जागतिक पर्यटन दिवस माहिती मराठी

World Tourism Day Information In Marathi – जागतिक पर्यटन दिवस दरवर्षी 27 सप्टेंबर या दिवशी जगभरात साजरा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्राची जागतिक पर्यटन संस्था UNWTO याच दिवशी इसवी सन 1970 रोजी स्थापना झाली होती. म्हणून याच दिवशी इसवी सन 1980 पासून जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येतो.

27 सप्टेंबर 1980 रोजी पहिला जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात आला. या दिवशी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम राबवले जातात. पर्यटनविषयक संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी प्रयत्न केले जातात.

या लेखात आपण जागतिक पर्यटन दिवस माहिती मराठी (World Tourism Day Information In Marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

हा लेख जरूर वाचामहाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची नावे (maharashtra division in marathi)

Table of Contents

जागतिक पर्यटन दिवस माहिती मराठी (World Tourism Day Information In Marathi)

World tourism day information in marathi
जागतिक पर्यटन दिवस माहिती मराठी
नावजागतिक पर्यटन दिवस
सुरुवातइसवी सन 1970 (UNWTO)
पहिल्यांदा साजरा27 सप्टेंबर 1980
साजरा करणारेसार्वजनिक

सुंदर निसर्ग आणि हिरवाईने नटलेल्या डोंगररांगा, खोल वाहणाऱ्या दऱ्या, खळ खळत वाहणारी नदी, निळाशार समुद्र, गजबजणारे सागर किनारे आणि अशा ठिकाणी भटकंती साठी मिळणारी संधी कोण सोडेल? एक पर्यटन प्रेमी अशा मिळणाऱ्या सुवर्ण संधीचा नक्कीच सदुपयोग करून घेत असतो.

पर्यटन क्षेत्र हे रोजगार निर्मिती करून देणारे क्षेत्र आहे. त्यामुळे जागतिक पर्यटन दिन साजरा करून देशातील पर्यटनाचा प्रचार आणि प्रसार व्हावा याचा प्रयत्न केला जातो. पर्यटन हे असे क्षेत्र आहे त्यामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्था सुधारू शकते.

एखाद्या विशिष्ट ठिकाणी असणारे नैसर्गिक सौंदर्य आणि तेथील इतिहास जाणून घेण्यासाठी तेथील संस्कृती पाहण्यासाठी देशातील विविध भागातून पर्यटकांनी यावे हा पर्यटनाचा मुख्य हेतू असतो.

आपल्याला आलेला थकवा, मनातील दुःख,आजार घालवण्याचे सर्वात स्वस्त आणि सुलभ माध्यम म्हणजे पर्यटन होय. यासाठी कोठेही फिरायला जा अगदी स्वतःच्या घराशेजारी असणारे डोंगरदऱ्या या ठिकाणीं निसर्गरम्य परिसरात गेले तरी अगदी मन ताजे तावाने होऊन सर्व दुःख माणूस विसरून जातो.

जागतिक पर्यटन दिन कसा साजरा करतात (Why Celebrate Tourism Day Mahiti)

Tourism Day In Mahiti

Why Celebrate Tourism Day In Mahiti – जागतिक पर्यटन दिनाच्या दिवशी पर्यटन हौशी लोक विविध नैसर्गिक ठिकाणी भेटी देतात, तेथील सर्व गोष्टी जाणून घेतात. काही मदत करता येत असल्यास ती करण्याचा प्रयत्न करतात.

शासन स्थरावर सरकार विविध पर्यटन स्थळांना विकास आराखडा मंजूर केला जातो. पर्यटन स्थळांना विकास करण्यासाठी सर्व सहकार्य केले जाते. शासन पर्यटन स्थळांना विकास आराखडा मंजूर करते. पर्यटन स्थळांचा जागतिक वारसा स्थळांत समावेश व्हावा म्हणून सरकार प्रयत्न करत असते.

पर्यटनविषयक लोकांमध्ये जागृती निर्माण करणे, पर्यटनास प्रोत्साहन देणे, पर्यटनातून आर्थिक विकास करण्यासाठी प्रयत्न करणे तसेच स्थानिक जनतेला रोजगार संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो.

पर्यटनातून देशाची आर्थिक स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. नवनवीन पर्यटन स्थळांना भेटी, त्यांच्या विकासासाठी आवश्यक प्रयत्न केले जातात.

पर्यटनाचे महत्व माहिती मराठी (Tourism Importance In Marathi)

मन शांतीसाठी पर्यटन केले पाहिजे दुःख, आळस, थकवा घालवण्यासाठी पर्यटन केले पाहिजे. मनाला विरंगुळा म्हणून फिरले पाहिजे. देशाची,जगाची नैसर्गिक साधन संपत्ती पाहण्यासाठी पर्यटन केले पाहिजे.

