महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय माहिती

varkari information in marathi – एकाच धर्माची विविध विचारधारा किंवा परंपरा मानणाऱ्या वर्गाला संप्रदाय असे म्हणतात. भारतातील प्रमुख धर्म या लेखातून आपण पाहिले की भारतात विविध धर्माचे लोक एकोप्याने राहतात. यातील प्रत्येक धर्माचे संप्रदाय आहेत.

हिंदू धर्मात विष्णूला परमेश्‍वर मानून त्याची उपासना करणाऱ्या पंथाला वैष्णव संप्रदाय म्हणतात, या पंथाला व्यापक अर्थाने भागवत धर्म (bhagavat dharma samaj) या नावाने ओळखतात. महाराष्ट्र राज्यात वैष्णव संप्रदायान्तर्गत उपासक पंथ आहेत. यातील वारकरी, महानुभाव व समर्थ हे प्रमुख संप्रदाय आहेत.

या लेखातून आपण महाराष्ट्रात असणाऱ्या तीन पंथापैकी एक पंथ वारकरी संप्रदाय माहिती (varkari information in marathi) जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्रातील वैष्णव संप्रदाय माहिती मराठी (vaishnav sampraday in marathi)

विषयमहाराष्ट्रातील वैष्णव संप्रदाय
प्रकारहिंदू धर्मातील पंथ
प्रमुख संप्रदायवारकरी
महानुभाव
समर्थ

विष्णू देवाला हिंदू धर्मातील प्रमुख देवता म्हणून ओळखले जाते. विष्णू देव वैष्णव परंपरेतील महत्वाचे देव आहेत. विष्णू देवाचे 24 रूप मानले जातात, यातील 23 अवतारात विष्णूने पृथ्वीवर जन्म घेतला आहे.

कृष्ण हाही विष्णूचाच एक अवतार आहे. कृष्णस्वरूप असणाऱ्या विठ्ठलाला वारकरी संप्रदायाने उपास्य दैवत मानतात. महानुभाव पंथात कृष्णाची उपासना केली जाते. राम हा विष्णूचा अवतार असून याची उपासना समर्थ संप्रदायात केली जाते.

महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय माहिती (varkari information in marathi)

varkari information in marathi

भगवान श्री कृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार मानला जातो. विठोबा हा द्वापार युगातील दुसरा व दशावतारातील नववा अवतार आहे, असे मानले जाते.

महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे मुख्य दैवत विठोबा मानले जाते. विठोबा हे कृष्णाचे रूप असून कृष्ण हा विष्णूचा अवतार आहे. विठ्ठलाला विठोबा, पांडुरंग, विठुराया, पंढरीनाथ म्हणून संबोधिले जाते.

विठोबा महाराष्ट्र राज्यातील मराठा, वैष्णव, हिंदू व वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत आहे. तसेच कर्नाटक राज्यात हरिदास संप्रदाय विठोबास आराध्य दैवत मानतात.

महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय भक्तिसंप्रदाय म्हणून वारकरी संप्रदायाची ओळख आहे. विठोबाची ओढ असणारे लोक दरवर्षी मोठ्या संख्येने पंढरपूरला वारी करतात. या वारीला आषाढी वारी (ashadhi wari) म्हणून ओळखले जाते.

पंढरीचा वास, चंद्रभागेस्नान, आणि दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत, अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिलापुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे मानले जाते.

पांडुरंगाच्या वारीला वारकऱ्यांनी खूप महत्त्व दिले आहे. या संप्रदायाच्या आचारधर्मानुसार संप्रदायाच्या अनुयायांनी प्रतिवर्षी दोन वेळा श्रीविठ्ठलाची वारी केलीच पाहिजे. पहिली आषाढ शुद्ध एकादशीस व दुसरी कार्तिक शुद्ध एकादशीला.

आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी ह्या दोन वाऱ्या प्रमुख मानल्या जातात. वर्षातून आषाढी किंवा कार्तिकी वारी केली तरी चालते.

श्रीज्ञानदेवांनी समाधी घेतल्यापासून दरवर्षी कार्तिक वद्य एकादशीस वारकरी संप्रदायाचे अनुयायी आळंदीला नियमाने जमतात.

तसेच वारकरी संप्रदायात माळ घालणे महत्वाचे आहे. माळ घाळणे म्हणजे एक नवा आध्यात्मिक जन्म घेणे, असे मानले जाते. प्रत्येक वारकऱ्याच्या गळ्यात तुळशीच्या 108 मण्यांची माळ असते. त्यामुळे या संप्रदायास माळकरी संप्रदाय देखील म्हणतात.

वारकरी संप्रदायाचे उपास्य दैवत विठोबा, मुख्य क्षेत्र पंढरपूर आणि तीर्थ चंद्रभागा होय. या संप्रदायात चंद्रभागेप्रमाणेच इंद्रायणी, गोदावरी, कऱ्हा, तापी ह्या नद्यांनाही पवित्र मानले जाते.

वारकरी संप्रदायाची दीक्षा माहिती मराठी (varkari sampraday marathi mahiti)

वारकरी संप्रदायाची दीक्षा घेण्याचा विधी एकदम साधा असतो. सुरवातीला तुळशीच्या 108 मण्यांची माळ घालून वारकरी फडप्रमुखाकडून घ्यावी लागते. त्यानंतर ही माळ दीक्षा देणाऱ्या साधूकडे घेऊन जायचे.

