Why we celebrate diwali in marathi – हिंदू परंपरेतील मोठा सण म्हणजे दिवाळी. हा सण संपूर्ण भारतभर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या सणाची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. दिवाळीनिमित्ताने दिव्यांची आरास, दारासमोर सडा-रांगोळी नवीन कपडे आणि फराळ बनविले जातात.
यावेळी मान्सून संपलेला असतो. शेतातलं पीक कापून घरात येते. यामुळे धन-धान्य आणि लक्ष्मीचं पूजा केली जाते. अंधकारावर मात करून प्रकाशानं तेजोमय करणारा हा सण मोठा जल्लोषात साजरा केला जातो.
पण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की, आपण दिवाळी का साजरी करतो (why we celebrate diwali festival marathi) ? या लेखातून आपण वरील प्रश्नांची उत्तरे समजावून घेणार आहोत.
आपण दिवाळी का साजरी करतो (Why we celebrate diwali in marathi)

नाव | दिवाळी |
प्रकार | हिंदु सण |
दिवाळी कधी आहे ? | 24 ऑक्टोंबरला 2022 |
धनतेरस – 23 ऑक्टोंबर 2022 लक्ष्मी पूजन – 24 ऑक्टोंबर गोवर्धन पूजा – 25 ऑक्टोंबर भाऊबीज – 26 ऑक्टोंबर |
Diwali padwa story in marathi – पुराणातील कथांनुसार दिवाळीच्या दिवशी प्रभू श्रीराम 14 वर्षे वनवास करून पुन्हा अयोध्येत परतले होते. लंकेतील रावणाचा वध करून ते अयोध्यानगरीत आल्यानंतर अयोध्या नगरी दिव्यांनी उजळून त्यांचे स्वागत करण्यात आले होते.
रावणाचा ज्याप्रकारे वध केला तसेच आपल्या जीवनातील अंधार दूर करून दिव्याच्या ज्योतीप्रमाणे सकारात्मकता आणणारा सण म्हणून दिवाळी साजरी केली जाते.
आनंद आणि समृद्धीची इच्छा बाळगण्यासाठी दिवाळीपेक्षा आणखी कोणता सण नाही, म्हणून या निमित्ताने लक्ष्मीचीही पूजा (laxmi pujan) केली जाते.
दिवाळीबरोबरच दीपदान, धनत्रयोदशी, वसूबारस, पाडवा आणि भाऊबीज असे सणही साजरे केले जातात.
कृष्णानं नरकाचा वध केला, तेव्हापासून नरक चतुर्दशी साजरी (narak chaturdashi) केली जाते. घरातील अमंगळ जावं आणि घरातील धन-दौलत समृद्धी कायम राहावी यासाठी लक्ष्मीपूजन केलं जातं. बली राजाचा नाश केल्याचं प्रतिक म्हणून बलीप्रतिपदा (balipratipada celebrated) साजरी केली जाते.
शटकासुराचा वध करून असंख्य भगिनींना आणि त्यांच्या भावाला सोडवल्यानंतर भाऊबीज साजरी (bhaubeej celebration) करण्याची प्रथा आहे.
याशिवाय प्रभू श्रीराम यांनी रावणाचा वध करून अयोध्येला आल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी दिवाळी साजरी (diwali celebration 2022) केली जाते अशी मान्यता आहे.
दीपावलीच्या वेळी घराबाहेर दीव्यांची आरास म्हणजेच एका ओळीत काही अंतरानं दिवे लावण्याची परंपरा आहे. शेतात पिकलेलं धान्य यावेळी घरी भरलं जातं. त्यामुळे बळीराजाही आनंदात असतो. या धान्याचं पूजन करून बाजारात विक्रीसाठी आणलं जातं.
दिवाळी कशी साजरी करतात (how to celebrate diwali marathi mahiti)
दिवाळी हे ज्ञानाची आनंदाची आणि सुख-समृद्धीचे प्रत्येक माणूस साजरा केला जाणारा हिंदू सण (hindu festivals 2022) आहे. या सणाच्या निमित्ताने आपल्या आयुष्यातील वाईट विचारांचा त्याग करून नव्याने आपल्या आयुष्यात जगण्याची सुरुवात केली जाते.
दिवाळीच्या निमित्ताने नवीन कपडे खरेदी करतात. गोड गोड पदार्थ बनवतात. नवे ध्येय, नव्या संकल्पना ठरवतात. दिवाळीच्या निमित्ताने वडीलधाऱ्या व्यक्तींचे आशीर्वाद घेतात. आपल्या आराध्य दैवताची पूजा केली जाते.
तसेच वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, गोवर्धन पूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज अश्या विविध प्रकारचे सण आणि उत्सव आनंदात साजरे करतात.
धनतेरसपासून दिवाळीची सुरुवात होते (diwali start from dhanteras), या दिवसापासूनच दारासमोर सकाळी सडा शिंपून त्यावर छान रांगोळी काढली जाते. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ सुंदर केला जातो. लहान मुले किल्ला बनवतात. या किल्ल्यावर शिवाजी महाराज व त्यांचे सैनिक नेमतात.
रात्रीच्या वेळी सर्व अंगणात आणि दारासमोर दिवे लावून वातावरण अगदी प्रकाशमय केले जाते. घरातील स्त्रिया लाडू, करंज्या, चिवडा, शेव, चकली, शंकरपाळ्या असे पदार्थ बनवतात.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरातील लक्ष्मी, गाई यांचे पूजन केले जाते. आपल्या शेतात दिवा लावून शेताची पूजा केली जाते. घरातील नकारात्मक भावना निघून जाण्यासाठी प्रार्थना केली जाते.
भाई दुजच्या दिवशी बहीण आपल्या भावाला ओवाळतात. बहिण आपल्या भावाचे आयुष्य वाढवे यासाठी, देवाकडे प्रार्थना करतात. या दिवशी यमराज, यमदूत आणि चित्रगुप्त यांची पूजा केली जाते.
सारांश
या लेखातून आपण दिवाळी का साजरी करतो (Why we celebrate diwali in marathi) याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ? हे नक्की सांगा. बाकी लेख आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
बलिप्रतिपदा म्हणजे काय ?
बलिप्रतिपदा हा दिवाळीतील मुहूर्ताचा शुभ दिवस असतो. दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन अनाठायी औदार्य दाखवणाऱ्या उदार बळीराजाला कपटाने जमिनीत म्हणजे पाताळात गाडले. बळीला पाताळाचे राज्य देऊन विष्णूने त्याच्या राज्याच्या द्वारपालाचे काम स्वीकारले, अशी अख्यायिका आहे.
इडा पिडा टळु दे बळीच राज्य येऊ दे याचा अर्थ काय आहे ?
बळीराजा जनतेची काळजी घेत होता म्हणून त्याचं राज्य अजूनही यावं यासाठी स्त्रिया भावाला ओवाळताना म्हणतात – “इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो” अशी म्हण रूढ आहे.
हे लेख जरूर वाचा :