देशाचा भौगोलिक वारसा जाणून घेण्यासाठी फिरले पाहिजे. प्रत्येक कोसावर भाषा, पाणी, माणसे बदलतात या सर्वांचा अनुभव जीवनात फिरून एकदा घेतलाच पाहिजे.

आपले देश बांधव, जगातील बांधव त्यांचे जीवनमान जाणून घेण्यासाठी पर्यटन स्थळांना भेटी दिल्या पाहिजेत. नैसर्गिक अधिवास, परिसंस्था यांचा अभ्यास करण्यासाठी पर्यटन करावेच लागते.

हा लेख जरूर वाचातारकर्ली पर्यटन स्थळे (tarkarli beach information in marathi)

पर्यटनाचा विकास कसा करावा (Tourism Development Information In Marathi)

Tourism Development Information In Marathi

पर्यटन स्थळांना त्यांच्या दर्जानुसार दरवर्षी मदत मिळाली पाहिजे. पर्यटन स्थळांवर स्वच्छ्ता असावी. पर्यटकांना स्वच्छ्ता ठेवण्यासाठी प्रवृत्त करावे.

रस्ते,पाणी, वीज या मूलभूत गरजा पूर्ण असाव्यात. पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या योजना सुरू कराव्यात. उदा. पासमध्ये सूट ई.पर्यटन स्थळांची सर्वत्र जाहिरात केली पाहिजे कारण आजचा काळ जाहिरातीचा काळ आहे.

भोजन, राहणे, पाणी, इतर सुखसुविधा परिपूर्ण असाव्यात. जागतिक स्थरावर अत्यावश्यक असणारे निकष पूर्ण करावेत. पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या सुख सुविधा उपलब्ध करव्यात.

पर्यटन विकासासाठी अधून मधून पर्यटन मेळावे आयोजित करण्यात यावेत.

पर्यटन व्यवसाय माहिती मराठी (Tourism Business Information In Marathi)

आजच्या काळात पर्यटनास खूप महत्व आहे, पर्यटन व्यवसायात लाखो लोक काम करतात. पर्यटन व्यवसायाची उलाढाल पण अब्जावधी रुपयांत गेली आहे. प्रत्येक देशाला परकी गंगाजळी उपलब्ध करून देणारा व्यवसाय म्हणून पर्यटन व्यवसायाकडे आजच्या काळात पाहिले जाते.

पर्यटन व्यवसायात लाखो लोक काम करतात. स्थानिक पातळीवर जनतेला रोजगार संधी पर्यटनामुळे उपलब्ध होत आहे. पर्यटन व्यवसाय आजच्या काळात सोन्याचा भाव मिळवून देणारा व्यवसाय झाला आहे.

आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जो देश स्वतःच्या पर्यटन विकासासाठी प्रयत्न करील. लोकांना आकर्षित करील त्या देशाच्या अर्थव्यवस्थेला पर्यटनामुळे खूप मदत होणार आहे. सिंगापुर सारखे काही देश पर्यटन या क्षेत्रावर पूर्णपणे अवलंबून आहेत.

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण जागतिक पर्यटन दिवस माहिती मराठी (World Tourism Day Information In Marathi) जाणून घेतली.

जागतिक पर्यटन दिवस माहिती मराठी (World Tourism Day Information In Marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा. दररोज नवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी पुन्हा आमच्या ब्लॉगला भेट द्या.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

पर्यटन म्हणजे काय ?

एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तेथील भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक परिस्थिती यांचे निरीक्षण करणे म्हणजेच पर्यटन होय.

पर्यटनाचे प्रकार कोणते ?

पर्यटनाचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. यामध्ये पहिला प्रकार म्हणजे आंतरराष्ट्रीय पर्यटन आणि दुसरा स्वदेशी पर्यटन. याच बरोबर कृषी, आरोग्य, ऐतिहासिक, क्रीडा असे अनेक प्रकार पर्यटन या क्षेत्रात पाहायला मिळतात.

जागतिक पर्यटन दिन केव्हा साजरा केला जातो ?

जागतिक पर्यटन दिन 27 सप्टेंबर या दिवशी साजरा केला जातो.

पर्यटनाची व्याप्ती किती आहे ?

पर्यटनाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अलीकडच्या काळात पर्यटन हा एक मुख्य व्यवसाय म्हणून देशाच्या आर्थिक परिस्थितीसाठी पूरक व्यवसाय म्हणून पाहिले जाते. पर्यटन हा व्यवसाय इतका वाढत आहे की काही देशाच्या आर्थिक धोरण पर्यटन क्षेत्रावरच अवलंबून आहे.

पर्यटनाविषयी कोणती व्याख्या केली आहे ?

एखाद्या व्यक्तीने अथवा व्यक्ती समूहाने एखाद्या विशिष्ट ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणचे भौगोलिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचा आढावा घेणे म्हणजेच पर्यटन होय.

Leave a Comment