वृत्तांत लेखन कसे करावे ?

By | December 30, 2022

vrutant lekhan in marathi – वृत्त म्हणजे बातमी, सद्य घडामोडींविषयी लिहिलेली माहिती म्हणजे बातमी होय. बातमी ही वेळेला अनुसरून लिहिलेली असते. थोडक्यात सांगायचे झाले तर, जे नवीन घडले आहे, ते वाचकाला सांगणे म्हणजे बातमी होय.

दिवसभरात आपण रेडिओ, टीव्ही, सोशल मीडिया आणि वृत्तपत्रांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत बातम्या पोहचतात. या बातम्या लिखाणाला वृत्तांत लेखन असे म्हणतात.

या लेखातून आपण बातमी लेखन कसे करावे (batmi lekhan in marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

वृत्तांत लेखन माहिती मराठी (vrutant lekhan in marathi)

vrutant lekhan in marathi
विषयबातमी लेखन
प्रकार उपयोजित लेखन
वापरबातम्या प्रसिद्ध करण्यासाठी

उपयोजित लेखनातील महत्वाचा प्रकार म्हणजे बातमी लेखन होय. हे लेखन विविध विषयावर केले जाते, उदा. राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक इत्यादी.

वृत्तांत लेखन करताना खालील गोष्टीं महत्वपूर्ण ठरतात.

  1. ज्या भाषेत बातमी लेखन करणार आहे त्या भाषेतील व्याकरणाची ओळख असणे आवश्यक आहे.
  2. बातमी लेखनात घडलेल्या घटनांचा वेध घेतला जातो, त्यामुळे बातमी लिहिताना नेहमी भूतकाळात असावी.
  3. वाक्याची रचना आणि भाषा सरळ आणि सोपी असावी, जेणेकरून वाचकाला लिहिलेली बातमी सहज समजेल.
  4. बातमी लिहिताना स्वतःचे मत मांडण्याची गरज नसते. जो मुद्दा असेल तो लिखाणातून स्पष्टपणे व्यक्त झाला पाहिजे.

वृत्तपत्राचा प्रकार माहिती मराठी (vrutta lekhan types marathi)

वृत्तपत्राचे मुख्य तीन प्रकार पडतात.

1. बातमी – जे नवीन घडले आहे, ते वाचकाला सांगणे म्हणजे बातमी होय.

2. अग्रलेख – एखाद्या घटनेचे महत्त्व वाचकांना मोजक्या, तर्कशुद्ध, विश्लेषनात्मक आणि प्रभावी पद्धतीने शब्दातून मांडून दाखविणारा मजकूर म्हणजे अग्रलेख होय.

3. वृत्तलेख – वृत्तलेखन म्हणजे घडून गेलेल्या बातमीचा आढावा घेणे होय.

याशिवाय स्तंभ, सदरे आणि वाचकांची पत्रे यांचा समावेश बातमी लेखनात केला जातो.

बातमी लेखन कसे करावे (batmi lekhan in marathi)

बातमी लेखन करण्याअगोदर घटनेची तीव्रता समजून घेतली जाते. उदा. एखाद्या घडलेल्या घटनेचा समाजातील कोणत्याही घटकावर परिणाम करत असेल तर ती घटनेला बातमी म्हणून शकतात.

यासोबतच घडलेल्या घटनेतून वाचकांच्या जीवनात काही बदल होणार असतील तर ती बातमी मानली जाते. यामध्ये तुम्ही प्रेरणादायी विचार किंवा वैचारिक लेख तसेच वाचकांच्या आवडीचे विषय घेऊन बातमी लेखन करू शकता.

बातमी लेखन करताना वेळेला खूप महत्व असते. अर्थात एखादी घटना घडून खूप काळ झाला असेल, तर तिला बातमी म्हणता येणार नाही. पण काहीवेळा बातमीला वेळेचा निकष धरत नाहीत.

शेवटचा आणि महत्वाचा घटक म्हणजे नाविन्य, घडलेली घटना नावीन्यपूर्ण असली तरच ती बातमी होऊ शकते. उदा. पावसाळ्यात पाऊस पडला तर ती बातमी होत नाही, पण उन्हाळ्यात पाऊस पडला तर ती सनसनाटी बातमी होते.

