मोहरीपासून तेलाची निर्मिती केली जाते. उत्तर भारतात याच्या तेलाचा वापर स्वयंपाक करताना होतो.

मोहरीचे उत्पादन भारतात सर्वत्र घेतले जाते. भारत देशासह चीन, पाकिस्तान, जपान, पोलंड, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स या देशामध्ये मोहरीचे उत्पादन घेतले जाते.

महाराष्ट्रात भुरकट, आकाराने लहान असणारी मोहरी असते. पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यांत तांबूस, काळपट आणि आकाराने मोठी असणारी मोहरी पिकवली जाते.

मोहरी प्रत्येकाच्या घराघरात स्वयंपाकात फोडणीसाठी वापरला जाणारा हा एक प्रकारचा मसाला आहे.

मोहरीमध्ये ग्लुकोज, ओमेगा -3 फॅटी एसिड आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणत असते. याशिवाय तांबे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि सेलेनियमचे प्रमाण मोहरीमध्ये मुबलक प्रमाणात आहेत.

मोहरी बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.