what is trade in marathi – व्यापार म्हणजे वस्तू व सेवा एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे रोखीने किवा उधारीने केली जाणारी देवाणघेवाण होय. व्यापाराला व्यवहार बाजार असेही देखील म्हणतात.
व्यापार हा देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी प्राप्त देतो. प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था ही तेथील व्यापारी वर्ग आणि कार्यक्षमतेवर आधारित असतो.
आज या लेखात आपण व्यापार म्हणजे काय मराठी माहिती (what is trade in marathi) जाणून घेणार आहोत.
व्यापार म्हणजे काय मराठी माहिती (what is trade in marathi)

व्यापारला इंग्रजी भाषेत ट्रेड असे देखील म्हणतात. व्यापार म्हणजे वस्तू व सेवा एका पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे रोखीने किवा उधारीने केली जाणारी देवाणघेवाण होय. व्यापाराला व्यवहार बाजार असेही देखील म्हणतात.
व्यापाराचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. पहिला स्वदेशी व्यापार आणि दुसरा परदेशी व्यापार.
स्वदेशी व्यापार म्हणजे – स्वतःच्या देशात केला जाणारा व्यवसाय किंवा देवाणघेवाण होय. उदाहरणार्थ. मराठवाड्यात कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते, हे पीक पुढे मुंबई सारख्या मोठ्या शहरात विकले जाते.
थोडक्यात सांगायचे झाले तर, स्वदेशी व्यापार म्हणजे एकाच देशाच्या सीमेअंतर्गत केला जाणारा व्यवहार होय.
परदेशी व्यापार म्हणजे – एका देशाने इतर देशांशी केलेला व्यापर होय. या व्यापारामध्ये प्रामुख्याने तीन गोष्टींचा समावेश होतो.
1. आयात – आपल्या देशात एखाद्या वस्तूची मागणी असेल पण उत्पादन नसेल, अशा वेळेस ज्या देशात त्या वस्तूचे उत्पादन होत आहे त्या देशातून ती वस्तू मागवली जाते, त्याला आयात असे म्हणतात.
2. निर्यात – निर्यात ही संकल्पना आयातच्या अगदी उलट आहे. आपल्या देशात मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असणारी वस्तू इतर देशात विकणे, यालाच निर्यात असे म्हणतात.
3. पुन: निर्यात – यामधे परदेशातून आयात केलेल्या वस्तू इतर देशात विकणे, याला पुन: निर्यात व्यापार म्हणतात.
व्यापारी बँक म्हणजे काय (bank information in marathi)
बँक म्हणजे पैशाची देवाणघेवाण करणारी संस्था होय. ही संस्था सुरक्षित ठेव, चलन विनिमय, यासारख्या इतर अनेक वित्तीय सेवा त्यांच्या ग्राहकांना उपलब्ध करून देतात.
प्रत्येक देशाची अर्थव्यवस्था लक्षात घेऊन त्यावर देशाचे नियंत्रण आणण्यासाठी बँकांची एक मुख्य संस्था असते. ज्याद्वारे देशातील सर्व बँक नियंत्रित केल्या जातात. यामधे गुंतवणूक बँक, कॉर्पोरेट बँक, व्यावसायिक बँक, सरकारी आणि खाजगी बँक, त्याचबरोबरच इतर वित्तीय संस्था यांचा समावेश होतो.
भारतीय मध्यवर्ती बँक (reserve bank of india information in marathi)
भारतीय मध्यवर्ती बँक म्हणजेच भारतीय रिझर्व बँक ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे. या बँकेची स्थापना इसवी सन 1935 रोजी झाली. भारतातील सर्व वित्तीय संस्था तसेच सरकारी आणि खाजगी बँकेवर रिझर्व बँकेचे नियंत्रण असते.
भारतीय रिझर्व बँकेची कामे (state the role of reserve bank of india)
1. चलन विषयक धोरण आणि अंमलबजावणी करणे.
2. संपुर्ण देशभर चलन प्रचालन करणे.
3. सरकारच्या आर्थिक व्यवहारांची जबाबदारी रिझर्व बँकेवरती असते.
4. रिझर्व बँक इतर बँकांना कर्ज पुरवते.
5. तसेच बँकांना धोरणात्मक सल्ला व मार्गदर्शन देण्याचे काम करते.
6. रिझर्व बँक निरासनगृह म्हणून कार्य करते.
7. खासगी आणि सरकारी बँका ठेवी स्वीकारून त्यातून ग्राहकांना कर्ज देत असतात, या प्रक्रियेत बँक पतनिर्मिती करतात. या पतनिर्मितीवर नियंत्रण ठेवण्याचे काम मध्यवर्ती बँक करते.
8. देशाच्या परकीय चलन साठा करण्याची जबाबदारी मध्यवर्ती बँकेची असते.
9. देशातील बँकिंग व्यवस्थेचे नियंत्रण करावे लागते, तसेच नियमावली देखील बनवावी लागते.
10. प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राज्य सहकारी बँका यांच्या कामकाजाचे नियमन रिझर्व बँकेचा ग्रामीण नियोजन व पत विभाग करतो.
बँकांचे प्रकार माहिती मराठी (types of banking system in india)
- व्यापारी बँक
- शेतकी बँक
- सहकारी बँक
- भूविकास बँक
- ग्रामीण बँक
- बचत बँक
- विनिमय बँक
- औद्योगिक बँक
सारांश
आजच्या या पोस्टमध्ये आपण व्यापार म्हणजे काय आणि व्यापराबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. तसेच भारतातील मध्यवर्ती बँक आणि तिचे कार्य पाहिले आहेत. हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
भारतीय रिझर्व बँकेचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत ?
भारतीय रिझर्व बँकेचे सध्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास आहेत.
इंटरनेट बँकिंग सुरू करणारी पहिली बँक कोणती ?
इंटरनेट बँकिंग सुरू करणारी पहिली बँक ICICI Bank आहे.
राष्ट्रीयकृत बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण आहेत ?
राष्ट्रीयकृत बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये कोणती आहे ?
भारतीय अर्थव्यवस्था जगाची विकसनशील अर्थव्यवस्था असे म्हटले जाते. दरडोई उत्पन्न कमी, दारिद्र्य रेषेखालील जास्त लोकसंख्या, निकृष्ट पायाभूत सुविधा, कृषी आधारित अर्थव्यवस्था आणि निम्न अशी काही वैशिष्ट्ये आहेत.