Water information in marathi – पाणी म्हणजे जीवन हे आपणा सर्वांना माहितच आहे. सर्व काही पाणी पासून निर्माण झाले असून सर्व सजीव सृष्टी पाण्यामुळे जिवंत आहे. मानवी शरीरात सुधा 65 टक्के पाणी असते ते दोन हाडांच्या सांधे ओलसर ठेवण्यास मदत करते. यामुळे आपली हाडे एकमेकांवर घासून ठिसूळ होत नाही.
हृदय आणि मेंदू यांचे सुद्धा आणि पाण्याने बनलेल्या कवचा मुळे रक्षण होत असते. यामुळे आणि शिवाय कोणताही सजीव जिवंत राहू शकत नाही. माणसाप्रमाणे वनस्पती मध्ये 40 टक्के पाण्याचे प्रमाण असते. तर काही वनस्पती मध्ये 90 टक्के पाणी पाहायला मिळते. त्यांना जलवनस्पती असे म्हणतात.
पृथ्वीवरील प्रत्येक सजीवाच्या पोषणाला, वाढीला आणि जगण्यासाठी पाणी लागते म्हणून पाण्याला जीवन असे म्हटले गेले आहे.
आपल्याला पाण्याचे विविध रूपे आणि त्याची गुणधर्म पाहायला मिळतात. आज त्या लेखामध्ये आपण पाण्याचे विविध स्रोत आणि गुणधर्म मराठी माहिती – water information in marathi जाणून घेणार आहोत.
पाण्याचे गुणधर्म मराठी माहिती (Unique properties of water marathi)

शुद्ध पाणी हे रंगहीन असते. त्याला चव नसते आणि वासही नसतो. जिवाणू आणि रसायनमुक्त पारदर्शक पाणी असते. पाणी हलकी असते. तापमान जसे कमी होत जाते तस तसे ते पाण्याचे घनत्व कमी होत जाते.
पाणी हे एक संयुग आहे. त्यामुळे त्याच्या मध्ये अनेक वस्तू विरघळू शकतात, यामुळे पाणी दूषित होते. त्यामुळे जल प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे साधारणता शुद्ध पाणी मिळणे अवघड झाले आहे.
पाण्याचे रूपे मराठी माहिती – पाणी प्रामुख्याने घन, द्रव्य, वायू या तीन अवस्थेत आढळते. घनरूपाने बर्फ, द्रवरूपाने पाणी आणि वायुरूपात वाफ ही तीन पाण्याची रूप आहेत. या तिन्ही अवस्थेत पाण्याचे मूळ गुणधर्म कधीच बदलत नाही.
पृथ्वीवर अनेक स्रोत मधून पाणी मिळत असते. त्यामुळे ते स्रोतातून मिळणारे पाण्याचे गुणधर्म वेगळे असतात.
हा लेख जरूर वाचा – पर्यावरणाचे महत्व माहिती मराठी – paryavaran in marathi
पाण्याचे विविध स्रोत आणि गुणधर्म मराठी माहिती (sources of water information in marathi)
पाण्याचे विविध स्त्रोत आणि गुणधर्म – पाणी हे समुद्र, नदीतून, पावसापासून, झरे, ओढे, तलाव किंवा तळे यापासून मिळत असते. या विविध स्रोतातून मिळणारे पाणी पिण्यायोग्य तर काही पिण्यासाठी अयोग्य आहे. हेच आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत.
समुद्रातून मिळणारे पाणी – समुद्रातून मिळणारे पाण्याला सागरी पाणी असे म्हणतात. या पाण्यात मिठाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे या पाण्याच्या वापर पिण्यासाठी, शेतीसाठी किंवा उद्योगात करत नाहीत.
नदीचे पाणी मराठी माहिती – पर्वतावरून बर्फ वितळून हे पाणी तयार होते तसेच पावसाळ्यात पावसाचे पाणी या मध्ये येऊन मिळते. नदीच्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी करतात. याव्यतिरिक्त नदीच्या पाण्याचा उपयोग शेती आणि वीज निर्मिती करण्यासाठी केला जातो.
पण अलीकडच्या काळात नदीच्या पाण्यामध्ये सांडपाणी, मलमुत्र, कारखान्यातील टाकाऊ पदार्थ, मृत जीवजंतू, घातक आणि विषारी पदार्थ नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीचे पाणी दूषित होऊन, नदीचे पाणी विषारी बनत चालले आहे. याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. तसेच पर्यावरणाच्या साखळीतील घटकांवर सुद्धा होताना दिसतो.
पावसाचे पाणी मराठी माहिती – समुद्र आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जलसाठ्याची स्रोतच्या पाण्याची वाफ होते पुढे ही वाफ पावसामार्फत पृथ्वीवर येते. हे पाणी पिण्यास योग्य असते, कारण हे पाणी अशुद्ध नसते.
पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी वापरले जाते. या पाण्याचा हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात वापर करण्यासाठी तलावात साठवले जाते. बरेच पाणी जमिनीत मुरते आणि ते विहिरीला मिळते.
झरे, ओढे, तलाव आणि तळे – यामधील पाणी हे पूर्णता पावसामुळे साठलेले असते. विहीर, तलाव, बांध आणि धरणे ही मानवनिर्मित स्त्रोत असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साठविण्यात येते.
पाणी घोषवाक्य मराठी (water ghosh vakya in marathi)
पाणी अडवा पाणी जिरवा.
