Derivatives in stock market marathi – डेरिव्हेटिव्ह म्हणजे अंतर्निहित मालमत्ता होय. डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये शेअर्सची किंमत मूळ मालमत्तेवर अवलंबून असते. जर मूळ मालमत्तेची किंमत कमी झाली तर डेरिव्हेटिव्ह्जची किंमत कमी होते. याउलट जर मूळ मालमत्तेची किंमत वाढली तर डेरिव्हेटिव्ह्जची किंमत वाढते. डेरिव्हेटिव्ह्ज यामध्ये स्टॉक, कमोडिटी, इंडेक्स, चलन अशा बाबींचा समावेश होतो.
या लेखातून आपण डेरिव्हेटिव्ह्ज मार्केट माहिती मराठी – अर्थ, प्रकार (what is derivatives market in marathi) याविषयी सविस्तर माहिती मराठी जाणून घेणार आहोत.
डेरिव्हेटिव्ह्ज मार्केट अर्थ काय आहे (what is derivatives market in marathi)

शेअर बाजारात कार्यरत असणारे बहुतांश ट्रेडर्स डेरिव्हेटिव्ह्ज मार्केटमध्ये ट्रेडिंग करतात. डेरिव्हेटिव्ह्ज बाजार अंतर्निहित मालमत्तेवर अवलंबून असतो. डेरिव्हेटिव्हची किंमत अंतर्निहित मालमत्तेच्या किंमतीशी थेट सहसंबंधित किंवा उलट परस्परसंबंधित असते.
Derivatives market meaning in marathi – डेरिव्हेटिव्ह्ज मार्केट म्हणजे शेअर्स, इंडेक्स, कमोडिटी, चलन यांच्यावर आधारित केली जाणारी ट्रेडिंग होय. यामध्ये स्टॉक, कमोडिटी, इंडेक्स, चलन यांचा समावेश होतो. भारतात सर्वात जास्त निफ्टी 50 आणि निफ्टी बँकमध्ये डेरिव्हेटिव्ह्ज ट्रेडिंग केली जाते.
डेरिव्हेटिव्ह्ज मार्केट प्रकार माहिती मराठी (derivatives type in marathi)
डेरिव्हेटिव्ह्ज मार्केटचे मुख्य चार प्रकार पडतात. ते पुढीलप्रमाणे आहेत.
- फॉरवर्ड काँट्रॅक्ट ट्रेडिंग (forward derivatives trading)
- फ्युचर ट्रेडिंग (futures trading)
- ऑप्शन ट्रेडिंग (option trading)
- स्वॅप डेरिव्हेटिव्ह्ज (swap derivatives trading)
#फ्यूचर्स आणि फॉरवर्ड काँट्रॅक्ट (futures and forwards derivatives in marathi)
वैशिष्ट्ये | फ्यूचर्स काँट्रॅक्ट | फॉरवर्ड्स काँट्रॅक्ट |
---|---|---|
अर्थ | फ्यूचर्स काँट्रॅक्ट हा एक मानकीकृत करार आहे, जो विशिष्ट किंमतीमध्ये भविष्यातील विशिष्ट तारखेला विक्री करण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी एक्सचेंजवर ट्रेड केलेला आहे. | फॉरवर्ड करार हा दोन पक्षांदरम्यान भविष्यातील सहमत दराने विनिर्दिष्ट तारखेला अंतर्निहित मालमत्ता खरेदी किंवा विक्री करण्यासाठी करार आहे. |
करार | प्रमाणित करार | कस्टमाईज्ड करार |
जोखीम पातळी | कमी | जास्त |
शेअर्स संख्या | प्रमाणित/निश्चित | कराराच्या मुदतीवर कस्टमाईज्ड/अवलंबून |
सेटलमेंट | दैनंदिन आधारावर | मॅच्युरिटी तारखेला |
#ऑप्शन ट्रेडिंग मराठी माहिती (options trading in marathi)
ऑप्शन ट्रेडिंग हे फ्यूचर ट्रेडिंगसारखे महिन्याभरासाठी किंवा आठवड्याभरासाठी खरेदी किंवा विक्री करण्यासाठी करार असतो. यात आपण एक महिना किंवा आठवड्याचे कॉन्ट्रॅक्ट खरेदी करू शकतो व विकू शकतो. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये दोन प्रकार पडतात, पहिला प्रकार म्हणजे कॉल तर दुसरा प्रकार म्हणजे पूट.
- कॉल ऑप्शन्स (call option in share market) – यामध्ये डेरिव्हेटिव्ह्जची मूळ किंमत वाढली तरच कॉल्सची किंमत वाढते. यामध्ये Intraday व carry forward अश्या दोन्ही प्रकारे ट्रेडिंग करता येते.
- पुट ऑप्शन्स (put option in share market) – यामध्ये डेरिव्हेटिव्ह्जची मूळ किंमत कमी झाली तरच पुटची किंमत वाढते. यामध्ये Intraday व carry forward अश्या दोन्ही प्रकारे ट्रेडिंग करता येते.
#स्वॅप ट्रेडिंग मराठी माहिती (what is swap trading)
स्वॅप हा दोन पक्षांदरम्यान भविष्यात रोख प्रवाह बदलण्यासाठी केलेला व्युत्पन्न करार आहे. इंटरेस्ट रेट स्वॅप आणि करन्सी स्वॅप हे सर्वात लोकप्रिय स्वॅप करार आहेत, जे फायनान्शियल संस्थांमधील काउंटरवर ट्रेड केले जातात. भारतीय स्टॉक मार्केटमध्ये अश्या प्रकारे ट्रेड केले जात नाहीत.
सारांश
आजच्या या पोस्टमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह्ज मार्केट माहिती मराठी – अर्थ, व्याख्या, प्रकार (Derivatives in stock market marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
डेरिव्हेटिव्ह्ज मार्केटमध्ये कश्याचा समावेश होतो ?
डेरिव्हेटिव्ह्ज मार्केटमध्ये इंडेक्स, स्टॉक, कमोडिटी, चलन यांचा समावेश होतो.
भारतात सर्वात जास्त ट्रेड केले जाणारे कोणते डेरिव्हेटिव्ह्ज आहे ?
भारतात सर्वात जास्त ट्रेड केले जाणारे डेरिव्हेटिव्ह्ज निफ्टी 50 आणि बँक निफ्टी हे आहे. हे दोन्ही डेरिव्हेटिव्ह्ज राष्ट्रीय स्टॉक एक्सचेंजवर चालते.
Suggested Articles