world radiology day 2022 marathi – रेडियोग्राफी ज्याला आपण साधारणपणे क्ष-किरणांनी चित्र घेण्याची पद्धत किंवा एक्स-रे म्हणून ओळखतो. एक्स-रेच्या मदतीने जगात वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती झाली. गुंतागुंतीच्या आजाराचे निदान करण्यासाठी एक्स-रे खूप महत्वपूर्ण भूमिका बजावतो.
सीटी स्कॅन करून आपल्या शरीराच्या आतील अवयवांची प्रतिमा क्ष-किरणच्या सहाय्याने मिळवले जाते. क्ष-किरणाचा शोध लागून शंभराहून अधिक वर्षे झाली आहेत.
8 नोव्हेंबर 1895 साली विल्हेम राँटजेन यांनी क्ष-किरणाचा शोध लावला. त्यामुळे हा दिवस जागतिक रेडियोग्राफी दिवस म्हणून साजरा केला जातो.
या लेखातून आपण जागतिक रेडियोग्राफी दिवस माहिती (world radiology day 2022 marathi) जाणून घेणार आहोत.
Table of Contents
- जागतिक रेडियोग्राफी दिवस माहिती (world radiology day 2022 marathi)
- जागतिक रेडियोग्राफी दिवस थीम (world radiography day 2022 theme marathi)
- जागतिक रेडियोग्राफी दिवस कसा साजरा करतात (international radiology day celebration ideas 2022)
- सारांश
- वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
जागतिक रेडियोग्राफी दिवस माहिती (world radiology day 2022 marathi)

विषय | जागतिक रेडियोग्राफी दिवस |
प्रकार | वैज्ञानिक शोध दिवस |
शोध | एक्स-रे (क्ष-किरण) |
शोध लावणाऱ्या वैज्ञानिक नाव | प्रो. विल्हेम राँटजेन |
शोध केव्हा लागला ? | 8 नोव्हेंबर 1895 |
पुरस्कार | भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक (1901) |
8 नोव्हेंबर 2022 आज एक्स-रे चा शोध लागून 124 वर्ष पूर्ण झाली. या काळात वैद्यकीय क्षेत्रात अनेक गुंतागुंतीच्या शस्रक्रिया आणि रोगाचे निदान करण्यासाठी एक्स-रे चा शोध खूप उपयोगात आला.
जर्मनीतल्या वुर्झबर्ग विश्वविद्यालयातल्या प्रयोगशाळेत प्रा. विल्हेम राँटजेन एक प्रयोग करत होते. प्रयोग करण्यासाठी त्यांनी प्रयोगशाळेत अंधार केला. कॅथॉड रे ट्युब वापरून ते त्यांच्या प्रयोगाच्या तयारीला लागले होते. या प्रयोगात त्यांनी बेरियम प्लॅटिनो सायनाईड वापरले होते.
अंधाऱ्या खोलीत प्रयोग सुरू असताना काही वेळाने प्रा. राँटजेन यांना वेगळ्याच रंगांच्या प्रकाश लहरी चमकतांना दिसल्या. या लहरीच्या प्रतिमा खोलीच्या काळा पडद्यावर विचित्र आकृतीमध्ये उमटलेल्या दिसल्या.
प्रयोगात वापरलेल्या कॅथॉड रे ट्युब (CRT) चे तोंड पक्के झाकलेले असूनही भिंतीवरच्या पडद्यावर आकृत्या पाहून प्राध्यापकांनी त्या अज्ञात किरणांना एक्स-रे असे नाव दिले.
एक्स-रे किरणांच्या आरपार जाण्याच्या गुणधर्माचा उपयोग माणसाच्या शरीरातील भाग पाहण्यासाठी होवू शकतो, अशा विचार लक्षात घेऊन प्रा. राँटजेन यांनी एक्स-रे चा शोध जगापुढे यशस्वीरित्या मांडला.
