देवमासा आश्चर्यकारक रोचक तथ्य व माहिती मराठी

Whale fish information in marathi – देवमासा ज्याला आपण माशाच्या प्रजातीमधील मोठ्या आकाराची एक जात असल्याचे म्हणतो, पण देवमासा हा माशाचा प्रकार नसून तो एक सस्तन प्राणी आहे. या प्राण्याची प्रजात जगभर पाहायला मिळते.

निसर्गाने निर्माण केलेल्या अद्भुत सजीव सृष्टीतील देवमासा हे एक आश्चर्यच आहे. या प्राण्याचा आकार, ताकत आणि दहशत आपण सिनेमात पहिलीच असेल.

या लेखातून आपण देवमासा आश्चर्यकारक रोचक तथ्य व माहिती (Whale fish mahiti marathi) जाणून घेणार आहोत.

देवमासा प्राण्याची माहिती मराठी (Devmasa Fish Information In Marathi)

Whale fish information in marathi
नावदेवमासा
इतर नावेव्हेल मासा
वर्गतिमी (Cetacea)
प्रकारजलचर सस्तन प्राणी
प्रजाती37
आढळजगभर (समुद्रात)

जगातील सर्वात महाकाय मासा म्हणजे देवमासा ज्याची लांबी साधारणपणे 1.25 पासून 30 मीटर तर वजन 23 kg पासून 200 टन इतके आहे. याच्या शरीराचा सांगाडा हाडापासून बनलेला असतो.

देवमासे अत्यंत तीव्र स्वरूपाचा ध्वनीची निर्मिती करतात. या ध्वनिकंपनांची तीव्रता एखाद्या जेट इंजिनातून निर्माण होणाऱ्या कंपनांपेक्षाही जास्त असते. हा आवाज जास्तीत जास्त 500 किलोमीटर अंतरावर देखील ऐकला जाऊ शकतो.

व्हेल हा सस्तन प्राणी असून तो माणसाप्रमाणे थेट पिल्लांना जन्म देतो. जन्मलेल्या पिलांना दूध पाजतो, त्यांचं संगोपन करतो. आपल्या आईप्रमाणे व्हेलची आई तिच्या पिल्लांची खूप काळजी घेते.

व्हेल मासा शिकारी प्रवृत्तीची नसून, तो शिकारीचा कसलाही पाठलाग करत नाही. देवमाशांना 2 ते 260 दात असतात, यांची रचना साधे असते.

व्हेल मासा नॉटिलस, स्क्विड, ऑक्टोपस व मासे यांच्यावर उपजीविका करतात. या प्राण्याचे आवडीचे अन्न म्हणजे स्क्विड.

स्क्विड हा एक माशाचा प्रकार आहे. या माश्याचे डोळे 10 इंच असतात. ज्यामुळे हे मासे समुद्रात खोलवर पाहू शकतात तसेच हे मासे अंधारात देखील पाहू शकतात.

स्क्विड मासे मोठ्या माश्याला गळ लावण्यासाठी वापरतात. याच प्रकारचे मासे व्हेल माश्याचे मुख्य खाद्य असते.

देवमासे खुल्या महासागरात आणि समुद्रात राहत असतात. काही व्हेल किनाऱ्यालगत, तर काही गोड्या पाण्यात राहतात. व्हेल आराम करतात, झोपतात.

देवमाशांची त्वचा जाड, गुळगुळीत व केशरहित असते. त्यांना स्वेद ग्रंथी, स्नेह ग्रंथी व बाह्यकर्ण किंवा कानांचे स्नायू नसतात. कल्ले व खवले नसतात.

यांची फुफ्फुसे फार मोठी असतात. यामुळे फुफ्फुसांत फार मोठ्या प्रमाणावर हवा भरणे शक्य होते. परिणामी हे प्राणी पाण्याच्या आत एक तासापेक्षाही जास्त वेळ राहू शकतात.