पाणी वाचवा जीवन वाचवा.
पाणीच आहे जीवनाचा आधार,
पाण्याविना शक्य नाही जीवनाचा उध्दार.
प्रत्येकाचा एकच नारा,
पाण्याची काटकसर करा.
पावसाचे पाणी आडवा,
हरितक्रांती घडवा.
पिण्यासाठी हवे शुद्ध पाणी,
नाहीतर होईल आरोग्याची हानी.
पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न,
त्यास वाचविण्याचा करा प्रयत्न.
दुष्काळावर मात करू,
सुनियोजित पाणी वापरू.
पाण्याचे निष्कर्ष – सारांश
या लेखात आपण पाण्याचे विविध स्रोत आणि गुणधर्म मराठी माहिती, पाण्याचे विविध उपयोग (water information in marathi) पाहिली आहे. यामध्ये पाणी म्हणजे काय ? पाण्याचे रूपे, पाण्याचे स्रोत आणि त्यांचे गुणधर्म याबद्दल माहिती पाहिजे आहे.
पाण्याचा वापर प्रत्येक क्षणाला आणि प्रत्येक ठिकाणी होत असतो. पाण्याचा वापर घरगुती, वैयक्तिक, सार्वजनिक स्वच्छतेसाठी ते अन्न शिजवण्यासाठी, शेती आणि उद्योग वीज निर्मिती अशा प्रकारे सर्व ठिकाणी होतो.
वाढत्या गरजा आणि शहरीकरणामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासधूस होत आहे. पाण्याचे विविध स्रोत आणि गुणधर्म मराठी माहिती (water information in marathi) तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट द्वारे कळवा.
पाण्याची मराठी माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
पृथ्वीवर किती टक्के पाणी आहे ?
पृथ्वीवर 70 टक्के पाणी आहे आणि त्यापैकी 2.5 टक्के पाणी पिण्यासाठी योग्य आहे.
गोड्या पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात कुठे असतो ?
गोड्या पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात विहीर, धरण, नदी या ठिकाणी असतो.
पृथ्वीवरील पाण्याचा मुख्य स्त्रोत कोणता ?
पृथ्वीवरील पाण्याचा मुख्य स्त्रोत जमिनीतून आणि पावसातून मिळते.
पाण्याचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी ?
पाण्याचा वापर करताना काळजीपूर्वक करावा. आवश्यतेनुसार पाणी वापरावे. पाण्याचे झरे आणि स्रोत दूषित करू नये.
पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय ?
निसर्गाकडून मिळालेले पाणी स्वच्छ आणि उपयुक्त असते. या पाण्यात रासायनिक कचरा मिसळून किंवा इतर मार्गांनी ते अशुद्ध होते. याला पाण्याचे प्रदूषण म्हणतात.
जागतिक पाणी दिवस केव्हा साजरा करण्यात येतो ?
जागतिक पाणी दिवस दरवर्षी 22 मार्च या दिवशी साजरा करण्यात येतो.
एका व्यक्तीला एका दिवसात कमीत कमी किती पाणी लागते ?
एका व्यक्तीला एका दिवसात कमीत कमी तीन ते चार लिटर पाणी लागते .
मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती टक्के असते ?
मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण 60 ते 70 टक्के असते.
पाण्याची साठवण करणे का आवश्यक आहे ?
पाण्याचा वापर काटकसरीने का करावा याचे उत्तर पाणी हे नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. पृथ्वीवर पाण्याचा मोठा साठा आहे पण त्यापैकी खूप कमी साठा पिण्यायोग्य आहे. पाण्याचा गैरवापर करून आपण नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश करत आहोत. हा नाश थांबवायला हवा. नाहीतर सर्व सजीव साखळी विस्कळीत होईल. त्यामुळे पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे.
पाण्याचे रेणू सूत्र काय आहे ?
पाण्याचे रेणू सूत्र H2O आहे.
पाण्याच्या कोणत्या गुणधर्मामुळे थंड प्रदेशात हिवाळ्याच्या कालावधीत पाणी वाहून नेणारे नळ फुटतात ?
पाण्याचे घनफळ कमी झाल्यामुळे थंड प्रदेशात हिवाळ्याच्या कालावधीत पाणी वाहून नेणारे नळ फुटतात.
पाण्याचे आकारमान कोणत्या तापमानाला सर्वात कमी असते ?
पाण्याचे आकारमान 4 डिग्री सेल्सिअसच्या खाली आल्यावर सर्वात कमी असते.
विविध जल रूपांची नावे सांगा.
जल हे सामान्यतः तीन प्रकारात आढळते घन, द्रव आणि वायू .
तापलेल्या तव्यावर पाण्याचे थेंब शिंपडले तर काय होईल ?
तापलेल्या तव्यावर पाणी शिंपडले असता पाण्याची वाफ होईल.
पाण्याचे संवर्धन आणि त्याचे महत्व स्पष्ट करा.
दिवसेंदिवस शहरीकरण वाढत आहे. त्यामध्ये कारखाने आणि विविध उद्योग विकसित होत आहेत. त्यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. पाण्याची बचत केली नाही तर एकदिवस पाणी संपू शकते. प्रत्येकाला केवळ पिण्यासाठीच नव्हे तर जगण्यासाठी आवश्यक असलेले धान्य पिकविण्यासाठीही पाण्याची गरज आहे. त्यामुळे प्रत्येकाने पाण्याची बचत करणे काळाची गरज आहे.