बातमी तयार करण्याचे निकष माहिती मराठी (vrutant lekhan format in marathi)

1. बातमी लिहिताना घडलेल्या घटनेला आधार हवा, म्हणजे त्या घटनेत विश्वासाहर्ता असावी. ऐकीव माहितीवर आधारित समाजात तेढ निर्माण होईल, असे लिखाण करणे टाळावे.

2. बातमीची सुरुवात आकर्षक शीर्षकाने होते, त्यासाठी बातमीला असे शीर्षक द्यावे की, शीर्षक वाचताच वाचक बातमीकडे आकर्षित झाला पाहिजे.

3. यानंतर बातमीचा अतिमहत्वाच्या भाग सुरुवातीला लिहावा, आणि त्यांनतर संपूर्ण बातमी तपशीलवार मांडवी.

4. वृत्तलेखनात ठिकाण, वेळ आणि व्यक्ती यांचा उल्लेख असावा.

5. वृत्तलेखन करताना शक्यतो अलंकारिक भाषा वापरू नये. भाषा सरळ, साधी आणि सोपी असावी ज्यामुळे वाचकाला लिहिलेला मजकूर सहज समजेल.

बातमी लेखन नमुना मराठी (news writing format in marathi)

Heading – दुःखद बातमी ! ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचे 82 व्या वर्षी कॅन्सरने निधन

बातमीची सुरूवात – 23 ऑक्टोबर 1940 रोजी ब्राझीलच्या मिनास गेराइस राज्यातील ट्रेस कोराकोस येथे पेले यांचा जन्म झाला.

बातमीचा तपशील – फुटबॉल विश्वातील महारथी ब्राझीलचे फुटबॉलपटू पेले यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. पेले हे तीन वेळा फिफा विश्वचषक जिंकणारे एकमेव खेळाडू होते.

व्यक्तीविषयी माहिती – पेले या नावाने प्रसिद्ध असलेले एडसन अरांतेस डो नासिमेंटो यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1940 रोजी ब्राझीलच्या मिनास गेराइस राज्यातील ट्रेस कोराकोस येथे झाला.

1958 मध्ये ब्राझीलच्या पहिल्या फिफा विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच किशोरवयीन असलेल्या पेले यांनी फ्रान्सविरुद्धच्या उपांत्य फेरीत हॅट्ट्रिक केली होती.

विषय विस्तार – पेले यांना कोलन कॅन्सर झाला होता. त्यांची किडनी व हृदय नीट कार्य करत नव्हतं. त्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. त्यांना रुग्णालयात डॉक्टरांच्या विशेष निगरानीत ठेवण्यात आलं होतं. अखेर त्यांची झुंज अयशस्वी ठरली आणि त्यांचे निधन झाले.

समारोप – पेले यांच्या निधनाची बातमी त्यांच्या कुटुंबीयांनी रात्री त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पेले यांचा फोटो शेअर करत दिली.

प्रेम आणि प्रेरणा हीच पेले यांची खासियत होती,असं त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे. महान फुटबॉलपटूच्या निधनाचे वृत्त समजताच जगभरातील क्रीडाप्रेमींवर शोककळा पसरली.

बातमी लेखन नमुना लोकमत वरून घेतला आहे.

सारांश

या लेखातून आपण वृत्तांत लेखन कसे करावे (vrutant lekhan in marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. हा लेख तुम्हाला आवडला असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

वृत्तांत लेखन म्हणजे काय ?

वृत्तांत लेखन म्हणजे आपल्या आजूबाजूला जे घडले आहे, ते इतरांना लिखाणातून सांगणे होय.

बातमीची भाषा कशी असावी ?

बातमीची भाषा सोपी आणि सरळ असावी. गरजेपेक्षा जास्त लांब वाक्याची रचना नसावी. अगदी मोजक्या शब्दात स्पष्टपणे मुद्दा व्यक्त होईल अशी बातमीची भाषा असावी.

पुढील वाचन :

  1. विनंती पत्र लेखन मराठीत कसे लिहावे ?
  2. इंग्रजी भाषा कशी शिकावी ?
  3. ग्रामपंचायत माहिती अधिकार अर्ज कसा करावा ?
  4. प्रभावी व्यावसायिक पत्र कसे लिहावे ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *