ख्रिसमस नाताळ हा एक ख्रिस्ती सण आहे. संपूर्ण जगात 25 डिसेंबरला अगदी मोठ्या जल्लोषात नाताळ साजरा केला जातो.

येशू ख्रिस्ताला परमेश्वराचा पुत्र आणि जगाचा तारणारा म्हणून ओळखले जाते.

नाताळ हा सण सर्वाना एकत्र आणण्याचा सण आहे.

प्रत्येक ख्रिस्ती आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या जन्मदिनी आपले घर सजावट करतो.

त्यानंतर सर्व ख्रिस्ती लोक एका ठिकाणी जमून आपल्या प्रिय प्रभु येशू ख्रिस्त यांची आराधना करतात.

महाराष्ट्रातील ख्रिस्ती धर्म लोक दिवाळीप्रमाणे या दिवशी करंज्या आणि इतर गोड खाद्यपदार्थांचे एकमेकांस वाटून हा सण साजरा करतात. तर काही जण सांताक्लॉजचा वेष धारण करून लहान मुलांना भेटवस्तू देतात.

सांता क्लॉज एक ख्रिस्ती सेवक आहे. जो गरिबांना नेहमी भेटवस्तू वाटायचा. त्याचे मूळ नाव सेंट निकोलस असे आहे.

ख्रिस्ती धर्मातील पवित्रा ग्रंथ बायबल आहे. हा ग्रंथ दोन भागात विभागला आहे. पहिल्या भागात जुना करार आणि दुसऱ्या भागास नवीन करार असे म्हणतात.

बायबल ग्रंथ ख्रिस्ती धर्माची श्रद्धेची आणि जीवनाची प्रेरणा देणारा, धर्माची मूलभूत तत्त्वे आणि ईश्वरी तारणाचा इतिहास समजून देणारा ग्रंथ आहे.

ख्रिसमस नाताळ माहिती मराठी जाणुन घेण्यासाठी येथे क्लिक करा.