वसुबारस सणाची माहिती मराठी

By | December 3, 2022

vasubaras 2022 marathi mahiti – हिंदू परंपरेत पशू आणि प्राण्यांना विशेष महत्व दिले जाते. या प्राण्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक सण आणि उत्सव साजरा करण्याची हिंदू संस्कृतीत पद्धत आहे. यापैकीच एक सण म्हणजे वसुबारस होय. हा सण भारतातील सर्व राज्यात मोठ्या उत्साहात साजरा करतात.

या लेखातून आपण वसुबारस माहिती मराठी () जाणून घेणार आहोत. यात आपण वसुबारस सण कसा साजरा करायचा ? याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

वसुबारस सणाची माहिती मराठी (vasubaras 2022 marathi mahiti)

vasubaras 2022 marathi mahiti
नाववसुबारस
इतर नावगोवत्स द्वादशी
प्रकारभारतीय सण
महत्वगाई-गुरांबददल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी
साजरा केव्हा करतात ? आश्विन महिन्यातील वद्य द्वादशी

हिंदू कालमापनातील द्वादशी ही एक तिथी असून, अमावास्येनंतर बाराव्या दिवशी आली तर हिला शुक्ल द्वादशी व पौर्णिमेनंतर बाराव्या दिवशी आली तर हिला कृष्ण द्वादशी म्हणतात. आश्विन कृष्ण द्वादशीला वसुबारस हा सण साजरा केला जातो. या सणाने दिवाळीची सुरूवात होते.

दिवाळी हा एक प्रमुख हिंदू सण आणि उत्सव म्हणून भारतात सर्वत्र साजरा करण्यात येतो. दिवाळीची सुरुवात वसुबारसने होऊन त्यांनतर धनतेरस, दिपावली, गोवर्धन पूजा आणि भाईदुज अशा पाच दिवस दिवाळी साजरी करतात. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे महत्त्व विशेष आहे

वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी आलेली बारस म्हणजे द्वादशी, याला गोवत्स द्वादशी देखील म्हणतात. भारत हा कृषिप्रधान देश असल्याने या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे.

वसुबारस कसा साजरा करायचा (How to celebrate vasubaras in marathi 2022)

वसुबारस या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात, परिसरात दिवाळी सणाच्या प्रारंभानिमित्त पणत्या लावून रोषणाई करण्याची पद्धत आहे. या दिवशी घरातील स्रीया उपवास करतात. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या, यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते.

भारतात गाईला गो, गौ, गऊ, गोमाता, धेनू अशी विविध नावे आहेत. तसेच हिंदू परंपरेत गायीला माता मानले जाते. तिच्या पोटात तेहतीस कोटी देवतांचा वास आहे, अशी मान्यता आहे.

वसुबारस या दिवशी घरातील गुरे, वासरांना स्वच्छ पाण्याने अंघोळ घालतात. अंगाला हळद लावली जाते, त्यांच्या अंगावर नवी वस्त्रे घालून तिला नटवले जाते. ज्यांच्या घरी गायी नाही, ते घरी पाटावर रांगोळीने किंवा तांदळाने गाय वासराचे चित्र तयार करतात.

वसुबारसच्या दिनी घरातील बायका उपवास धरतात. या दिवशी गोड पुरणाचा स्वयंपाक करतात.

घरातील सुवासिनी बायका गाईच्या पायावर पाणी घालतात. त्यानंतर हळद-कुंकू लावून गाईला फुले, अक्षता वाहून फुलांची माळ गळ्यात घालतात. मग निरांजनाने ओवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी व बनविलेले गोड पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात.

ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडतात. या दिवसानिमित्त आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा घालण्यात येते.

सारांश

या लेखातून आपण वसुबारस सणाची माहिती मराठी (vasubaras 2022 marathi mahiti) जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा… 😊

🙏 Happy Diwali 2022 🙏

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

वसुबारस म्हणजे काय (vasubaras mhanje kay)

वसुबारस हा हिंदू सण असून वसु या दिवशी गायीचे पूजन केले जाते. वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी आलेली बारस म्हणजे द्वादशी, म्हणून याला गोवत्स द्वादशी देखील म्हणतात.

वसुबारसचे महत्व सांगा (vasubaras che mahatva)

हिंदू धर्मात गाईला महत्वाचे स्थान आहे. म्हणून तिचा सन्मान करण्यासाठी या दिवशी गाईची पाडसासह पूजा केली जाते. तसेच घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.

हे लेख जरूर वाचा :

  1. जाणुन घ्या आपण दिवाळी का साजरी करतो?
  2. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी 2022
  3. दिवाळी पूजेचा मुहूर्त 2022
  4. श्री महालक्ष्मी पुजा विधी मराठीत
  5. गणपतीची पूजा कशी मांडावी?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *