यशवंत भीमराव आंबेडकर मराठी माहिती

Yashwant bhimrao ambedkar information in marathi – यशवंत भीमराव आंबेडकर हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मुलगा आहे. भारतीय सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी आणि बौद्ध चळवळीचे कार्यकर्ते म्हणून यांना ओळखले जाते.

या लेखात आपण यशवंत भीमराव आंबेडकर मराठी माहिती – yashwant bhimrao ambedkar information in marathi पाहणार आहोत.

यशवंत भीमराव आंबेडकर मराठी माहिती (yashwant bhimrao ambedkar information in marathi)

Yashwant
यशवंत भीमराव आंबेडकर मराठी माहिती
नाव आणि टोपणनावयशवंत उर्फ भैय्यासाहेब बाबासाहेब आंबेडकर
जन्म12 डिसेंबर 1912
मृत्यू17 सप्टेंबर 1977
धर्मबौद्ध धर्म
संघटनाभारतीय बौद्ध महासभा
आईवडीलआई – रमाबाई आंबेडकर
वडील – बाबासाहेब आंबेडकर
पत्नीमीराबाई आंबेडकर
अपत्येप्रकाश आंबेडकर
भीमराव आंबेडकर
रमाबाई तेलतुंबडे
आनंदराज आंबेडकर
प्रमुख स्मारकेचैत्यभूमी
आवडते आदर्श व्यक्तिमत्वबाबासाहेब आंबेडकर
यशवंत भिमराव आंबेडकर मराठी माहिती

1. यशवंत उर्फ भैय्यासाहेब भीमराव आंबेडकर यांना न्यूमॅनेटिक आणि पायाचा पोलिओ हे आजार लहाणपणापासूनच होते.

2. भैय्यासाहेब यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे.

3. भैय्यासाहेबांनी सिमेंटचा कारखाना काढला आणि तो व्यवस्थित चालवला. त्यानंतर भारतभूषण प्रिंटिंग प्रेस हा छापखाना उभारला.

4. इसवी सन 1944 पासून बाबासाहेबांनी चालू केलेले जनता आणि प्रबुद्ध भारत या मुखपत्रांचे व्यवस्थापन भैय्यासाहेब पाहत होते.

5. बाबासाहेबांनी मुकुंदराव आणि भैय्यासाहेब यांना अर्पण केलेला थॉट्स ऑन पाकिस्तान हा इंग्रजी ग्रंथ भैय्यासाहेबांनी भारतभूषण प्रिंटिंग प्रेसमध्ये छापला.

6. त्यानंतर बाबासाहेबांच्या सांगण्यावरून आणि भारतीय बौद्ध महासभेकडून त्यांनी वा.गो. आपटे यांनी लिहलेले बौद्धपर्व हा ग्रंथ छापला त्याचबरोबर फेडरेशन वर्सेस फ्रिडम आणि थॉट्स ऑन लिंग्विस्टीक स्टेट्स हे ग्रंथ देखील आपल्या प्रेसमध्ये छापून प्रकाशित केले.

7. चवदार तळ्यावर अशोक स्तंभ उभारण्यासाठी यशवंत आंबेकर यांनी पुढाकार घेतला.

8. अंधारात असलेल्या समाजाला डॉ. बाबासाहेबांनी नवी सकाळ दाखवली, त्यामुळे बाबासाहेबांना क्रांतीसुर्य म्हणून संबोधिले जाते.

9. भीमराव यांचा वारसा घेऊन त्यांचे कार्य पुढे चालवणाऱ्या भैय्यासाहेबांना सुर्यपुत्र म्हणून संबोधिले जाते.

10. 19 एप्रिल 1953 रोजी त्यांचा विवाह मीराबाईशी झाला. यशवंत आंबेडकरांना प्रकाश, आनंदराज, भीमराव ही तीन मुले आणि रमा ही मुलगी आहे.

11. प्रकाश आंबेडकर हे भारतातील राजकारणी, वकील, सामाजिक कार्यकर्ते आहे, त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष आहे.

12. आनंदराज आंबेडकर हे महाराष्ट्रातील राजकारणी आणि अभियंता आहेत. यांनी 1998 मध्ये ‘रिपब्लिकन सेना’ नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला. सध्या ते या पक्षाचे अध्यक्ष आहे.

13. भीमराव आंबेडकर हे एक सामाजिक आणि धार्मिक कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर ते एक अभियंतादेखील आहे. ते सामाजिक, धार्मिक आणि राजकीय चळवळीमध्ये सहभागी होतात.

14. रमाबाई आंबेडकर यांचा विवाह आनंद तेलतुंबडे यांच्याशी झाला आहे. आनंद तेलतुंबडे हे मानवी हक्क कार्यकर्ते, लेखक, प्राध्यापक, शिक्षणतज्ञ, राजकीय विश्लेषक आणि दलित-आंबेडकरवादी चळवळीतील विचारवंत म्हणून ओळखले जातात.

15. 6 डिसेंबर 1956 या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. यानंतर यशवंतराव भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष बनले.

16. ते वेगवेगळ्या ठिकाणी धम्मदीक्षेसाठी कार्यक्रम घेत राहिले, धम्म परिषदा भरविल्या, धम्म मेळावे केले आणि “मी सारा भारत बौद्धमय करीन” हा आपल्या वडिलांचा संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहिले.

17. लेखक फुलचंद्र खोब्रागडे यांनी यशवंत आंबेडकर यांच्यावर सूर्यपुत्र यशवंतराव आंबेडकर हे पुस्तक 2014 साली लिहून नागपूर मधील संकेत प्रकाशन द्वारे प्रकाशित केले.

18. लेखक प्रकाश जंजाळ यांनी यशवंत आंबेडकर यांच्यावर लोकनेते भैय्यासाहेब आंबेडकर हे पुस्तक 2019 साली लिहून रमाई प्रकाशन द्वारे प्रकाशित केले.

19. यशवंत बाबासाहेब आंबेडकर यांचे 17 सप्टेंबर 1977 या दिवशी निधन झाले.

20. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखेच 65 वर्षाचे आयुष्य भैय्यासाहेबांना मिळाले.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समता सैनिक दलाची स्थापना केव्हा केली ?

इसवी सन 1927 साली बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या सत्याग्रहा पूर्वी महाडला एक परिषद भरविली होती. या परिषदेत समता सैनिक दलाची स्थापना करण्यात आली.

हे देखील वाचा

सारांश

आजच्या या पोस्टमध्ये आपण यशवंत बाबासाहेब आंबेडकर मराठी माहिती – yashwant babasaheb ambedkar information in marathi जाणून घेतली.

यशवंत बाबासाहेब आंबेडकर मराठी माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा.

जर तुम्हाला ही यशवंतराव आंबेडकर मराठी माहिती माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

1 thought on “यशवंत भीमराव आंबेडकर मराठी माहिती”

Leave a Comment