शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! | Teachers Day 2022 wishes in Marathi 

 सूर्य किरण जर उगवले नसते,तर आकाशाचा रंगच समजला नसता,जर महात्मा जोतिबा फुले जन्मले नसते,तर खरचं स्त्री शिक्षणाचे महत्व समजले नसते…शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

गुरुविण न मिळे ज्ञान,ज्ञानाविण जगी न होई सन्मान,जीवन भवसागर तराया,चला वंदूया गुरुराया,शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

अपूर्णाला पूर्ण करणारा,शब्दांनी ज्ञान वाढविणारा,जगण्यातून जीवन घडविणारा,तत्त्वातून मूल्ये फुलविणा-या,ज्ञानरुपी गुरुंना..शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडू ची अक्षरे उमटवत,हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या शिक्षकांना.. शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 

2G, 3G, 4G,5G, 6G पण येईलपण आम्हाला घडविण्यासाठीगुरुG,शिवाय पर्याय नाही..शिक्षक दिनाच्या शुभेच्छा..!

शिक्षक हे मेणबत्तीप्रमाणे असतात,जे स्वतः जळून,विद्यार्थ्यांचं आयुष्य प्रकाशमान करतात..मला भेटलेल्या प्रत्येक शिक्षकाला, शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

घरी म्हणायचे,“शाळेत हेच शिकवतात का?”आणि शाळेत म्हणायचे,“घरच्यांनी हेच शिकवलं का?”तरीपण शिक्षक दिनाच्या शुभेच्छा..!

एक पुस्तक,एक पेन,एक विद्यार्थी,आणि एक शिक्षक,हे संपूर्ण जग बदलू शकतात..