Why we celebrate gudi padwa in marathi – गुढीपाडवा म्हणजे हिंदू नववर्षाचा पहिला दिवस होय. हिंदू धर्मात या दिवसाविषयीच्या अनेक पौराणिक कथांशी संबंध दिसून येतो. त्यामुळे हा दिवस सनातन धर्मात अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो.
महाराष्ट्रात गुढीपाडव्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा सण अतिशय उत्साहात साजरा केला जातो. पण तुम्हाला हा सण साजरा करण्यामागील शास्त्र किंवा कारण माहित आहे का ?
तुम्हाला जर माहित असेल, तर चांगली गोष्ट आहे. पण जर तुम्हाला गुढीपाडवा का साजरा केला जातो, याविषयी माहित नसेल तर हा लेख खास तुमच्यासाठीच आहे. कारण या लेखातून आपण गुढीपाडवा हा सण का साजरा केला जातो (Why we celebrate gudi padwa in marathi) याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
संबंधित लेख – महाराष्ट्रातील सण आणि उत्सव माहिती
गुढीपाडवा हा सण का साजरा केला जातो (Why we celebrate gudi padwa in marathi)

मित्रांनो, गुढीपाडवा हा सण भारतातील विविध प्रांतात अतिशय उत्साहात साजरा केला जातो. खास करून महाराष्ट्रात, त्यामुळेच तर गुढीपाडव्याचा मराठी मानाचा सण असे म्हंटले जाते. या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसायाची सुरुवात, नवीन उपक्रम प्रारंभ, सुवर्ण खरेदी अश्या गोष्टी केल्या जातात. कारण वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त मानला जातो.
गुढीपाडवा साजरा करण्यामागे अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक परंपरा सांगता येतील. यातीलच एक म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माने विश्वाची निर्मिती केली आणि या दिवसानंतर सत्यायुगाचा आरंभ झाला.
गुढीपाडव्याचा दिवशी शालिवाहन नावाच्या कुंभार पुत्राने मातीच्या सैनिकांच्या सैन्याने आपल्या शत्रूंवर विजय मिळवला होता. याच कारणामुळे शालिवाहन शके याच दिवशी सुरू होते.
पौराणिक कथेनुसार त्रेतायुगात बळी हा दक्षिण भारतात राज्य करायचं. जेव्हा श्रीराम सीतेला रावणाच्या कैदेतून सोडवण्यासाठी लंकेकडे निघाले होते. त्यावेळी दक्षिणेत त्यांची भेट बळीचा भाऊ सुग्रीवाशी झाली.
सुग्रीवाने रामाला आपला भाऊ बळीच्या कुशासनाविषयी सांगितले. तसेच त्याविरोधात रामाची मदत मागितली. यानंतर रामाने बळीचा वध करून तेथील जनतेला बळीच्या दहशतीतून मुक्त केले. ज्या दिवशी भगवान रामाने बळीचा वध केला, तो दिवस चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा होता, हा दिवस विजयाचा दिवस मानला जातो.
हा दिवस साजरा करताना दक्षिण भारतातील लोकांनी आनंद व्यक्त करत घरोघरी विजयाचा झेंडा फडकावला. ज्याला आपण गुढी म्हणून ओळखतो.
याव्यतिरिक्त आदिशक्तीचे प्रकटीकरण चैत्र नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी झाले अशी मान्यता आहे. चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी गणितज्ञ भास्कराचार्य यांनी तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण यांच्या आधारे पंचांगाची रचना केली असे मानले जाते.
गुढीपाडवा सण साजरा करण्यामागे फक्त पौराणीक महत्व नसून सांस्कृतिक व सामाजिक, आरोग्यविषयक महत्व देखील आहे.
संबंधित लेख – मकर संक्रांत का साजरी केली जाते ?
गुढीपाडव्याचे महत्त्व काय आहे (gudi padwa importance in marathi)
प्रत्येक सण साजरा करण्यामागे काही उद्देश असतात. यामुळे गुढीपाडवा साजरा करण्यामागे देखील आपल्या पूर्वजांचे काही उद्देश असतील. हे उद्देश आपण थोडक्यात समजून घेऊ.
चैत्र या मराठी महिन्यापासून वसंत ऋतू सुरू होती. त्यामुळे वातावरणात अनेक बदल होतात. झाडाची जुनी सुकलेली पानं गळून त्यांना नवी पालवी फुटते, आंब्याला मोहोर येतो. नवीन वर्षाच्या सुरुवात म्हणून गुढीला आंब्याची डहाळी बांधली जाते. याला आपण नैसर्गिक बदलाचे स्वागत करण्याची पद्धत म्हणू शकतो.
नवीन वर्षाच्या निमित्ताने गुढीमध्ये कडूलिंबाची पाने लावली जातो. असे म्हणतात, प्राचीन काळापासून चैत्र शुद्ध प्रतिपदेला ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर हे कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून खातात. असे केल्याने पचनक्रिया सुधारणं, पित्ताचा नाश करणं, त्वचारोग बरे होण्यास मदत होते.
हिंदू धर्मात चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी अनेक महत्वपूर्ण घटना घडल्या आहेत. या घटनांचे स्मरण करून नवीन वर्षाच्या निमित्ताने आयुष्याची नवी सुरुवात करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
संबंधित लेख – गुरुपौर्णिमा उत्सव माहिती मराठी
गुढीपाडवा कसा साजरा करतात (how to celebrate gudi padwa in marathi)
गुढीपाडवा सण साजरा करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करतात आणि सूर्योदयानंतर ही गुढी उभारतात. गुढी उभारण्यासाठी उंच बांबूच्या काडीला कडूनिंबाची डहाळी लावतात. गुढीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र अथवा साडी गुंडाळतात. गुढीवर फुलांचा हार आणि साखरेची गाठी बांधून त्यावर तांब्याचे भांडे ठेवतात.
गुढीचा बांबू पाटावर उभा करून तयार केलेली गुढी दरात किंवा उंच गच्चीवर लावतात. गुढीची पूजा करून गुढीला गंध, फुले आणि अक्षता वाहून निरांजन लावून उदबत्ती लावतात. दुपारी गोड नैवेद्य दाखवून संध्याकाळी पुन्हा हळद-कुंकू फुले वाहून गुढी उतरवली जाते.
यादिवशी आपल्या आप्तेष्टांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देऊन गुढीपाडवा साजरा करतात.
सारांश
या लेखात आपण गुढीपाडवा हा सण का साजरा केला जातो (Why we celebrate gudi padwa in marathi), याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, हे आम्हाला नक्की कळवा. बाकी तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ❤️