सोन्याचा भाव कसा ठरवला जातो?

Who Decides Gold Rate Marathi – समाजात प्रतिष्ठा वाढवणारा धातू म्हणून सोने ज्याला सुवर्ण, स्वर्ण, कनक व हेम इत्यादी नावांनी ओळखले जाते. जगातील सर्व देशांच्या चलनांची तुलना सोन्याच्या किंमतीशी केली जाते, त्यामुळे सोन्याला अचल चलन असेही म्हणतात.

सोन्याचा वापर विविध कारणांसाठी केला जातो. विशेषतः दागिने बनविण्यासाठी, भारतामध्ये सोन्याचे मंगळसूत्र आणि इतर दागिने हे सौभाग्याचे लेणे मानले जाते. याव्यतिरिक्त जगातील सर्वच देशात सोन्याने बनविलेले दागिने विशेषतः महिला वापरताना दिसतात.

पूर्वी सोन्याच्या धातूने बनविलेली चलने असायची. अगदी प्राचीन काळापासून सोन्याची प्रसिध्दी आणि महत्व वाढतच चालले आहे. यामुळे बहुतांश लोक सोन्यात गुंतवणूक करणे पसंद करतात.

पण मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का? सोन्याचा भाव कोण आणि कसा ठरवत असेल (Who Decides Gold Rate Marathi) या प्रश्नाचे उत्तर आपण या लेखातून समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग सुरू करूयात…

Table of Contents

सोने धातू विषयी माहिती (Gold Information In Marathi)

Gold Information In Marathi
नावसोने
इतर नावेसुवर्ण, स्वर्ण, कनक, हेम
प्रकारएक मौल्यवान धातू
संज्ञाAu
अणुक्रमांक79
रंगपिवळा
आढळ अमेरिका, दक्षिण आफ्रिका, चीन आणि ऑस्ट्रेलिया

साधारणपणे सोन्याचा इतिहास सहा हजार वर्षांचा आहे. अमेरिका, दक्षिण आफ्रिका, चीन आणि ऑस्ट्रेलिया या देशांत सोन्याच्या खाणी असून जगभरात सोन्याचा व्यापार केला जातो. अमेरिकेच्या नेवाडा राज्यात सोने जास्त प्रमाणात आढळते.

इसवी सन 1823 पासून रशिया देशाने चौदा वर्षे जगाला सर्वाधिक सोने पुरविले. यानंतर इ.स 1890 ते 1915 दरम्यान अलास्का, यूकॉन टेरिटरी व दक्षिण आफ्रिका येथे सोन्याचे साठे सापडले.

यानंतर 21व्या शतकाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या तीन देशांत जगातील 40% सोन्याचे उत्पादन व्हायचे.

आता दक्षिण आफ्रिका हा जगातील सोन्याचे सर्वांत मोठे साठे असलेला देश आहे. याठिकाणी सोन्याचे 50% साठे आहेत. रशिया, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्राझील व अमेरिका येथे सोन्याचे मोठे साठे आहेत.

भारतात कोलार गोल्ड फील्ड, रायचूर जिल्हा आणि रामगिरी गोल्ड फील्ड या ठिकाणी सोन्याचे साठे आहेत. सोन्याच्या प्रमाणानुसार कर्नाटक राज्याचा क्रमांक पहिला असून त्यानंतर राजस्थान, पश्चिम बंगाल, बिहार व आंध्र प्रदेश या राज्यांत सोने आढळते.

अश्या प्रकारे प्राचीन काळापासून सोन्याचा उल्लेख आढळतो. अगदी इ.स 2500 वर्षांपूर्वीच्या मोहेंजोदारो व हड़प्पा संस्कृतीच्या अवशेषात सोन्याचा वापर आभूषणांसाठी केल्याचा दिसून येतो.

Relatedलोखंडाची माहिती मराठी

सोन्याचे उपयोग काय आहे (Uses Of Gold Information In Marathi)

woman in red and gold sari

जुन्या काळात एखाद्या पदार्थावर त्याच्या सुरक्षेसाठी किंवा त्याला शोभिवंत करण्यासाठी यांत्रिक आणि रासायनिक साधनांद्वारे सोने चढ़विले जायचे. आजही बऱ्याच ठिकाणी याचा वापर केला जातो.

भारत, आयर्लंड, गॉल आणि आयबेरियाचे द्वीपकल्प येथे प्राचीन काळात नाण्यांच्या वापरासाठी सोने वापरले जायचे. याव्यतिरिक्त सोन्याचा वापर हत्यारे, पेयांची पात्रे, दागदागिने आणि मूर्तिकाम करण्यासाठी केला जायचा.

सोबतच सोने दागिने बनविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. भारतामध्ये सोन्याचे मंगळसूत्र आणि इतर दागिने हे सौभाग्याचे लेणे मानले जाते. याव्यतिरिक्त जगातील सर्वच देशात सोन्याने बनविलेले दागिने विशेषतः महिला वापरताना दिसतात.

सोन्याचा वापर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उद्योगांमध्ये केला जातो. वेगवेगळे जोड, तारांचे जोड यामध्ये सोन्याचा वापर केला जातो.

वैद्यकीय क्षेत्रातदेखील अल्पप्रमाणात सोन्याचा अंश असलेली औषधे बनवली गेली आहेत. सोन्याची काही समसंयुगे काही कर्करोगांच्या उपचारांसाठी वापरली जातात. त्याचा उपयोग शस्त्रक्रियांसाठीची उपकरणे आणि वैद्यकीय उपकरणात केला जातो.

