वायदे बाजार म्हणजे काय ?

By | November 5, 2022

Futures contract in derivatives – कोणत्याही वस्तूची भविष्यातील देवाण-घेवाण करण्यासाठी करार केला जातो, हा करार ज्या ठिकाणी केला जातो त्याला वायदे बाजार असे म्हणतात. वायदे बाजारात वस्तूंची बोली अगोदरच लावून त्याची खरेदी किंवा विक्री केली जाते. शेअर बाजार, कमोडिटी बाजार व चलन बाजारात फ्युचर्स आणि ऑप्शन ट्रेडिंग प्रकार आहे.

या लेखातून आपण वायदे बाजार म्हणजे काय (Futures contract in derivatives), कार्य व महत्व याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

डेरिव्हेटिव्ह्ज मार्केट माहिती मराठी (what is derivatives market in marathi)

Futures contract in derivatives

स्टॉक, बॉण्ड, कमोडिटी, करन्सी किंवा इंडेक्समध्ये व्यापार करताना इक्विटी, फ्युचर्स अँड ऑप्शन या प्रकारात ट्रेडिंग करावी लागते. इक्विटी हे डिलिव्हरी प्रकारात येते, म्हणजे इक्विटी शेअर्स आपण आपल्याला पाहिजे तितका काळ आपल्याजवळ ठेऊ शकतो.

तर फ्युचर्स अँड ऑप्शन या प्रकारात घेतलेले शेअर काही विशिष्ट दिवसांनी एक्सपायर होतात.

कोणत्याही अंतर्निहित मालमत्तेवरून ठरवली जाते, त्यास डेरिव्हेटिव्ह्ज असे म्हणतात. स्टॉक्स, बॉण्ड, कमोडिटी, चलन आणि इंडेक्स यांचा समावेश अंतर्निहित मालमत्तेमध्ये होतो.

वरील अंतर्निहित मालमत्तेत फ्युचर्स अँड ऑप्शन असतात. यातील ऑप्शन समजून घेण्यासाठी आधी फ्युचर समजणे गरजेचे आहे, यासाठी या लेखातून आपण फ्युचर्स म्हणजे काय हे समजून घेऊ. यासाठी आपल्याला फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय हे समजून घ्यावे लागेल.

चाणक्यने लिहिलेल्या कौटिलीय अर्थशास्त्र या पुस्तकात फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टचा उल्लेख आढळतो. यातून मंदीमध्येपण शेतकऱ्यांना मालाचा योग्य भाव मिळेल, या हेतूने शेतकऱ्यांना पिकवलेला पिकांचा मोबदला अगोदरच देण्यात यावं असे लेखकाने सुचविले होते. यालाच फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट असे म्हणतात. फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टपासूनच फ्युचर्सची निर्मिती झाली असे मानले जाते.

उदा. समजा तुम्ही टोमॅटो व्यापारी आहात. तुम्ही 20 एप्रिल रोजी आजच्या किमतीला एका शेतकऱ्याकडून तीन महिन्यानंतर म्हणजे 20 जुलै रोजी 1,000 किलो टोमॅटो खरेदी करण्याचा करार केला.

टोमॅटोची आजची किंमत 40 रुपये किंमत आहे. याच किमतीवर तुम्ही दोघांनी करार केला आहे.

या करारानुसार पुढील 3 महिन्यांनी 40 रुपये किलो यानुसार 100 किलोची टोमॅटो 40,000 रुपयांवर तुम्हाला खरेदी करावी लागतील.

जर तीन महिन्यानंतर टोमॅटोचा भाव 45 रुपये किलो झाला, तर तुम्हाला 5,000 रुपयांचा फायदा होईल. याउलट जर तीन महिन्यानंतर टोमॅटोचा भाव 30 रुपयांवर गेला, तर तुम्हाला 10,000 रुपयांचे नुकसान होऊन शेतकऱ्यास 10,000 रुपयांचा फायदा होईल.

फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टमध्ये असणारे धोके (forward contract risk marathi mahiti)

फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टमध्ये धोका होण्याची संभाव्यता जास्त असते. कारण यामध्ये खरेदी करणारा आणि विक्री करणारा या दोघांनाच कराराबद्दल माहीत असून कुणीही मध्यस्थी नसते. जर तुम्ही विकलेल्या वस्तूचा मोबदला खरेदीदाराने दिलाच नाही तर तुमचे नुकसान होऊ शकते.

फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्टमध्ये लिक्विडिटी रिस्क असू शकते. म्हणजे तुम्ही जी वस्तू विकत आहात, तिला जर ग्राहकच भेटला नाही तर तुम्हाला ती विकता येणार नाही. किंवा तुम्हाला अपेक्षित किमतीवर खरेदी करणारा खरेदीदार मिळाला नाही, तर तुमचे नुकसान होऊ शकते.

