विद्यार्थी करिअरची चुकीची निवड का करतात ?

Why Students make Wrong Career Choices

Why Students make Wrong Career Choices Marathi – तुम्ही चुकीचे करिअर निवडले असे तुम्हाला कधी वाटले आहे का? जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही चुकीचे करिअर निवडले आहे, तर तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यासारखे बरेच विद्यार्थी किंवा कार्यरत व्यावसायिक आहेत, ज्यांना वाटते की त्यांनी चुकीचे करिअर निवडले आहे.

करिअर निवडणे हे एक तणावपूर्ण काम आहे, असे म्हणता येईल. विद्यार्थी चुकीचे करिअर का निवडतात, याची काही मुख्य कारणे आहेत. उदा. त्यांच्या मित्राने एखादा कोर्स निवडला, ते पाहून त्यांना वाटले की त्यांनीही तो कोर्स निवडला पाहिजे. त्यांना त्यांच्या पालकांनी भाग पाडले, त्यांना वाटले की ते योग्य करिअर निवडत आहेत.

चुकीचे करिअर निवडल्याने भविष्यात तुमच्या मानसिक शांततेवर परिणाम होतो. तुम्‍हाला आवडत नसलेली नोकरी तुम्ही सोडू शकत नाही कारण तुम्‍हाला आणि तुमच्‍या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ती नोकरी करावीच लागते.

आजच्या पालकांना या परिस्थितीची जाणीव आहे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे करिअर निवडायला ते मदत करतात कारण त्यांना चुकीचे करिअर पर्याय निवडण्याचे परिणाम (Effects of wrong career choice marathi) माहिती आहे.

करिअरबाबत विद्यार्थी का गोंधळतात (Why students are confused about career)

Why students are confused about career

The Career Quest नुसार, 60% कार्यरत प्रौढांना त्यांच्या करिअर निवडीबद्दल पूर्णपणे पश्चात्ताप झाला. करिअरच्या पर्यायांबद्दल जागरूकता नसणे, समवयस्कांचा प्रभाव, जबरदस्तीने घेतलेले निर्णय, झटपट यश आणि पैशाचा लोभ, ट्रेंड फॉलो करण्याची शर्यत इत्यादी चुकीचे करिअर निवडण्याचे मुख्य कारण असल्याचे सांगतात.

India Today च्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे, की 93% भारतीय विद्यार्थ्यांना फक्त 7 ते 8 करिअर पर्यायांची माहिती मिळते. त्यांनी रिपोर्टमध्ये असेही नमूद केले आहे, की भारतात 250+ विविध प्रकारच्या नोकरीचे पर्याय उपलब्ध आहेत.

कोणालाही आश्चर्य वाटेल की भारतीय विद्यार्थ्यांना फक्त 7 ते 8 करिअर पर्यायच माहित आहेत🤔 इंडिया टुडेच्या रिपोर्ट नुसार 14 ते 21 वयोगटातील दहा हजार भारतीय विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद घेतला.

वरील दोन रिपोर्टमध्ये चुकीचे करिअर निवडण्याविषयी काही सामाईक कारणे शोधली असता, पुढील बाबी लक्षात येईल.

विद्यार्थ्यांच्या पालकांनी किंवा नातेवाईकांकडून जबरदस्तीने घेतलेला निर्णय – विद्यार्थी त्यांना आवडत नसलेले विशिष्ट करिअर क्षेत्र निवडण्याचे हे एक सामान्य कारण आहे.

पालक व विद्यार्थ्यांच्या मनात करिअरच्या पर्यायांबद्दल जागरूकता नसणे – करिअर निवडण्यापूर्वी, तुम्ही कोणते पर्यायी करिअर निवडू शकता याचा शोध घेतला पाहिजे.

तुमचे ऑप्शन्स गुगल करा, यूट्यूबवर सर्च करा, प्रोफेशनल सल्ले घ्या, तुमच्या ऑप्शन्सची माहिती घेण्यासाठी बरेच पर्याय आहेत.

समवयस्कांचा प्रभाव असणे – माझा मित्र अभियांत्रिकीसाठी जात आहे, म्हणून मी देखील अभियांत्रिकीसाठी जावे? पण तुम्‍हाला व्‍यवस्‍थापनात रस असेल किंवा तुमची आवड कॉमर्समध्‍ये असेल तर कॉमर्सचा विचार करण्यास हरकत नाही.

मित्र किंवा कुणी सांगितले म्हणून अभ्यासक्रम निवडण्याऐवजी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडणे केव्हाही चांगलेच.

करिअरच्या संधी कशा ओळखायच्या (How To Identify Great Career Opportunities Marathi)

How To Identify Great Career Opportunities Marathi

तुमच्या करिअर निवडीच्या पर्यायांबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता. जसे की, तुमच्या पर्यायांसाठी गुगल सर्च करा – तुमच्या उपलब्ध पर्यायांबद्दल विश्वासार्ह माहिती देणार्‍या अनेक वेबसाइट्स आहेत.