पडलेल्या दाताच्या जागी सोन्याचा दात बसविला जातो. याव्यतिरिक्त अंतराळ क्षेत्रात सोन्याचा वापर होतो. तेथे उष्णतेचे नियमन करण्यासाठी सोन्याचा पातळ थर दिलेली उपकरणे वापरली जातात.

सोन्याचा भाव कोण ठरवतो (Who Decides Gold Rate Marathi)

Who Decides Gold Rate Marathi

मित्रांनो, सोन्याचा भाव कोणत्याही देशाचे सरकार ठरवत नाही. कारण भाव ठरवण्यासाठी कोणतेही कायदेशीर कलम किंवा तरतूद नाही. सोन्याचा भाव ठरवणं केवळ आंतरराष्ट्रीय बाजाराच्या हातात असते.

पण जगभरातील सोन्याचे मोठे व्यापारी या किमतीवर अप्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवत असतात. म्हणजे पहा, शेअर बाजारात मंदी येणार म्हणून मोठे गुंतवणूकदार सोन्यात गुंतवणूक करतात, परिणामी सोन्याची किंमत वाढते.

पण जेव्हा मोठ्या गुंतवणूकदाराला असे वाटते, की आता सोन्यापेक्ष्या शेअर बाजारात जास्त कमाई होऊ शकेल, तेव्हा तो सोन्यातील गुंतवणूक काढून टाकतो. परिणामी सोन्याची किंमत कमी होते. पण मित्रांनो, सोन्याची किंमत एका पातळीपेक्षा जास्त खाली सहसा येतच नाही.

इसवी सन 1919 साली लंडनच्या पाच मोठ्या बुलियन ट्रेडर्सनी एकत्र येऊन सोन्याचा बाजारभाव निश्चित करण्याची पध्दत सुरु केली. कारण तेव्हा जगभरात ब्रिटिश सरकारची सत्ता होती. यामध्ये रोथ्सचाइल्ड कुटुंब त्याकाळातले सर्वात श्रीमंत कुटुंब होते. म्हणून त्यांच्या ऑफिसमध्ये बसून हा सोन्याचा भाव ठरवला जायचा.

सोन्याचा आजचा भाव लंडनमध्येच ठरवला जातो. फक्त फरक इतकाच की आता त्या ऑफिसऐवजी जगातल्या 15 बँका एकत्र येऊन सोन्याचा भाव ठरवतात. यामध्ये मॉर्गन स्टॅनली, एचएसबीसी, नोव्हा स्कॉटीया, स्टँडर्ड चार्टर्ड, बँक ऑफ चायना आणि ईंडस्ट्रीयल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना अश्या मोठमोठ्या बँकेचा समावेश होतो.

भारत देशात सोन्याची मोठी बाजारपेठ असली, तरीदेखील भारत देशातील कोणतीही बँक सोन्याचा भाव ठरवण्यासाठी प्रत्यक्ष सहभागी होत नाही.

भारतात सोन्याचे मोठे साठे नसल्याने, जास्त करून भारत सोन्याची आयात केली जाते. त्यामुळे आंतरराष्ट्रीय आणि भारतातील सोन्याच्या बाजारभावात फरक असतो.

भारतातल्या बँका आंतरराष्ट्रीय बँकांकडून सोन्याची आयात करतात. यानंतर देशातील सोन्याच्या मोठ्या व्यापाऱ्यांना सर्व्हिस टॅक्स लावून विकतात. पुढे हे व्यापारी सध्याचा डॉलरचा भाव, आयातीचा कर आणि मागणीचा विचार करून सोन्याचा भाव ठरवतात.

संबंधितअभ्रक खनिज माहिती मराठी

FAQs

सोने समानार्थी शब्द मराठी

1. सुवर्ण
2. स्वर्ण
3. कनक
4. हेम

सोने धातू कोठे आढळतो?

सोने धातू जगात अनेक ठिकाणी आढळतो. जसे की, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, चीन आणि ऑस्ट्रेलिया इत्यादी. देशांत सोन्याच्या खाणी आहेत.
अमेरिकेत नेवाडा राज्यात सोने जास्त प्रमाणात मिळते.
भारतात देखील सोन्याच्या तीन खाणी आहेत. पण भारतात सोन्याची मागणी प्रचंड असल्याने, सोने आयात करावे लागते.

सोन्याची शुद्धता कशामध्ये मोजतात?

सोन्याची शुद्धता कॅरेटमध्ये मोजतात. कॅरेट हे हिरे, माणकांचे वजन मोजण्याचे परिमाण आहे.

सारांश

gold information in marathi

तर मित्रांनो, तुमच्या लक्षात आले असेल, की सोन्याचा भाव कोण ठरवतो (Who Decides Gold Rate Marathi) तसेच या भावावर प्रत्यक्षपणे कुणी सरकार, संघटना किंवा व्यापारी संस्था नियंत्रण ठेवत नाही. हे भाव पूर्णपणे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर अवलंबून असतात.

इंग्लंडमध्ये रोज सकाळी दहा वाजता आणि दुपारी तीन वाजता सोन्याचा भाव ठरवला जातो. तसेच इतरही देशातले सोन्याचे मोठे व्यापारी एकत्र येऊन सोन्याचा भाव ठरवतात.

आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याचे दर वाढले किंवा कमी झाले तर त्याचा परिणाम भारतीय बाजारात देखील होतो.

आशा करतो, की हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल, तर तुमच्या मित्रांनाही नक्कीच शेअर करा.

Leave a Comment