वरी या ठिकाणी स्थलांतरित केले.

15. पोर्तुगीजांच्या विरोधात चिमाजी अप्पा पेशव्यांनी वसईचा किल्ला जिंकण्यापूर्वी वज्रेश्वरीदेवीला नवस केला होता.

16. त्यानंतर चिमाजी अप्पा पेशव्यांनी वसईच्या किल्ला जिंकुन घेतला.

17. त्यानंतर वसई वर मराठा साम्राज्याचे बीजारोपण झाले आणि सर्व सत्ता त्यांच्या ताब्यात आली.

18. त्यानंतर चिमाजी अप्पांनी देवीच्या मंदिराचे नव्याने बांधकाम केले.

वज्रेश्वरी पाहण्यासारखी ठिकाणे मराठी माहिती – vajreshwari places to visit in marathi

19. वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात मराठा वास्तुकलाची वैशिष्ट्ये पाहायला मिळतात.

20. मंदिराच गर्भगृहात सहा मूर्ती आहेत, त्यामध्ये भगव्या रंगाची मूर्ती वज्रेश्वरी देवीची आहे.

21. त्याचप्रमाणे परशुरामाची आई रेणुका आणि वाणीची देवी सप्तशृंगी महालक्ष्मीची या ठिकाणी मुर्त्या आहेत.

22. देवीच्या उजव्या बाजूस कालिका माता आणि परशुराम यांच्या मुर्त्या आहेत. कालिका देवी या ठिकाणची ग्रामदेवता आहे.

23. त्याचबरोबर या ठिकाणी गणेश, भैरव, हनुमान आणि मोराबा यांसारख्या विविध देवतांच्या मूर्ती पाहायला मिळतात.

24. मंदिराच्या आवारात कपिलेश्वर, महादेव, दत्त, हनुमान आणि गिरी गोसावी पंथाचे मंदिर आहेत.

25. वज्रेश्वरी गरम पाण्याचे कुंड पाहायला मिळतात. या गरम पाण्याच्या झरे पर्यटकांचे आकर्षण आहे. या गरम पाण्याच्या झरे चमत्कार मानले जातात. या गरम पाण्यात यात्रेकरू अंघोळ करतात.

26. महाराष्ट्र राज्यात एकूण 28 गरम पाण्याचे झरे आहेत, त्यापैकी 18 गरम पाण्याचे झरे फक्त कोकणात आहेत.

27. गरम पाण्याचे उष्णतेपासून वीज निर्मिती करता येते. अमेरिका, जपान, इटली अशा पंचवीस देशांमध्ये या पद्धतीने वीजनिर्मिती चालू आहे.

28. आपल्या देशात पवन ऊर्जा आणि कोळसा यापासून वीजनिर्मिती केली जाते. गरम पाण्याच्या उष्णतेपासून वीजनिर्मिती करायला खूप खर्च येतो. त्यामुळे सध्यातरी आपल्या इथे गरम पाण्यापासून वीजनिर्मिती करत नाही.

29. कोकणामध्ये अठरा गरम पाण्याचे झरे आहेत. भविष्यात या ठिकाणी पाण्याच्या उष्णतेचा वापर करून वीजनिर्मिती करता येईल.

रत्नागिरी जिल्ह्यातील राजवाडी या ठिकाणी तीन मेगावॉटचा भू-औष्णिक प्रकल्प उभारण्याचा विचार चालू आहे.

31. अकोली कुंड हॉट स्प्रिंग्ससाठी प्रसिद्ध आहे या कुंडाभोवती शिवाचे आणि साईबाबाचे मंदिर पाहायला मिळते.

32. वज्रेश्वरी मंदिराच्या आवारात नवरात्रीच्या निमित्ताने मोठा उत्सव साजरा करण्यात येतो .

33. निर्मल माहात्म्य, तुंगारेश्वर महात्म्य आणि वज्रेश्वरी महात्म्य यासारख्या अनेक हिंदू पुराणिक परंपरेत वज्रेश्वरी मंदिराचा संदर्भ पाहायला मिळतो.

34. या मंदिरावर आधारित नाथा संप्रदायमध्ये शैव पंथातील मध्ययुगीन संस्कृतीच्या ग्रंथांमध्ये या मंदिराचा उल्लेख आढळतो.

35. या ठिकाणी अनेक महाराष्ट्रीन खाद्यपदार्थ मिळतात.

वज्रेश्वरी कसे पोहचाल ?

36. वज्रेश्वरी हे ठिकाण राष्ट्रीय महामार्गाला लागूनच असल्यामुळे येण्यासाठी कसलीही अडचण येत नाही.

37. खासगी गाडीने या ठिकाणी जाता येत त्याचबरोबर वसई आणि ठाणेवरून वज्रेश्वरीसाठी बसेस उपलब्ध आहेत.

38. वेस्टर्न रेल्वे वसई हे येथील जवळचे रेल्वस्थानक आहे. येथून वज्रेश्वरी 30 किलोमीटर अंतरावर आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

वज्रेश्वरी गरम पाण्याचे झरे जिल्हा

महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात वज्रेश्वरी या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत.

वसई फत्ते झाल्यावर चिमाजी आप्पाने कोणाचे दर्शन घेतले ?

वसई फत्ते झाल्यावर चिमाजी आप्पाने वज्रेश्वरी देवीचे दर्शन घेतले.

वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून कोणी जिंकला ?

वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून चिमाजी आप्पाने जिंकला.

हे देखील वाचा

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण वज्रेश्वरी मंदिर माहिती मराठी – vajreshwari temple information in marathi जाणून घेतली.

त्याचबरोबर या लेखात आपण वज्रेश्वरी मंदिर इतिहास पाहिला आहे, गणेशपुरी मंदिर माहिती आणि त्या ठिकाणाची गरम पाण्याचे झरे याबद्दल माहिती मराठी पहिली आहे.

वज्रेश्वरी मंदिर माहिती मराठी – vajreshwari temple information in marathi तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

Leave a Comment