तसेच त्यांचे श्रवणेंद्रिये व स्पर्शेंद्रिये खूप तीक्ष्ण असतात. देवमासे पाण्यात पोहत असताना अनेक आवाज काढू शकतात. वैज्ञानिकांच्या मते, हा आवाज काढून ते एकमेकांशी बोलत असतात.

व्हेल खाण्याच्या एका ठिकाणावरून कित्येक हजार किलोमीटर अंतरावरच्या दुसऱ्या ठिकाणी समागमसाठी आणि बाळंतपणासाठी स्थलांतर करतांना दिसतात.

देवमाशांचा गर्भाचा काळ 11 ते 16 महिने इतका असतो. मादीला दर वेळेस एकच पिल्लू होते. हे पिल्लू साधारण त्याच्या आईच्या शरीराच्या एकचतुर्थांश ते एकतृतीयांश लांब असते.

देवमाशांच्या पिल्लांची वाढ फार झपाट्याने होत असते. कारण त्यांच्या आईच्या दुधात कॅल्शियमाचे आणि फॉस्फरसाचे प्रमाण खूप असते.

देवमासा माहिती मराठी (Whale fish information in marathi)

devmasa fish information in marathi

देवमाशांच्या एकूण 37 जाती आहेत. या जातीमधील ब्ल्यू व्हेल मासा पृथ्वीवरील जिवंत प्राण्यांमध्ये सर्वांत मोठा प्राणी आहे. ज्याची लांबी 30.5 मी असून माद्या नरांपेक्षा थोड्या जास्त लांब असतात.

शरीर निळसर व करड्या रंगाचे असल्याने या प्राण्यांना ब्ल्यू व्हेल असे म्हणतात. ज्याचे शास्त्रीय नाव बॅलिनॉप्टेरा मस्क्युलस असे आहे. ही प्रजात सर्व महासागरांत आढळते. हा देवमासा अतिशय मौल्यवान समजला जातो.

निळा देवमासा दक्षिण ध्रुवीय सागरात व उत्तर पॅसिफिक महासागरात मोठ्या प्रमाणावर आढळतो.

फिनबॅक व्हेल हा देवमासा सर्व महासागरांत आढळतो. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे उन्हाळ्यात हा थंड समुद्रात आणि हिवाळ्यात उष्ण समुद्रात जातो.

फिनबॅक व्हेल याची लांबी सरासरी 18 ते 21 मी लांब असून तो निळ्या देवमाशापेक्षा हा लहान व सडपातळ असतो. हा देवमासा कोळंब्यांवर उदरनिर्वाह करतो, त्यासोबतच तो लहान मासेही खातो.

से व्हेल हा जपान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यालगतच्या समुद्रात आढळणारा देवमासा आहे. याची लांबी 12 ते 14 मी लांब असते. सर्व देवमाशांत याचे मांस अतिशय रुचकर असते, यामुळे जपानी लोक याची शिकार करतात.

हंपबॅक व्हेल हा समुद्रकिनाऱ्याजवळ राहणारा देवमासा आहे. याच्या पाठीवर लहान कुबड असून लांबी 12 ते 17 मी इतकी असते.

या व्हेलपासून पुष्कळ तेल मिळते यामुळे हे मत्स्योद्योगाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा ठरतो. हा देवमासा 150 मी खोल समुद्रात सुरकांडी करू शकतो.

ग्रे व्हेल हा देखील समुद्रकिनाऱ्यालगत राहणारा देवमासा आहे. यांची जास्तीत जास्त लांबी 13.5 मी असते. रंग गडद करडा असून त्यावर फिक्कट करड्या रंगाचे लहान डाग असतात.

राइट व्हेल हा समशीतोष्ण समुद्रात आढळतो. यांचा जबडा आणि ओठ विचित्र असतात.

स्पर्म व्हेल, किलर व्हेल, बीक्‌ड व्हेल, पायलट व्हेल हे दात असलेले देवमासे आहेत. या प्रकारात नर साधारणपणे माद्यांपेक्षा मोठे असतात.