मग तो साधू ती माळ ज्ञानेश्वरीवर ठेवतो. यानंतर प्रतिवर्षी पंढरीची वारी करण्याचे वचन घेतो. या वचनानुसार वर्षातून पंढरपूरची किमान एक तरी वारी केलीच पाहिजे. तसेच आळंदीची वारीही केलीच पाहिजे.

Varkari diksha rules in marathi – वारकऱ्यांची दीक्षा देत असताना साधू काही नियम सांगतात. ते नियम पुढीलप्रमाणे.

  1. रोज हरिपाठ करावा, सोबतच रामकृष्णहरी ह्या मंत्राचा जप करावा.
  2. परस्त्रीला मातेसमान मानावे.
  3. सत्य बोलावे.
  4. मद्यपान करू नये, इतकेच नाही तर मनात सुध्दा आणू नये.
  5. कांदालसूण आणि मांसाहार वर्ज्य करावा.
  6. प्रपंचातील कर्मे श्रीविठ्ठलस्मरण करीत पार पाडावी.

हे नियम पाळण्याचे वचन घेतल्यावर वारकरी दीक्षा पूर्ण होते. मग पुंडलीक वरदा हरिविठ्ठल ह्या गजरात गळ्यात दीक्षा घेणारा ती माळ आपल्या गळ्यात घालतो.

गळ्यात घातलेली तुळशीची माळ काही कारणाने तुटली तर ती पुन्हा गुंफून गळ्यात घालीपर्यंत वारकऱ्याला अन्नसेवन करता येत नाही.

वारकऱ्याने गोपी चंदनाचा ऊर्ध्व पुंड्र लावून मुद्रा लावून त्यासोबत द्वादश टिळा लावणे हाही आचारधर्माचा एक भाग आहे.

पंढरीची वारी माहिती मराठी (pandharichi vari information in marathi)

विठ्ठलाच्या दर्शनाने दुःखाला वारते आणि सुखाचा मार्ग दाखवते ती पंढरीची वारी…

दरवर्षी आषाढी व कार्तिकी वारीला महाराष्ट्र राज्यातून लाखोच्या संख्येने वारकरी पंढरपूर जमतात. यामध्ये बरेच भाविक संप्रदायाची दीक्षा न घेतलेले असतात. कर्नाटक राज्यातील देखील बरेच लोक विठोबाला मानत असल्याने तेही मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.

पंढरपुरात आल्यावर पांडुरंगाचे दर्शन घेण्यापूर्वी पुंडलिकाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. पुंडलिकानांतर विठ्ठलाचे दर्शन घेतले जाते. त्यानंतर मग गावप्रदक्षिणा होते.

काही वेळ भजन-कीर्तनात करतात. बाकी तीर्थांला जसे तीर्थोपवास, श्राद्ध, मुंडण करतात तसे या ठिकाणी केले जात नाही.

आषाढी व कार्तिकीच्या आदल्या दिवसापासून म्हणजे शुद्ध दशमीपासून प्रत्येक फडावर रात्री भजन-कीर्तनांचा कार्यक्रम असतो. दशमीपासून चतुर्दशीपर्यंत हा कार्यक्रम चालुच असतो.

पंढरपूरपासून जवळच गोपाळपूर गाव आहे. येथे गोपाळ कृष्णाचे मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम शामजी अनंत नांदिवरेकर व त्यांचे आप्त ह्यांनी सुरू केले. गजेंद्र यशवंत नावाच्या व्यक्तीने हे बांधकाम पूर्ण केले.

गोपाळपूर गावातील कृष्णाच्या मंदिरात पौर्णिमेच्या दिवशी सकाळी भजने गात दिंड्या जातात. त्यानंतर तेथे काल्याचा कार्यक्रम होतो. काल्याच्या लाह्या वारकरी परस्परांना खाऊ घालतात आणि त्यानंतर वारी संपते.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय माहिती (varkari information in marathi) जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ? हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

वारकरी म्हणजे काय ?

वारी या शब्दापासून वारकरी शब्द तयार झाला आहे.
वारी म्हणजे नियमित फेरी होय.
आषाढी एकादशीला व कर्तिकी एकादशीला पंढरपूरला लाखो लोक दरवर्षी पांडुरंगच्या दर्शनाला जातात. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. जो ही परंपरा मनापासून मानतो, त्याला वारकरी असे म्हणतात.

संप्रदाय म्हणजे काय ?

एकाच धर्माची विविध विचारधारा किंवा परंपरा मानणाऱ्या वर्गाला संप्रदाय असे म्हणतात.

वारकरी संप्रदाय म्हणजे काय ?

वारकरी संप्रदाय म्हणजे असा लोक समुदाय जो कृष्णरुपी विठोबाला आपला उपास्य दैवत मानून त्याची आराधना करतात. वारकरी संप्रदाय महाराष्ट्रातील प्रमुख संप्रदाय म्हणून ओळखला जातो.

वारकरी संप्रदायाचा उदय कोणत्या काळात झाला ?

वारकरी संप्रदाय खूप पूर्वीपासून चालत आलेला असून, या संप्रदायाचा उदय इसवी सनाच्या अकराव्या-बाराव्या शतकात झाला.

वारकरी संप्रदायाचा संघटक म्हणून कोणास ओळखले जाते ?

ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस
वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानेश्वर माऊलींनी रचला. त्यांच्या रूपाने वारकरी संप्रदायाला चैतन्याचा एक महास्त्रोत मिळाला. यामुळे माउलींना
वारकरी संप्रदायाचा संघटक म्हणून ओळखले जाते.

वारकरी संप्रदायाचा मंत्र कोणता आहे ?

राम कृष्ण हरी हा वारकरी संप्रदायाचा मंत्र आहे.

पुढील वाचन :