महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची नावे

महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1 मे 1960 रोजी झाली. त्यावेळी महाराष्ट्र मध्ये 26 जिल्हे होते त्यानंतर नवीन जिल्ह्याची निर्मिती होऊन आता महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या 36 झाली आहे.

महाराष्ट्र राज्याची विभागणी एकूण पाच प्रादेशिक विभागात केली आहे.विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र. 

विदर्भ (अमरावती विभाग) : अमरावती विभागाचे मुख्यालय हे अमरावती शहर असून सर्वात मोठे शहर आहे. या विभागात अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांचा समावेश होतो.

विदर्भ (नागपूर विभाग) : नागपूर विभागाचे मुख्यालय नागपूर शहर असून या जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर देखील आहे. या विभागात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश होतो.

मराठवाडा : विभागाचे मुख्यालय औरंगाबाद शहर असून या विभागात सर्वात मोठे शहर औरंगाबाद आहे. या विभागात औरंगाबाद, बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांचा समावेश होतो. 

खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र : खानदेश विभागाचे प्रमुख मुख्यालय नाशिक शहर आहे. खानदेश या विभागात अहमदनगर, जळगाव, नंदुरबार, नाशिक आणि धुळे या जिल्ह्यांचा समावेश होतो. 

कोकण : कोकण विभागाचे मुख्यालय मुंबई शहर आहे. कोकण विभागात प्रामुख्याने मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश होतो. 

पश्चिम महाराष्ट्र : पश्चिम महाराष्ट्र म्हणून पुणे विभागाला ओळखले जाते. या विभागाचे मुख्यालय पुणे जिल्हा आहे. या विभागात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. 

महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची नावे अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.