या वेबसाइट्स तुम्हाला करिअरचे योग्य पर्याय निवडण्यात मदत करतील. तुमच्या आवडीचे पर्याय, विषय आणि आवड शोधून योग्य प्रकारे करीअर पर्याय निवडण्यात या वेबसाईट विद्यार्थ्यांना मदत करतात.

उदा. MarathiHQ.com उपलब्ध असलेल्या विविध करिअर पर्यायांची माहिती देते. यासारख्या आणखी काही वेबसाइट आहेत: shiksha.com, collegedunia.com, इ.

करिअर मार्गदर्शन करणाऱ्यांची मदत घ्या – तुमच्या शहरात करिअर समुपदेशक असतील, तर त्यांच्यासोबत भेटीची वेळ बुक करा.

तुम्हाला योग्य करिअर पर्याय निवडण्यात ते तुम्हाला नक्कीच मदत करू शकतात. ते तुमच्याकडून लेखी परीक्षा घेतात. जेणेकरून तुमचा कल किंवा आवड ओळखणे सोपे होते.

कल चाचणी आणि तुमची आवड लक्षात घेऊन ते तुम्हाला नक्कीच तुमच्या आवडीनुसार क्षेत्र निवडण्यास मदत करतील.

योग्य करिअर कसे निवडावे (how to choose a right career for yourself marathi)

भविष्याचा विचार करा – करिअर निवडताना नेहमीच दीर्घकालीन विचार करा. निवडलेला करिअर पर्याय, तुम्हाला कायम त्या क्षेत्रात नोकरी करायला आवडेल का? याचाही विचार करा. जर याचे उत्तर नाही असेल, तर चुकूनही तो पर्याय निवडू नका.

तुमचे पर्याय एक्सप्लोर करा – तुमची आवड लक्षात घेऊन त्या क्षेत्राशी निगडित असणाऱ्या व्यवसायांची आणि अभ्यासक्रमाची यादी बनवा. यासाठी गुगलवर, यूट्यूबवर सर्च करा. इंटरनेटवर अश्या अनेक अभ्यासक्रमाची माहिती सहज मिळेल.

तुमच्या कुटुंबातील सदस्यांना आणि मित्रपरिवाराला विविध करियर आणि व्यवसायांविषयी माहिती विचारा. यातून तुम्हाला करिअरचे अनेक पर्याय माहीत होतील.

व्यावसायिकांची मदत घ्या – तुम्हाला आवड असणाऱ्या क्षेत्रातील व्यवसायिकांशी प्रत्यक्ष भेट घेऊन, त्या क्षेत्रातील नवीन संधी विषयी माहिती मिळवा. भविष्यात या क्षेत्रामध्ये काय काय करता येईल याची पुरेपूर माहिती घ्या. ही माहिती एका नोंदवहीत लिहून, विचारपूर्वक स्वमताने निर्णय घ्या. तुम्हाला नक्कीच तुमच्या आवडीनुसार क्षेत्र मिळेल.

जर तुम्हाला कुटुंबातील विद्यार्थ्याला किंवा मित्रांना योग्य करिअर निवडण्यास मदत करायची असेल, तर कृपया मदत करण्यास अजिबात संकोच करू नका. तुमची मदत त्यांना खूप चांगले करिअर आणि चांगले आयुष्य देऊ शकते.

सारांश

Why Students make Wrong Career Choices Marathi

या लेखातून आपण विद्यार्थी करिअरची चुकीची निवड का करतात (Why Students make Wrong Career Choices Marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. मला आशा आहे की हा लेख तुम्हाला योग्य करिअर निवडण्यास मदत करेल.

पण या लेखाविषयी किंवा करिअर विषयी तुमच्या काही शंका किंवा मदत हवी असल्यास आम्हाला जरूर कळवा. आम्हाला तुमचे प्रश्न सोडवताना नक्कीच आनंद होईल.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)

करिअर म्हणजे काय ?

करिअर म्हणजे असे क्षेत्र ज्याच्या मदतीने आपण गुणवत्तापूर्ण कामगिरी करून मानसिक समाधान आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त करतो.

योग्य करिअर कसे निवडावे ?

तुमची बुद्धिमत्ता, क्षमता आणि आवड आणि व्यक्तिमत्त्वाचा विचार करून करिअर निवडणे महत्त्वाचे असते. कारण ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्या क्षेत्रातील जीवनपद्धती अनुरूप व्यक्तिमत्त्व असावे.
बुद्धिमत्ता, आवड, क्षमता यांचा विचार करिअर निवडताना करायला आवश्यक आहे.

पुढील वाचन :

  1. महिला व बाल विकास अधिकारी माहिती मराठी
  2. भारतातील कुटिरोद्योग माहिती मराठी
  3. वाचनासाठी प्रेरणादायी ठरणारे घटक/ बाबी कोणत्या ?
  4. वाचनाचे प्रकार किती व कोणते ?

Leave a Comment