जल प्रदूषण कारणे मराठी माहिती – water pollution causes in marathi

By | December 3, 2022

Water pollution causes in marathi – वाढत्या लोकसंख्यामुळे पाण्याचा वापर वाढत चालला आहे यामुळे पाणी प्रदूषणाचे प्रमाण सगळीकडे मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. परिणामी आपल्याला अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे.

मानवी कृत्याने पाण्याच्या मूलभूत गुणधर्मात काही बदल होऊन ते पिण्यायोग्य राहत नाही. या पाण्याचा वापर मानवी आणि इतर सजीवांच्या आरोग्यासाठी घातक ठरतो. यालाच जलप्रदूषण असे म्हणता येईल.

जल प्रदूषणाचे परिणाम सर्व निसर्गाला भोगावे लागतात. त्यामध्ये जलचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात येते. इतर प्राणी आणि पक्षी दूषित पाण्यामुळे अशक्त होतात.

यामुळे आपण पाणी का दूषित होते ? याचे कारण शोधून जल संवर्धन करणे गरजेचे आहे. यासाठीच आज आपण जल प्रदूषण कारणे मराठी माहिती – water pollution causes in marathi जाणून घेणार आहोत.

हा लेख जरूर वाचाआरोग्यासाठी पाण्याचे उपयोग मराठी माहिती – water benefits information in marathi

Table of Contents

water pollution causes in marathi – जलप्रदूषणाची कारणे मराठी माहिती

water pollution causes in marathi
जल प्रदूषण कारणे मराठी माहिती

दैनंदिन वापरातून पाण्याचे प्रदूषण – दैनंदिन स्वच्छतेसाठी पाण्याचा वापर होतो. कपडे धुणे, भांडी घासणे या मध्ये असणारे साबण किंवा रासायनिक द्रव्ये यांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असतो. हे प्रदूषित पाणी ड्रेनेजमार्फत नदीत मिळते.

ड्रेनेजची सोय नसलेल्या ठिकाणी सांडपाणी तेथील जमिनीत मुरते आणि भूगर्भातील पाण्याचा साठयात मिसळते. यामुळे तलाव आणि विहिरी यांचे पाणी प्रदूषित होते.

औद्योगिक क्षेत्रातून होणारे पाणी प्रदूषण – औद्योगिक क्षेत्रात विविध उत्पादने तयार करण्यासाठी पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. यामध्ये वापरलेले पाणी आणि विविध रसायने कारखान्यातून बाहेर पडतात.

जल प्रदूषण चित्र
जल प्रदूषण चित्र

हे पाणी टाकाऊ पदार्थ मिसळलेले पाणी असते. त्यामुळे ते दूषित झालेले असते. हेच पाणी पुढे नदी,नाले किंवा तलाव यांच्यात मिसळले गेले की पाण्याचे स्रोत प्रदूषित होतात.

कीटकनाशके आणि खत यापासून होणारे प्रदूषण – उत्पादन वाढवण्यासाठी शेतीमध्ये अनेक रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. तसेच पिकांना कीड लागू नये यासाठी अनेक जंतुनाशके फवारली जातात.

ही जंतुनाशके द्रव्य स्वरूपात असतात. त्यामुळे त्याचे काही अंश वनस्पती शोषून घेतात तर उरलेले हवेत जाऊन मिसळतात. अशी विषारी द्रव्यांमुळे हवा, पाणी, जमीन प्रदूषण होते.

वातावरणातील प्रदूषकांमुळे पाण्याचे प्रदूषण – औद्योगिक कारणामुळे निर्माण झालेले प्रदूषक वातावरणात मिसळतात. पावसाबरोबर ते खाली येतात आणि पिके व जंगल यांना पोहोचवतात.

हेच पाणी पुढे नदी-नाल्यांना मिळते त्यामुळे त्यांचे पाणी प्रदूषित होते.

औष्णिक जलामुळे प्रदूषण – मोठ्या कारखान्यांमध्ये मशीन जास्त गरम होऊ नयेत म्हणून त्यांना थंड करण्यासाठी पाण्याचा सतत वापर करावा लागत असतो.

हेच पाणी नदी मिसळते आणि त्या पाण्यात शेवाळाची वाढ होते परिणामी त्यातले प्राणवायू कमी होऊन ते पाणी प्रदूषित होते.

खनिज तेलामुळे पाण्याचे प्रदूषण – समुद्र मार्गाने जहाजाच्या माध्यमातून तेलाची वाहतूक केली जाते. त्याचं तेलाची गळती होते तसेच जहाजाचा काही अपघात झाला तर तेल समुद्रात मिसळते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जलचरांच्या हानी होते.

अशाप्रकारे समुद्रकिनारे आणि समुद्रातील पाण्याची प्रदूषण होते.

मृत पावलेले प्राणी, उत्सवात वापरलेल्या मूर्ती आणि प्लास्टिक कचरा पाण्याच्या स्रोतांमध्ये टाकल्या जातात त्या कारणाने पाणी प्रदूषण होते.

हा लेख जरूर वाचा >> पर्यावरणाचे महत्व माहिती मराठी – paryavaran in marathi

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण जल प्रदूषण कारणे मराठी माहिती – water pollution causes in marathi जाणून घेतली.

त्याचबरोबर या लेखात आपण पाणी प्रदूषित का होते ? याविषयी माहिती जाणून घेतली आहे. जलप्रदूषणाची कारणे मराठी माहिती – water pollution causes in marathi तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

पाणी प्रदूषित होण्याची कारणे व त्यावरील उपाय सांगा.

वर लेखात पाहिल्याप्रमाणे दैनिक वापरातून, औद्योगिकीकरणामुळे, खताची फवारणी करताना, खजिन तेलापासून, वातावरणातील प्रदुषकांमुळे, औष्णिक जलामुळे पाण्याचे प्रदूषण होते. पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी पाण्याचा वापर झाल्यानंतर त्याची योग्य विल्हेवाट लावली, जेणेकरून पाणी प्रदूषण कमी प्रमाणात होईल.

पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय ?

जलप्रदूषण ही एक मानव निर्मित समस्या आहे. … जल प्रदूषणामुळे पाण्यात विशिष्ट गुणधर्मांचे पदार्थ अशा प्रमाणात मिसळले जातात की, त्यामुळे पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेत बदल होऊन ते वापरण्यास अयोग्य ठरते.

जल प्रदूषण नियंत्रण कायदा कधी लागू करण्यात आला ?

जल प्रदूषण नियंत्रण कायदा 1.06.1981 या दिवसापासून लागू करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *