करार म्हणजे काय ? करारातील ठरावांचे प्रकार कोणते आहेत ?

What Is Contract law In Marathi – नमस्कार मित्रांनो, भारतीय करार कायद्याचा मुख्य आत्मा करार या शब्दाशी निगडित आहे. या कराराची व्याख्या पुढीलप्रमाणे केलेली आहे.

कायदेशीरित्या अंमलबजावणी योग्य ठरावांना करार असे म्हणतात.

– कलम 12 एच

या व्याख्येवरून कायदेशीरित्या अंमलबजावणी करणारे ठराव म्हणजे काय ? हे स्पष्ट केलेले नाही. या व्याखेचा अभिप्रेत अर्थ विधी तज्ञांच्या पुढील व्याख्यावरून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू.

तसेच या लेखातून आपण करार म्हणजे काय (What Is Contract law In Marathi) आणि त्याच्या ठरावांचे प्रकार (Types Of Resolution Of Contract In Marathi) कोणते आहेत, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

करार म्हणजे काय (What Is Contract law In Marathi)

What Is Contract law In Marathi

करार म्हणजे कायदेशीररित्या अंमलबजावणी करणारे दोन व्यक्तींमधील असे ठराव की, ज्यामधून एक किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना कायदेशीर अधिकार प्राप्त होतात, तर काहींना काही कायदेशीर जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.

– सर विल्यम्स अन्सन

ज्या ठरावांची कायदेशीर अंमलबजावणी करता येऊ शकते, त्या ठरावांना करार असे म्हणतात.

– सर फ्रेडिक पोलॉक

ज्या ठरावातून दोन किंवा अनेक व्यक्तींमध्ये कायदेशीर जबाबदाऱ्या निश्चित केल्या जातात त्या ठरावांना करार असे म्हणतात.

– सोलमंड

गणिती भाषेत सांगायचे झाल्यास ठराव + कायदेशीर तत्वे = करार

भारतीय करार कायद्यानुसार, प्रतिफळाची जोड असलेल्या वचनाला किंवा वचनांच्या समूहाला ठराव असे म्हणतात.

भारतीय करार कायद्याच्या कलम 10 नुसार काही कायदेशीर तत्व दिले आहेत, या तत्त्वांचा विचार करून न्यायनिवाडा केला जातो.

 1. कायदेशीर प्रस्ताव व स्वीकृती
 2. कायदेशीर संबंध
 3. व्यक्तिगत पात्रता
 4. मुक्त संमती
 5. प्रतिफल किंवा मोबदला
 6. व्यर्थ नसलेले ठराव
 7. कायदेशीर शिष्टाचार
 8. सामाजिक मान्यता
 9. ठराव पूर्तता होण्याची शक्यता
 10. किमान दोन व्यक्ती
 11. काही करारांचे लेखी दस्तऐवज
 12. काही करारांचे नोंदणीकरण
 13. कायद्याची मान्यता

वरील सर्वच तत्वे प्रत्येक करारात असलीच पाहिजे असे नाही. पण करार पूर्ततेच्या दृष्टीने त्यातील बहुतेक तत्वांचे अस्तित्व आवश्यक असते. एकाअर्थी कराराचा पाया म्हणजे ठराव असे म्हणता येईल. ठरावाच्या पायावरच कराराची इमारत उभी असते. ठरावाची पुढीलप्रमाणे उपप्रकार पडतात.

संबंधित लेखव्यापारी हुंडी आणि सोय हुंडी यांच्यातील फरक

करारातील ठरावांचे प्रकार कोणते आहेत (Types Of Resolution Of Contract In Marathi)

1. कायदेशीर ठराव (legal agreement) – ज्या ठरावांची अंमलबजावणी बंधनकारक असून ती न्यायालयामार्फत केले जाऊ शकते, त्या ठरावांना कायदेशीर ठराव असे म्हणतात.

2. व्यर्थ ठराव (void agreement) – ज्या ठरावांची अंमलबजावणी कायदेशीररित्या करता येत नाही, त्या ठरावांना व्यर्थ ठराव असे म्हणतात.

3. वर्ज्यनीय ठराव – ज्या ठरावांची अंमलबजावणी कारदेशीररित्या करायची किंवा नाही ? हे ठरावात भाग घेणाऱ्या एकाच व्यक्तीने ठरवायचे असते, आणि दुसऱ्या व्यक्तीने ठरवायचे नसते, अशा ठरावांना वर्ज्यनीय ठराव असे म्हणतात.

4. बेकायदेशीर ठराव (illegal agreement) – ज्या ठरावांना प्रस्थापित कायद्याची मान्यता नसते, तसेच ठरावात कायद्याने विरोध स्पष्ट केलेला असतो, व अंमलबजावणीविरुद्ध दंडात्मक तरतुदी केलेल्या असतात, अशा ठरावांना बेकायदेशीर ठराव असे म्हणतात.

5. अंमलबजावणी अयोग्य ठराव (unenforceable agreement) – ज्या ठरावाची अंमलबजावणी काही तांत्रिक त्रुटीमुळे होऊ शकत नाही, त्या ठरावांना अंमलबजावणी अयोग्य ठराव असे म्हणतात. अर्थातच अशा त्रुटी कमी झाल्यास ठराव कायदेशीर होतात.

वरील पाच प्रकारांपैकी पहिला ठराव परिपूर्ण आहे तर शेवटचा अवैध आहे. बाकीचे तीन ठराव या दोन टोकांमधील असून ते धड कायदेशीर आहे नाहीत आणि बेकायदेशीरही नाहीत.

संबंधित लेखकार्यालयाची रचना आणि कार्यपद्धती माहिती

सारांश

तर मित्रांनो, मी आशा करतो की, या लेखातून तुम्हाला करार म्हणजे काय (What Is Contract law In Marathi) आणि त्याच्या ठरावांचे प्रकार (Types Of Resolution Of Contract In Marathi) कोणते आहेत, याविषयी सविस्तर माहिती मिळाली असेल.

Leave a Comment