करार करताना कोणताही मध्यस्थी नसल्याने होणाऱ्या व्यवहारात धोका होऊ शकतो. अशा विविध प्रकारांनी आपली नुकसान होऊ शकते. हा धोका कमी व्हावा व अशा प्रकारचा व्यवहार करण्यासाठी फ्युचर कॉन्ट्रॅक्टचा जन्म झाला.

वायदे बाजार माहिती मराठी (futures contract features in marathi)

वायदे बाजारात होणाऱ्या प्रत्येक व्यवहारावर स्टॉक एक्सचेंज कार्य करतो. उदाहरणार्थ. नॅशनल स्टॉक एक्सचेंज याच्या निफ्टी डेरिव्हेटिव्हजमध्ये केलेल्या ट्रेडिंगचे सर्व व्यवहारांच्या नोंदी व हिशोब एन.एस.ई व सेबी पाहते. यामुळे व्यवहारात सुरक्षितता व सुलभता येते.

तुम्ही विकत असलेल्या ऑर्डर खरेदी करणाऱ्या ऑर्डरची जुळवण्याचे काम देखील स्टॉक एक्सचेंज करते. यामुळे आपल्याला हव्या त्या किमतीवर खरेदीदार मिळतो.

फ्युचर्स डेरिव्हेटिव्हजच्या किंमती अंतर्निहित मालमत्तेवरून कमी जास्त होतात. तसेच फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट मध्ये असणारे करारांना प्रमाण संख्यानसते, म्हणजे आपण हवे तेवढे शेअर्स खरेदी करू शकतो. पण फ्युचर्समध्ये शेअर्सची संख्या प्रमाणित केलेली असते. या प्रमाणित संख्येला लॉट असे म्हणतात. उदा. निफ्टीचा एक लॉट 75 शेअर्सचा असतो.

तसेच घेतलेले शेअर्स आपल्याला डिलिव्हरीमध्ये घेण्याची गरज नाही ते पूर्णपणे लिक्विडिटी (कॅश) स्वरूपात असतात. फ्युचर्समध्ये केलेल्या कराराला एक निश्चित अशी एक्सपायरी तारीख असते. या तारखेनुसार एक्सपायरीनंतर झालेल्या कराराला काहीही किंमत उरत नाही.

फ्युचर्स माहिती मराठी (Futures contract in derivatives mahiti marathi)

  1. फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट मध्ये केलेल्या कराराची किंमत फिक्स असते. यातून फायदा किंवा नुकसान होत असले तरीदेखील केलेल्या करारानुसार व्यवहार करावा लागतो.
  2. फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टमध्ये लॉटची (शेअर्स) संख्या प्रमाणित केलेली असते. यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही.
  3. फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टमध्ये एक ठराविक कालावधी असतो. या कालावधीला एक्सपायरी असे म्हणतात, एक्सपायरीच्या तारखेनंतर झालेल्या कॉन्ट्रॅक्टला महत्त्व उरत नाही.
  4. फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टमध्ये होणारे नुकसान जास्त असल्याने स्टॉक एक्सचेंजकडे मार्जिन (पैसे) अगोदरच द्यावे लागते.
  5. फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टमध्ये विक्रेत्याला शेअर्स किंमत कमी होईल असे वाटते, तर खरेदीदारास शेअर्सची किंमत भविष्यात जास्त होईल असे वाटते. या मानसिकतेवर वायदे बाजार काम करतो.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये वायदे बाजार माहिती मराठी (Futures contract in derivatives mahiti marathi) जाणून घेतली. ही पोस्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही मराठी माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

वायदे बाजार म्हणजे काय ?

कोणत्याही वस्तूची भविष्यातील देवाण-घेवाण करण्यासाठी करार केला जातो, हा करार ज्या ठिकाणी केला जातो त्याला वायदे बाजार असे म्हणतात.

अंतर्निहित मालमत्ता म्हणजे काय ?

अंतर्निहित मालमत्ता म्हणजे असे डेरिव्हेटिव्ह्ज ज्याची किंमत स्टॉक, कमोडिटी, इंडेक्स, चलन यावर आधारलेली असते. अंतर्निहित मालमत्तेला अंडरलाइंग अँसेट देखील म्हणतात.

अंतर्निहित मालमत्तेत कोणकोणत्या गोष्टीचा समावेश होतो ?

अंतर्निहित मालमत्तेत स्टॉक, कमोडिटी, इंडेक्स, चलन किंवा इतर डेरिव्हेटिव्ह्जचा समावेश होतो.

भारतातील सर्वाधिक व्यापार केलेला फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट कोणता आहे ?

भारतातील सर्वाधिक व्यापार केलेला फ्युचर्स कॉन्ट्रॅक्ट SBI, निफ्टी 50 व बँकनिफ्टी हे आहेत.

पुढील वाचन :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *