5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन का साजरा केला जातो ?

Why We Celebrate Teachers Day In Marathi – मित्रांनो, शिक्षकांची आपल्या जीवनात सर्वात महत्त्वाची भूमिका असते. कारण ते आपल्याला फक्त पुस्तकी ज्ञान न देता आपल्याला व्यावहारिकपणे येणाऱ्या आव्हानांसाठी जागरूक नागरिक बनवितात. अश्या या आपल्या गुरुंविषयी आदरभाव व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच शिक्षक दिन होय.

पण मित्रांनो, तुम्ही कधी असा विचार केलाय का, शिक्षक दिवस नेमक 5 सप्टेंबर रोजीच का साजरा केला जातो? इतर दिवशी का नाही. जर तुम्हाला या प्रश्नांचे उत्तर जाणून घ्यायचे असेल तर हा लेख संपूर्ण वाचा.

आजच्या या लेखातून आपण 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन का साजरा केला जातो (Why We Celebrate Teachers Day In Marathi) याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूयात..

5 सप्टेंबर शिक्षक दिन माहिती मराठी (Teachers Day Information In Marathi)

विषयशिक्षक दिवस
प्रकारजगभरातील शिक्षकांना आदरभाव व्यक्त करण्याचा दिवस
केव्हा साजरा केला जातो?दरवर्षी 5 सप्टेंबर
साजरा करणारेसर्वजण

नमस्कार मित्रांनो, आज शिक्षक दिवस म्हणजे आपल्या शिक्षकांबद्दल प्रेम आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जाणारा दिवस. या दिवशी जगभरातील शिक्षकांना त्यांच्या कार्याबद्दल सन्मान देऊन आदर व्यक्त केला जातो. भारतासह इतर देशांतही हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

व्यक्तिगत आणि सामाजिक विकासात शिक्षणाचा वाटा खूप मोलाचा असतो. असे म्हणतात, जिथे शिक्षण आहे तिथेच विकास आहे. शिक्षणातून आपल्या आयुष्याची जडणघडण करणारे आपले शिक्षक, आपले मार्गदर्शक, आपले गुरू यांचा सन्मान करण्यासाठीचा दिवस म्हणजे शिक्षक दिवस होय.

इसवी सन 1962 मध्ये आपल्या देशात सर्वप्रथम शिक्षक दिन साजरा करण्यात आला. भारतात शिक्षक दिवस 5 सप्टेंबरला साजरा करण्यात येतो. तर इंडोनेशिया, व्हिएतनाम देशात नोव्हेंबर महिन्यात अंक ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, ब्राझील, कॅनडा, चीली, जर्मनी या देशात ऑक्टोबरमध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो.

यावरून तुमच्या लक्षात आले असेल की, जगभरात विविध देशात वेगवेगळ्या दिवशी शिक्षक दिवस साजरा केला जातो. पण आपल्या भारतात हा दिवस पाच सप्टेंबरला का साजरा केला जातो ? याचे उत्तर आपण पुढे जाऊन घेऊयात.

5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन का साजरा केला जातो (Why We Celebrate Teachers Day In Marathi)

Why We Celebrate Teachers Day In Marathi

तर मंडळी, आपल्या देशातील एक उत्तम शिक्षक आणि माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवशी भारतात शिक्षक दिन साजरा करतात. डॉ. राधाकृष्णन यांना शिक्षणाविषयी अतिशय जिव्हाळा वाटत असे. यामुळे त्यांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्रात विकास घडून आणण्यासाठी प्रयत्न केले.

त्यांच्या मते, चांगल्या शिक्षकांचा सन्मान हा संस्कृतीचा, सत्याचा आणि ज्ञानाचा सन्मान आहे. कोणत्याही समाजाचा विकास एका आदर्श शिक्षकांमुळे होत असतो. यामुळे शिक्षकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

समाजाला सुसंस्कृत करणारा शिक्षक हा देशाचा आधार आणि दिलासा आहे. त्यामुळे नागरिकांनी या पवित्र व्यवसायाचा सन्मान केला पाहिजे.

– डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी अनेक विषयांचा अभ्यास केला होता. त्यांच्या मते, एक शिक्षक शिष्याला ज्ञान देताना परिपूर्ण असायला हवा, यासाठी त्यांनी विशेष लक्ष दिले. त्यांनी संस्कृत भाषेचा अभ्यास करून प्रस्थानत्रयी आणि समग्र भाष्यग्रंथ अभ्यासले. सोबतच प्लेटो, प्लॉटनिस, कान्ट, ब्रॅडले अशा तत्त्वज्ञांच्या ग्रंथांचा अभ्यास केला.

इसवी सन 1962 मध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून कारभार स्विकारला. यावेळी त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचा जन्मदिवस साजरा करण्याची परवानगी मागितली. यावेळी ते म्हणाले की, माझा वाढदिवस साजरा करण्यापेक्षा हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करा.

Related – शिक्षक दिनानिमित्त कविता मराठी

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आयुष्यभर एक परिपूर्ण शिक्षक म्हणून विद्यार्थी आणि समाजाचा विकास करण्यासाठी प्रयत्न केले. यासाठी भारत सरकारने पाच सप्टेंबर रोजी त्यांचा जन्मदिवस म्हणून शिक्षकदिन साजरा करण्याचे जाहीर केले.

तेव्हापासून 5 सप्टेंबर रोजी संपूर्ण भारतात शिक्षक दिन साजरा केला जातो. या दिवशी जगभरातील लोक आपल्या शिक्षकांचा गौरव करून त्यांचा सन्मान करतात.

Related – गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा संदेश मराठी

सारांश

गुरु तू मनाचा, गुरु तू जीवनाचा हिंमत जगायला दिली, म्हणून अर्थ लागला जीवनाला..

माझ्या सर्व शिक्षकांचे मनापासून आभार…

तर मित्रांनो, आपल्या जीवनातील अविभाज्य घटक असणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्याचा हा खास दिवस आहे. अशा करतो की, 5 सप्टेंबर शिक्षक दिन का साजरा केला जातो (Why We Celebrate Teachers Day In Marathi) याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती मिळाली असेल.

Leave a Comment