या शोधाने माणसाच्या हाडांच्या विविध समस्यांचा अभ्यास आणि उपाय करणे अत्यंत सोयीस्कर बनले. क्ष-किरणांच्या शोधामुळे इसवी सन 1901 साली प्रा. राँटजेन यांना भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार देण्यात आला.
पुढे क्ष-किरणांच्या अजून शोधात असणाऱ्या प्रा. राँटजेन आणि त्यांचे दोन विद्यार्थी क्ष-किरणांच्या घातक माऱ्याने 10 फेब्रुवारी 1923 रोजी मृत्यू पावले.
8 नोव्हेंबर हा दिवस प्रा. राँटजेन यांच्या अनमोल शोधाची आठवण म्हणून जगभरात जागतिक रेडियोग्राफी दिवस म्हणून साजरा केला जातो.
जागतिक रेडियोग्राफी दिवस थीम (world radiography day 2022 theme marathi)
जागतिक रेडियोग्राफी दिवसाच्या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी आणि वैज्ञानिकांच्या कल्पना शक्तीला साद देण्यासाठी आंतरराष्ट्रीय रेडियोग्राफी दिवस (international day of radiology 2022) साजरा केला जात आहे.
8 नोव्हेंबर 2022 रोजी Radiologists and Radiographers supporting patients ही थीम घेऊन जागतिक रेडियोग्राफी दिवस साजरा करण्यात येणार आहे.
जागतिक रेडियोग्राफी दिवस कसा साजरा करतात (international radiology day celebration ideas 2022)
दरवर्षी 8 नोव्हेंबरला जगभरातील रेडिओलॉजिकल संस्था विविध कार्यक्रम आयोजित करतात. या कार्यक्रमात प्रयोग प्रदर्शन, कार्यशाळा, व्याख्यान यांचा समावेश असतो. या कार्यक्रमात रेडिओलॉजिस्ट आणि सामान्य लोक देखील सहभागी होतात. ज्यामुळे रेडिओलॉजीबद्दल माहिती सर्वांपर्यंत पोहचते.
आंतरराष्ट्रीय पातळीवर रेडियोग्राफी संस्था 2012 पासून विविध मोहीम हाती घेत साजरे करत आहे.
वर्ष | मोहीम (थीम) |
---|---|
2012 | Oncologic Imaging |
2013 | Thoracic Imaging |
2014 | Brain Imaging |
2015 | Paediatric Imaging |
2016 | Breast Imaging |
2017 | Emergency Imaging |
2018 | Cardiac Imaging |
2019 | Sports Imaging |
2020 | Radiologists and Radiographers supporting patients during COVID-19 |
2021 | Interventional radiology – Active care for the patient |
2022 | Radiologists and Radiographers supporting patients |
सारांश
आजच्या या पोस्टमध्ये आपण जागतिक रेडियोग्राफी दिवस माहिती (world radiology day 2022 marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न (faq)
जागतिक रेडियोग्राफी दिवस कधीपासून साजरा केला जातो ?
इसवी सन 2012 पासून दरवर्षी 8 नोव्हेंबर रोजी जागतिक रेडियोग्राफी दिवस साजरा केला जातो.
एक्स-रे चा शोध कोणी लावला ?
इसवी सन 1895 साली एक्स-रे चा शोध प्रा. विल्हेम राँटजेन यांनी लावला.
क्ष-किरणांचा उपयोग कोठे होतो ?
क्ष-किरणांचा उपयोग माणसाच्या हाडांच्या विविध समस्यांचा अभ्यास आणि उपाय करण्यासाठी होतो. क्ष-किरण तंत्रज्ञान वापरून सिटी स्कॅन केले जाते, यामधून आपल्या शरीरातील आतील अवयवांची प्रतिमा मिळते. साधारणता एक्स-रे चा वापर वैद्यकीय क्षेत्रात गंभीर रोग समस्या शोधताना आणि गुंतागुंतीचे शस्त्रक्रिया करताना होतो.
पुढील वाचन :