What Is Plant Firm And Industry – मित्रांनो व्यवसाय अर्थशास्त्रात अनेक संज्ञा वापरल्या जातात. उदाहरणार्थ संयंत्र, व्यवसाय संस्था, उद्योग बाजार आणि साठा इत्यादी. यातील बऱ्याच संकल्पना आपण रोजच्या व्यवहारात वापरतो, परंतु याचा नेमका अर्थ आपल्याला माहीतच नसतो.
रोजच्या व्यवहारात या संज्ञांचे सैल अर्थ खपवून घेतल्या जातात, पण व्यवसाय अर्थशास्त्राच्या शास्त्रात या संज्ञा अगदी काटेकोर अर्थानेच वापरले जातात.
यासाठीच आपण या लेखाद्वारे संयंत्र, व्यवसाय संस्था व उद्योग म्हणजे काय (what is plant firm and industry) सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Related – बँक जुळवणीपत्रक तयार करण्याचे महत्त्व आणि आवश्यकता काय आहे ?
संयंत्र म्हणजे काय (What Is Plant In Economics)

Defination Of Plant In Economics – आधुनिक उत्पादन व्यवस्था समजून घेण्यासाठी संयंत्र ही संज्ञा लक्षात घेतली पाहिजे. संयंत्र हा शब्द मराठीत बऱ्यापैकी अपरिचितच आहे, यालाच इंग्रजीमध्ये प्लांट (Plant) असे म्हणतात. उदाहरणार्थ. टाटा मोटर्स प्लांट, टाटा स्टील प्लांट
एखाद्या वस्तूचे उत्पादन करण्यासाठी यंत्रसामग्री, प्रयोगशाळा, उपकरणे, इमारती, रस्ते आणि गुदामे अशी साधने वापरले जातात, त्यांना एकत्रितरित्या संयंत्र असे म्हणतात.
Related – सहकारी संस्थेचे फायदे आणि तोटे काय आहेत ?
व्यवसाय संस्था म्हणजे काय (What Is Business Firm In Economics)
Business Firm Meaning In Marathi – कोणत्याही राष्ट्राच्या एकूण उत्पादन व्यवस्थेत व्यवसाय संस्थेला केंद्रबिंदू मानला जातो. प्रत्येक व्यवसाय संस्था स्वतःच्या खाजगी मालकीच्या साधनांचा वापर करून वस्तूचे उत्पादन करीत असते, तर काही भाडोत्री साधने वापरली जातात.
Types Of Firms In Economics – कोणत्याही व्यवसाय संस्थेचे मूळ उद्दिष्ट नफा कमवणे हे असते. व्यवसाय अर्थशास्त्रात व्यवसाय संस्थेचा विचार दोन प्रकारे केला जातो, तो पुढील प्रमाणे.
1. सैद्धांतिक – या प्रकारात वस्तूच्या उत्पादनाशी संबंधित असणारे सर्व महत्त्वपूर्ण निर्णय व्यवसाय संस्थेकडून घेतले जातात.
उदाहरणार्थ. कोणत्या वस्तूचे उत्पादन करायचे, ते किती प्रमाणात करायचे, यासाठी कोणते जागा निवडायची, तसेच हे उत्पादन करण्यासाठी कोणती साधने व तंत्र वापरायची, आणि मुख्य म्हणजे तयार झालेल्या वस्तूची विक्री कोणत्या बाजारात करायची, त्या वस्तूची किंमत देखील ठरवावी लागते.
2. व्यावहारिक – या प्रकारात व्यवसाय संस्थांना पण मिळवण्यासाठी सांगत सामग्रीचे एकत्रीकरण करते त्याचप्रमाणे उत्पादनाचे व्यवस्थापन आणि संयोजन केले जाते.
5 Firm Definition In Business Economy – अर्थशास्त्रात व्यवसाय संस्थेच्या पाच संज्ञा आहेत त्या पुढीलप्रमाणे.
व्यवसाय संस्था म्हणजे नियंत्रणाचे एकक असते.
– फ्लॉरेन्स
व्यवसाय संस्थांनी नियंत्रण व मालकी हक्क सूचित केले जाते.
– जॉर्ज बाच
व्यवसाय संस्था म्हणजे नियंत्रणाचे आणि प्रशासनाचे एकक होय. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत व्यवसाय संस्था म्हणजे मालकी हक्क आणि नियंत्रण सूचित करणारे एकक असते.
– स्पाइट
संपत्तीच्या निर्मितीसाठी उत्पादन साधनांचे संघटन करणारे प्राथमिक एकक म्हणजे व्यवसाय संस्था होय.
– बिचॅम
व्यवसाय संस्था हे एक प्रशासन एकक असते. अशा एककाचे विभिन्न कार्य असतात. संपूर्ण व्यवसायावर होणाऱ्या परिणामांचा विचार करून या विभिन्न कार्यांचा समन्वय साधला जातो.
– पेनरोझ
Related – व्यापार म्हणजे काय मराठी माहिती
उद्योग म्हणजे काय (Industry Meaning In Marathi)
Definition Of Industry In Marathi – उद्योग म्हणजे अनेक व्यवसाय संस्थेचे एकत्रीकरण होय. उद्योग ही व्यापक संकल्पना असून एकात किंवा एक सारखे वस्तूचे उत्पादन करणाऱ्या लहान मोठ्या व्यवसाय संस्था समुच्चय असे त्याचे स्वरूप असते.
आता तुमच्या लक्षात आले असेल, संयंत्र हा उत्पादनाचा प्रामुख्याने तांत्रिक घटक असतो. व्यवसाय संस्था हा अशा सयंत्रांचे नियोजन, नियंत्रण आणि प्रशासन करणारा घटक असतो. तर उद्योग म्हणजे अशा व्यवसाय संस्थाचा एक समूह किंवा घट असतो.
यावरून तुमच्या लक्षात आले असेल की, संयंत्र व्यवसाय संस्था आणि उद्योग हे एकाच उत्पादन व्यवस्थेचे तीन टप्पे आहेत. यात उद्योग हा भाग सर्वात वर असतो, यानंतर व्यवसाय संस्था तर सर्वात खाली संयंत्र येतात. अशाप्रकारे उत्पादन व्यवस्था ही सर्वसामान्यपणे एक त्रिस्तरीय व्यवस्था असते.
Related – कार्यालयाची रचना आणि कार्यपद्धती कशी असते ?
सारांश
तर मित्रांनो, आपण या लेखातून संयंत्र, व्यवसाय संस्था व उद्योग म्हणजे काय (what is plant firm and industry) याविषयी समजून घेतले आहे. व्यवसाय अर्थशास्त्रातील संयंत्र, व्यवसाय संस्था आणि उद्योग या तीन महत्त्वाच्या संकल्पना आहेत.
मी आशा करतो की, या तीन संकल्पनेचा अर्थ स्पष्ट होऊन तुम्हाला उत्पादन व्यवस्थेचे स्वरूप समजले असेल. जर या लेखाविषयी काही शंका असतील, तर आम्हाला कमेंटद्वारे कळवा. तुमच्या समस्या सोडवण्यात आम्हाला नक्कीच आनंद होईल.