तमाशा सम्राज्ञी – विठाबाई नारायणगावकर यांची माहिती मराठी

vithabai narayangaonkar in marathi – विठाबाई नारायणगावकर यांना महाराष्ट्रातील तमाशा सम्राज्ञी म्हणून ओळखले जाते. राज्यातील तमाशा रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणाऱ्या भारतीय गायिका आणि नृत्यांगना म्हणून यांची ओळख आहे. या लेखातून आपण महाराष्ट्रातील तमाशा सम्राज्ञी – विठाबाई नारायणगावकर यांची माहिती मराठी (vithabai narayangaonkar in marathi) यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

हा लेख जरूर वाचामहाराष्ट्रातील लोकनाट्य तमाशा माहिती मराठी (tamasha information in marathi)

Table of Contents

विठाबाई नारायणगावकर यांची कथा (vithabai narayangaonkar in marathi)

vithabai narayangaonkar in marathi
संपूर्ण नाव विठाबाई नारायणगावकर
जन्म1 जुलै 1935
कार्यक्षेत्रलोकनाट्य – तमाशा
भाषामराठी आणि हिंदी
पुरस्कारसंगीत नाटक अकादमी
मृत्यू15 जानेवारी 2002

भाऊ बापू नारायणगावकर आणि त्यांचे भाऊ दोघे मिळून पंढरपूरमध्ये तमाशा मंडळ चालवत होते. भाऊ मांग नारायणगावकर यांना 1जुलै 1935 साली कन्याप्राप्ती झाली, तिचा जन्म पंढरपुरात झाल्याने तिचे नाव विठा असे ठेवण्यात आले.

कलाकार कुटुंबात जन्मलेल्या विठाला लहानपणापासूनच नृत्याची आवड लागली त्यांनतर त्यांनी बहिण केशरबाई यांच्या मार्गदर्शनात उत्तम नृत्यकला प्राप्त केली. एकोणिसाव्या शतकात प्रत्येक गावात जत्रा असली की तमाशाचे फड रंगत असायचे. यातूनच विठाबाई रसिकांच्या भेटीला आल्या आणि आपल्या अदाकारीने रसिकांच्या मनावर हुकमत गाजवली.

विठा भाऊ मांग नारायणगावकर यांचा वर्ण जरी सावळा असला तरीदेखील त्यांचा गोड गळा, नृत्याविष्कार आणि उत्तम अभिनयाने त्यांनी रसिकांच्या मनात कायमचे घर केले. आजही तमाशाचे नाव काढले, की विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळ आपल्याला आठवते.

पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची ही लावणी विठाबाई यांनी अजरामर केली. यासोबतच मुंबईची केळेवाली, रक्तात न्हाली कु-हाड असे अनेक प्रसिद्ध वगनाट्य सादर केले, जे आजही तितकेच लोकप्रिय आहे.

विठाबाईंचे रूप, अदा आणि नृत्य या सार्‍यांची प्रेक्षकांवर खूपच मोहिनी होती. त्यामुळे विठाबाईंना तमाशाची राणी म्हणून ओळखले जाऊ लागले.

पोटापेक्षा कलेसाठी नाचणारी विठाबाई गरोदर असतानाही स्टेजवर नाचत होत्या. नाचता नाचता पोटात बाळंतपणाच्या कळा आल्यावर त्या स्टेजच्या मागे असणा-या तंबूत गेल्या. तिथे विठाबाई यांनी बाळाला जन्म दिला.

बाळाची नाळ दगडाने ठेचून विठाबाई परत स्टेजवर आल्या, मुलगा झाल्याची बातमी देऊन पुन्हा नाचायला सुरुवात केली. सर्व प्रेक्षक मंडळी हात जोडून विठाबाईंना विनंती करत होते आराम करा, आमचे पैसे फिटले.

हा लेख जरूर वाचाकलामहर्षी बाबूराव पेंटर मराठी माहिती (baburao painter information in marathi)

विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळ (vithabai tamasha mandal in marathi)

इसवी सन 1970 मध्ये विठाबाई नारायणगावकर यांनी त्यांचा स्वतंत्र लोकनाट्य तमाशा मंडळ सुरू केले. या काळात हौसा-मंजुळा कोल्हापूरकर, काळू-बाळू कवलापूरकर, दादू इंदुरीकर, दत्तोबा तांबे-शिरोलीकर, दत्ता महाडिक-पुणेकर असे नावाजलेले तमाशा मंडळ होते.

विठाबाईंनी आईचं काळीज, रायगडची राणी, रक्तात न्हाली कुर्‍हाड अशी अनेक नवी वगनाट्ये बसवली. यातील मुंबईची केळीवाली हे त्यांचे सर्वाधिक लोकप्रिय वगनाट्य होते.

पुढील चित्रपटांत विठाबाई भाऊ नारायणगावकर यांनी नृत्ये केली होती.

  1. कलगी तुरा
  2. उमज पडेल तर
  3. छोटा जवान
  4. सर्वसाक्षी

विठाबाई नारायणगावकर यांना मिळालेले पुरस्कार (vithabai narayangaonkar awards in marathi)

विठाबाई भाऊ नारायणगावकर यांना अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या नावाने तमाशा क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र सरकारद्वारे दिला जातो.

विठाबाईंना इसवी सन 1957 आणि 1990 मध्ये गौरवार्थ भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते पदके मिळाली होती. तसेच त्यांना संगीत नाटक अकादमी्चा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

विठाबाई नारायणगावकर यांचे निधन (vithabai narayangaonkar death in marathi)

एके काळी तमाशातील राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठाबाई यांच्या आयुष्याची सायंकाळ उपेक्षितच राहीली. विठाबाईंनी आयुष्यभर प्रचंड पैसा कमावला, पण त्या पैशांचा संचय विठाबाईंना करता आला नाही.

आयुष्याच्या शेवटचे दिवस त्यांना अतिशय खडतरपणे काढावे लागले. आर्थिक संकट आणि अनेक व्याधींनी त्यांना जणू घेरले होते. अनेक कलाप्रेमींनी विठाबाईंना आर्थिक साहाय्य मिळवून दिले. दुर्गा भागवत, पंतप्रधान नरसिंहराव आणि इतर राजकारणी लोकांनी विठाबाईंना देणगी पाठवली, त्यामुळे त्यांचे वैदकिय उपचार चालू राहिले.

अर्धांगवायू आणि मेंदूज्वराच्या आजारामुळे विठाबाईंना खूप त्रास झाला. अखेर 15 जानेवारी 2002 रोजी विठाबाई नारायणगावकर यांचे पुण्यात निधन झाले.

हा लेख जरूर वाचाप्रसिद्ध मराठी नाटक माहिती (old marathi natak name list)

सारांश

या लेखातून आपण विठाबाई नारायणगावकर यांची कथा (vithabai narayangaonkar information in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. यात आपण विठाबाई नारायणगावकर यांना मिळालेले पुरस्कार आणि निधन याविषयी माहिती जाणून घेतली.

ही माहिती तुम्हाला कशी वाटली, हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

विठाबाई नारायणगावकर यांचे प्रसिद्ध वगनाट्य कोणते आहे ?

विठाबाईंनी आईचं काळीज, रायगडची राणी, रक्तात न्हाली कुर्‍हाड अशी अनेक नवी वगनाट्ये बसवली. यातील मुंबईची केळीवाली हे त्यांचे सर्वाधिक लोकप्रिय वगनाट्य होते.

विठाबाई नारायणगावकर यांच्या नावाने कोणता पुरस्कार दिला जातो ?

विठाबाईंच्या नावाने तमाशा क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र सरकारद्वारे दिला जातो.

Leave a Comment