web hosting marathi – आपण इंटरनेटच्या मदतीने विविध माहितीची देवाणघेवाण करतो. ही माहिती साठवून ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या जागेला वेब होस्टिंग असे म्हणतात. वेब होस्टिंगवर छायाचित्र, व्हिडिओ आणि मजकुराच्या स्वरूपात माहिती साठवली जाते.
या लेखातून आपण वेब होस्टिंग (web hosting marathi) विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. यात आपण वेब होस्टिंग प्रकार आणि कार्य समजून घेऊ.
वेब होस्टिंग म्हणजे काय (web hosting meaning in marathi)

विषय | वेब होस्टिंग |
प्रकार | इंटरनेट होस्टिंग सर्व्हिस |
वापर | वेबसाइट होस्ट करण्यासाठी |
मोबाईल फोनमध्ये किंवा संगणकात फाईल्स सेव्ह करण्यासाठी जी जागा असते, तिला हार्ड डिस्क मेमरी (hard disk memory) असे म्हणतात. याचप्रमाणे इंटरनेटवर फाईल्स किंवा माहिती साठवण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या सेवेला होस्टिंग असे म्हणतात.
Types of hosting services marathi – होस्टिंगचे विविध प्रकार आहेत, जसे की ईमेल होस्टिंग, फाईल्स होस्टिंग, डीएनएस होस्टिंग, गेम सर्वर्स इत्यादी. यातीलच एक प्रकार म्हणजे वेब होस्टिंग.
वेब होस्टिंग ही एक इंटरनेट सेवा आहे, याद्वारे इंटरनेटवर वेबसाइट सामग्री सुरक्षितेने साठवली जाते. यात फोटो, व्हिडिओ आणि मजकुराचा समावेश होतो.
पर्सनल, व्यवसाय आणि कंपनी, शाळा आणि महाविद्यालय अश्या विविध प्रकारच्या वेबसाइट तयार करताना वेब होस्टिंगची आवश्यकता असते.
वेब होस्टिंगचे प्रकार माहिती (web hosting types in marathi)
Types | प्रकार |
---|---|
Shared Web Hosting | सामायिक वेब होस्टिंग |
Virtual Dedicated Server | व्हर्च्युअल प्रायव्हेट सर्व्हर |
Dedicated Hosting | समर्पित होस्टिंग |
Cloud Hosting | क्लाउड होस्टिंग |
1. सामायिक वेब होस्टिंग (Shared Web Hosting) – या प्रकारात अनेक वेबसाईट एकाच सर्व्हरवर होस्ट केलेल्या असतात. यामुळे Storage, RAM आणि CPU हे सर्व्हरवर होस्ट केलेल्या सर्व वेबसाइट्सला सामाईकरित्या वापरावे लागतात. यामुळे या होस्टिंगची किंमत इतर होस्टिंग प्रकारापासून कमी असते.
2. व्हर्च्युअल प्रायव्हेट सर्व्हर (Virtual Dedicated Server) – मोठ्या रहदारी असणाऱ्या वेबसाईट आणि कंपन्या VPS चा वापर करतात. यामध्ये एका सर्व्हरवर एकच वेबसाइट होस्टिंग केलेली असते. यामुळे या होस्टिंगचा खर्च अधिक असतो.
3. समर्पित होस्टिंग (Dedicated Hosting) – यामध्ये पूर्ण सर्व्हरचे नियंत्रण वापर कर्त्याला दिला जातो. वापरकर्ता सर्व्हर सेटिंग आणि ऑपरेटिंग सिस्टिममध्ये बदल करू शकतो. सर्व्हरचे पूर्ण नियंत्रण वापरकर्त्याकडे असल्याने खूप फायदे होतात. पण Dedicated Hosting ची किंमत Shared आणि VPS Hosting पेक्षा खूप जास्त असते.
4. क्लाउड होस्टिंग (Cloud Hosting) – साधारणपणे मोठमोठ्या संस्था आणि कंपन्या, मीडिया तसेच सरकारी वेबसाईट या होस्टिंगचा वापर करतात. यात एक तोटा आहे की वापरकर्ता सर्व्हर सेटिंगमध्ये काहीही बदल करू शकत नाहीत. या क्लाउड होस्टिंगची किंमत ही सर्व होस्टिंगच्या प्रकारापेक्षा अधिक असते.
सामायिक, व्हर्च्युअल प्रायव्हेट सर्व्हर, समर्पित आणि क्लाउड होस्टिंग हे वेब होस्टिंगचे प्रमुख प्रकार असून पुनर्विक्रेता, व्यवस्थापित, कोलोकेशन होस्टिंग सेवा, क्लस्टर होस्टिंग आणि होम सर्व्हर हे होस्टिंगचे इतर प्रकार आहेत.
वेब होस्टिंग कसे कार्य करते (how web hosting works marathi mahiti)
वेब होस्टिंगचा वापर करण्यासाठी संगणकावर एक विशिष्ट सर्व्हर ऑपरेटिंग सिस्टिम इंस्टॉल करावी लागते. उदा. लिनक्स आणि विंडोज सर्व्हर
या सर्व्हरवर वेबसाइटवर होस्ट करण्यासाठी डोमेन नेम खरेदी करावे लागते. या डोमेन नेमवर वेब होस्टिंगचे Nameservers किंवा आयपी पत्ता प्रविष्ट करावा लागते.
यानंतर डोमेन नेम वेब होस्टिंग सर्व्हरशी जोडले जाते. यात वेबसाईटच्या नावाने एक फोल्डर तयार होतो, या फोल्डरमध्ये वेबसाईटवरील माहिती जतन केली जाते.
एखाद्या युजरने ब्राऊझर किंवा सर्च इंजिनमध्ये वेबसाईटचे नाव टाइप केल्यावर वेब होस्टिंगमधील माहिती युजरच्या स्क्रीनवर दिसू लागते.
सारांश
या लेखातून आपण वेब होस्टिंग (web hosting marathi) विषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
भारतातील सर्वोत्तम वेब होस्टिंग कंपन्या कोणत्या आहेत (Best web hosting in india)
1. GoDaddy
2. MilesWeb
3. Hostinger
4. Bluehost
5. Dreamhost
6. Site ground
7. A2 hosting
8. Host gator
9. InMotion
10. GoViralHost
वेबसाईटसाठी कोणती होस्टिंग निवडावी ?
होस्टिंग निवडताना वेबसाईटचा प्रकार, संभाव्य ट्रॅफिक, आणि आकार अवलंबून असतो. जर तुम्ही एखादी संस्था किंवा व्यवसायाची वेबसाईट तयार करत असाल, तर VPS किंवा क्लाउड होस्टिंग लागेल. पण जर तुम्ही ब्लॉगिंग किंवा पोर्टफोलिओ वेबसाईट बनवत असाल तर सुरुवातीला सामायिक वेब होस्टिंग वापरावी. पुढे ट्रॅफिक वाढल्यावर क्लाउड होस्टिंग किंवा VPS Server देखील घेऊ शकता.