पपनस मराठी माहिती
पपनस लिंबू वर्गीय वनस्पती असून ही वनस्पती औषधी गुणधर्माची आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यातील कोकण किनारपट्टीवर साधारणपणे ही वनस्पती जास्त प्रमाणत आढळते.
पपनसाचे झाड साधारणपणें 5 ते 10 मीटर इतके उंच असते. याच्या पानांचा रंग गडद हिरवा असतो.
या झाडाला पांढऱ्या रंगाची फुले असतात. पपनसच्या फळाचा आकार हा मोठ्या चेंडूइतका असतो आणि साल हिरव्या रंगाची असते.
पपनसाचे फळ कच्चे असल्यास गराची चव कडू लागते. फळ पिकल्यावर थोडासा कडवटपणा कमी होत जातो.
भारतातील महाराष्ट्र राज्यात याची झाडे जास्त प्रमाणात आढळून येतात.
पपनसमध्ये भरपूर पोषक घटक आहेत. यामध्ये कॅलरीज कमी प्रमाणत असून अँटीऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असतात, यामुळे आपले वजन प्रमाणत ठेवण्यास मदत होते.
द्राक्षाचे नियमित सेवन केल्याने आपले हृदय निरोगी राहते. संशोधनानुसार, असे सिद्ध झाले आहे की याचे नियमित सेवनाने हृदयरोगाचा धोका खूप कमी होतो.
पपनसच्या फळात अँटी ऑक्सिडंट्स् जास्त प्रमाणत असते. यामुळे आपले जुने रोग उद्भवत नाहीत.
पपनस विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.