स्पर्म व्हेल हा देवमासा सगळीकडे आढळतो. हा आक्रमक वृत्तीचा असून कळपात राहणे पसंत करतो. यांच्या एका कळपात एक नर आणि कित्येक माद्या असतात.

किलर व्हेल हा थंड पाण्यात आढळणारा लहान देवमासा आहे. हा अगदी नावाप्रमाणे आहे. तो अतिशय लुटारू वृत्तीचे असून कोणत्याही प्राण्यावर हल्ला करतो.

यांच्या प्रत्येक जबड्यात 20 ते 28 जाड व मजबूत दात असतात. यामुळे तो मासे, सील, मोठे सागरी पक्ष्यांची शिकार करतो. एवढेच नाही तर ती कधीकधी देवमासेदेखील खातो.

पॅसिफिक महासागरात आढळणारा एक देवमासा असा आहे की, ज्याला पकडून डॉल्फिनप्रमाणे निरनिराळे खेळ करायला शिकविता येते तो म्हणजे पायलट व्हेल.

देवमासा फायदे माहिती मराठी (Benefits of devmasa fish)

जलचर प्राण्यांमधील साखळी सुव्यवस्थित चालण्यासाठी देवमासे खूप उपयोगी आहेत. एक देवमासा 80 ते 90 वर्ष जगतो. जेव्हा तो मृत होतो त्यांनतर समुद्रातील अनेक जीवांचा उदरनिर्वाह चालतो.

शृंगास्थि देवमाशांचे मांस अतिशय रुचकर असते, त्यामुळे त्याचा वापर खाण्यासाठी करतात. आदिवासी जमाती हे मांस खातात. तसेच जपान, नॉर्वे आणि इंग्लंडमधील लोकही याचे मांस खातात.

व्हेलपासून तेल मिळवतात. तेल काढल्यावर देवमाशांचे मांस वाळवून त्याचे पीठ करतात. या पिठात प्रथिनांचे प्रमाण जास्त असते, म्हणून ते गुरे, कोंबड्या तसेच इतर प्राण्यांना खायला देतात.

व्हेलपासून पीठ तयार करण्याचा उद्योग फार मोठ्या प्रमाणावर चालतो.

स्पर्म देवमाशांत आतड्यापासून मिळणारा हा एक विशिष्ट करडा–पांढरा व पुष्कळ वास असणारा मेणासारखा पदार्थ असतो. याचा वापर सुगंधी द्रव्ये तयार करताना, त्यांचा वास स्थिर ठेवण्यासाठी करतात.

देवमाशांचे कातडे फार जाड आणि अतिशय सच्छिद्र असते, म्हणून ते जास्त उपयोगात येत नाही. बेलुगा या पांढऱ्या देवमाशाचे कातडे अतिशय चांगले असते. पूर्वी यापासून कंबरपट्टे व लहान गाद्यांचे अभ्रे केले जायचे.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण देवमासा माहिती मराठी (Whale fish information in marathi) जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ? हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

Related – तारापोरवाला मत्स्यालय माहिती मराठी

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

देवमासा किती काळ जगतो ?

देवमासा कमीतकमी 10 वर्ष तर जास्तीत जास्त 90 वर्ष इतका काळ जगतो.

देव माशांचे किती प्रकार अस्तित्वात आहेत ?

देव माशांचे 37 प्रकार अस्तित्वात आहेत. यापैकी काही प्रकार दुर्मिळ आहेत. उदा. बॉटलनीज व्हेल

देवमाशाचे वजन किती असते ?

एका प्रौढ देवमाशाचे वजन 150 टन इतके असते. हे वजन 40 एशियन हत्तीच्या बरोबर आहे.

जगातील सर्वात मोठा मासा कोणता आहे ?

जगातील सर्वात मोठा मासा ब्ल्यू व्हेल (निळा देवमासा) हा आहे. हा सर्व महासागरांत आढळतो. एका प्रौढ निळ्या देव माशाची लांबी 30.5 मी व वजन 200 टन इतके असते.