जागतिक पर्यावरण दिन माहिती मराठी (world environment day 2022)

By | December 3, 2022

World environment day 2022 – पर्यावरणात मानवाचे एक महत्वाचे स्थान आहे. मानव हा सर्वात बुद्धिमान प्राणी म्हणून ओळखला जातो. त्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणासाठी जबाबदारी ही आपल्यावरच आहे.

पर्यावरणाची माहिती आणि महत्व या लेखात आपण पर्यावरण म्हणजे काय आणि त्याचे महत्वाचे घटक, नैसर्गिक साधन संपत्तीचे महत्व, समस्या आणि उपाय याविषयी माहिती जाणून घेतली आहे. मानव हा पर्यावरणातील केंद्रस्थानी असून त्याच्या योग्य-अयोग्य कृतीमुळे पर्यावरणावर अपायकारक परिणाम झालेला दिसून येतो.

मानवाचा इतिहास पाहिला तर, सुरुवातीला शिकारी पासून शेतकरी असा मानवाचा विकास झाला आहे. मानवी जीवन अधिक सुखी व्हावे यासाठी बुद्धी आणि कौशल्याच्या जोरावर नवनवीन साधने आणि तंत्रज्ञान शोधून काढले. यातूनच स्वार्थ निर्माण झाला. सत्ता आणि संपत्ती हवी-हवीशी वाटू लागली. हे सर्व करत असताना निसर्गावर प्रचंड ताण येऊ लागला.

पृथ्वीवर वाढणारे लोकसंख्येचे प्रमाण, बेसुमार वृक्षतोड, इंधनासाठी जमिनीत खोदकाम, पाण्याचा अतिवापर, ग्लोबल वॉर्मिग यासारखे अनेक प्रश्न निर्माण झाले. यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीची टंचाई भासू लागली आणि जीवनाला आवश्यक असणारी हवा, जमीन आणि पाणी प्रदूषित होऊ लागली.

पर्यावरणाची समस्या ही स्थानिक समस्या नसून जागतिक समस्या आहे. यामुळे मानवाचे, प्राण्याचे आणि नैसर्गिक साधनसंपत्तीची अपरिमित हानी झाली आहे.

यावर उपाय म्हणून अनेक चर्चा आणि चळवळी करण्यात आल्या. या लेखात आपण जागतिक पर्यावरण दिन माहिती मराठी (world environment day 2022) जाणून घेणार आहोत.

जागतिक पर्यावरण दिन माहिती मराठी (world environment day 2022)

world environment day 2022
विषयजागतिक पर्यावरण दिवस
साजरा5 जून (दरवर्षी)
सुरुवात5 जून 1973
साजरा करणारे जगभर
उद्देश आणि हेतूपर्यावरणीय समस्या सोडवण्यासाठी आणि त्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी

इसवी सन 1972 मध्ये मानवी पर्यावरण या विषयावर स्वीडनमधील स्टॉकहोममध्ये एका आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेत 100 हून अधिक देशांनी भाग घेतला. यामध्ये 26 सूत्र महाधिकार पत्र घोषित करण्यात आले. या पत्रांना महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज समजला जातो.

या पत्राच्या आधारावर युनेस्कोच्या अंतर्गत संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम कमिटीची स्थापना करण्यात आली. यावेळी यात पन्नास सदस्य होते. 10 जून ते 18 जून 1982 या कालावधीत चाललेल्या परिषदेत 105 देशांनी सहभाग घेतला. या वेळी नैरोबी घोषणा पत्र प्रसिद्ध करण्यात आले. पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय जागतिक परिषद नैरोबी शहरात संपन्न झाली.

5 जून 1972 रोजी जगात प्रथमतः जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. जागतिक पर्यावरण दिवसाला इको डे किंवा जागतिक पर्यावरण संरक्षण दिन देखील म्हणातात.

