महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी दिवस माहिती

Vidyarthi Divas In Maharashtra Mahiti – आठ वर्षाचा अभ्यासक्रम फक्त 2 वर्ष 3 महिन्यात पूर्ण करणारे विद्यार्थी म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर. आंबेडकरांनी अतिउच्च दर्जाची विद्वता व ज्ञान मिळविले. तरीदेखील ते स्वतःला आजन्म विद्यार्थी मानत आणि ते आदर्श विद्यार्थी ठरले.

भीमराव आंबेडकर हे भारतातील सर्वात प्रतिभाशाली व सर्वाधिक उच्च विद्याविभूषित व्यक्ती म्हणून ओळखले जाते. यांचा अभ्यास आणि विचार अतुलनीय आहे. त्यांनी एकूण 64 विषयांत प्राविण्य मिळवणे होते. जवळपास 32 डिग्री आणि 9 भाषा घेऊनही त्यांचा अभ्यास सुरूच होता.

शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन असून त्याच्या कठोर परिश्रमाची जाण व्हावी यासाठी महाराष्ट्र शासनाने 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.

या लेखातून आपण महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी दिवस माहिती (Vidyarthi Divas In Maharashtra Mahiti) जाणून घेणार आहोत.

महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी दिवस माहिती (Vidyarthi Divas In Maharashtra Mahiti)

Vidyarthi divas in maharashtra mahiti
विषयविद्यार्थी दिवस
प्रकारऐतिहासिक दिन
उद्देशशिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन असून त्याच्या कठोर परिश्रमाची जाण व्हावी म्हणून
केव्हा साजरा करतात ?7 नोव्हेंबर (दरवर्षी)

7 नोव्हेंबर 1900 रोजी बाबासाहेबांनी सातारा शहरातील राजवाडा चौकात असलेल्या गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये पहिल्या इंग्रजी इयत्तेत प्रवेश घेतला होता. आता या शाळेचे नाव आता प्रतापसिंह हायस्कूल असे आहे.

येथे हायस्कूलमध्ये सन 1904 पर्यंत म्हणजेच चौथी पर्यंत शिकले. या शाळेत भिवा रामजी आंबेडकर अशी नोंद असून शाळेच्या रजिस्टरमध्ये 1914 क्रमांकासमोर बाल भिवाची स्वाक्षरी आहे. हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळेने जपून ठेवला आहे.

पत्रकार अरुण जावळे यांनी 7 नोव्हेंबर या दिवसाला विद्यार्थी दिवस म्हणून घोषित करण्याची मागणी महाराष्ट्र शासनाला केली होती. या मागणीवर 2017 साली महाराष्ट्र शासनाने हा दिवस विद्यार्थी दिन म्हणून घोषित केला.

हा दिवस राज्यातील सर्व शाळेत साजरा केला जातो. या दिवशी राज्यातील सर्व शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व, काव्यवाचन स्पर्धा आयोजित केल्या जातात.

महाराष्ट्र राज्यातील ज्ञान दिन माहिती (Maharashtra Knowledge Day Marathi)

अनेक दशकांपासून आंबेडकरवादी लोक 14 एप्रिल आंबेडकर जयंतीला ज्ञान दिवस म्हणून साजरा करीत होते. महाराष्ट्र सरकारने 2017 साली आंबेडकर जयंतीला ज्ञान दिवस म्हणून घोषित केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ज्ञानाचे प्रतिक म्हणून ओळखले जाते. त्यांची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत.

1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जगातील सर्वाधिक शिकलेल्या व्यक्तींपैकी एक आहेत. भीमरावांनी एकूण 32 पदव्या मिळवलेल्या आहेत.

2. इसवी सन 2004 साली कोलंबिया विद्यापीठाने जगातल्या टॉप 100 विद्वानांची यादी तयार केली होती. या यादीत पहिले नाव डॉ. भीमराव आंबेडकर यांचे होते. या विद्यापीठाने भीमरावांचा उल्लेख आधुनिक भारताचे जनक असा केला होता.

3. इसवी सन 2011 साली इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठाने डॉ. आंबेडकरांवर केलेल्या संशोधननानुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ज्ञानक्षेत्रांतील तब्बल 64 विषयांचा गाढा अभ्यास (मास्टरी) होता, जगाताच्या इतिहासात अन्य कुणाचेही एवढ्या विषयांत प्रभुत्व नव्हते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव जगातील आणि देशातील अनेक गोष्टींना आणि संस्थांना दिलेले आहे.

यामध्ये उद्यान, गावे, शहरे व स्थळे, ग्रंथालय/वाचनालय, कारखाने, चौक व रस्ते/महामार्ग, मालिका, चित्रपट, पक्ष, संस्था व संघटना, नाटके, दवाखाने, पुरस्कार व पारितोषिके, पुतळे, प्रतिष्ठान, वसतिगृहे, योजना, मंडळे, बौद्ध विहारे, पुस्तके, शाळा व महाविद्यालये, विद्यापीठे व शैक्षणिक संस्थाने, विमानतळे, वसतिगृहे, योजना, स्थानके, वास्तू स्मारके, संमेलने, सभागृहे व भवने, शैक्षणिक संस्था, स्टेडियम यांचा समावेश आहे.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी दिवस (Vidyarthi Divas In Maharashtra Mahiti) याविषयी माहिती जाणून घेतली. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

विद्यार्थी दिवस केव्हा आणि कधीपासून साजरा केला जातो ?

27 ऑक्टोबर 2017 रोजी महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने 7 नोव्हेंबर हा दिवस विद्यार्थी दिवस म्हणून घोषित केला. तेव्हापासून दरवर्षी 7 नोव्हेंबर हा दिवस महाराष्ट्र राज्यात विद्यार्थी दिवस म्हणून साजरा केला जातो.

विद्यार्थी दिवस साजरा का केला जातो ?

शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन असून त्याच्या कठोर परिश्रमाची जाण व्हावी म्हणून विद्यार्थी दिवस साजरा केला जातो.

पुढील वाचन

  1. बाबासाहेब आंबेडकर विचार मराठी माहिती
  2. यशवंत भीमराव आंबेडकर मराठी माहिती
  3. महाराष्ट्र दिन माहिती मराठी
  4. संविधानाची उद्देशिका म्हणजे काय ?
  5. धम्मचक्र प्रवर्तन दिन माहिती मराठी