भारतातील पर्यावरण विषयक माहिती मराठी (india environment day information in marathi)

भारत देशात 1972 पासून पर्यावरण विषयक जागृती निर्माण होऊन योजनापूर्वक कार्यक्रम सुरू झाला. देशातील पर्यावरण विषयक समस्यांवर मात करण्यासाठी नॅशनल कमिटी फॉर एन्व्हायरमेंटल प्लॅनिंग अँड को-ऑर्डिनेशन या समितीची स्थापना करण्यात आली.

औद्योगिक प्रदूषणाला आळा घालण्यासाठी केंद्रीय व राज्यस्तरीय प्रदूषण नियंत्रण मंडळाची स्थापना करण्यात आली. या समितीच्या वतीने पुढील समस्या सोडवण्यात मदत कार्यक्रम राबवले जातात.

  • औद्योगिक प्रदूषणाचे नियंत्रण
  • वनस्पती आणि प्राण्यांच्या नष्ट होणाऱ्या प्रजातींचे संरक्षण
  • पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि किमान स्वच्छ्ता आरोग्य व्यवस्था
  • देशातील जमीन, पाणी आणि वनस्पती यांचे व्यवस्थापन आणि व्यवस्थापन

जागतिक पर्यावरण दिवस (world environment day 2022 theme and host country)

world environment day 2022 theme and host country – जागतिक पर्यावरण दिन 2022 चे आयोजन स्वीडन या देशाने केले आहे. Only One Earth हे मोहिमेचे घोषवाक्य आहे. निसर्गाशी एकरूपतेने जगणे हेच उद्देश यामागे आहे.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण जागतिक पर्यावरण दिन माहिती मराठी (world environment day 2022) याविषयी माहिती जाणून घेतली. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न(faq)

पर्यावरण दिन कधी साजरा करण्यात येतो ?

पर्यावरण दिन दरवर्षी 5 जून रोजी साजरा करण्यात येतो.

पहिली जागतिक पर्यावरण परिषद कोठे भरली ?

इसवी सन 1972 मध्ये स्टॉकहोम येथे पहिली जागतिक पर्यावरण परिषद भरली.

मानवी हस्तक्षेपाने निर्माण झालेल्या विविध घटनांची माहिती लिहा.

6 ऑगस्ट 1945 – अमेरिकेने जपानमधील हिरोशिमा शहरावर अणुबॉम्ब टाकला. यामध्ये एक लाख तीस हजार नागरिक मरण पावले आणि लाखो लोक जखमी झाले.
1 मार्च 1954 – पॅसिफिकमधील मार्शल बेटावर अमेरिकेने पहिला हायड्रोजन बॉम्ब फोडला.
1956 – जपानमधील मिथाईल मर्क्युरीची विषबाधा होऊन हजारो लोक मरण पावले. तीन हजार लोक अंध झाले.
1967 ते 1975 – व्हिएतनामच्या युद्धात अमेरिकेने जंगलातून एजंट ऑरेंज या वनस्पती नाशक विषारी द्रव्याचा प्रचंड मारा केला त्यामुळे नद्या प्रदूषित झाल्या, गर्भपात व जन्मजात दोषांचे परिणाम भयानक वाढली.
डिसेंबर 1984 – भारतात भोपाळ याठिकाणी युनियन कार्बाईड कारखान्यातून विषारी वायूची गळती होऊन पंचवीसशे लोक मरण पावले आणि वीस हजाराहून अधिक जायबंदी झाले.
26 एप्रिल 1986 – सेक्सी सोवियत युनियन चा युक्रेन प्रांतातल्या चेर्नोबिल आणि घटस्फोट झाला त्यामुळे एक लाख 31 हजार चौरस किलोमीटरचे क्षेत्र प्रदूषित झाले.

पर्यावरणातील मानवी जीवनात उपयुक्त असणाऱ्या घटकांना काय म्हणतात?

पर्यावरणातील मानवी जीवनात उपयुक्त असणाऱ्या घटकांना नैसर्गिक साधनसंपत्ती असे म्हणतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *